मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग १
नजीब कली जिवंत सापडला होता. त्याला मारून टाका असे सर्व लोक सांगत होते. परंतु नजीबने मल्हाररावांकरवी पुन्हा बचावात्मक धोरण लावले. धर्मपुत्राचा आव आणत त्याने स्वतःचा बचाव करून घेतला. त्याला पाठीशी घालत स्वतः त्याची जबाबदारी घेत मल्हारराव होळकर पुढे आले. मराठी इतिहासातील ही घोडचूक ठरली आणि त्यामुळे पुढे पानिपत ओढवले. अखेरपर्यंत त्याला मारावे असेच ठरले असताना मल्हाररावच्या सांगण्यावरून त्याच्या कडून दिल्लीचे राजकारण सोडून निघून जातो असे लिहून घेवून त्याला सोडून देण्यात आले. ह्यासंबंधी सियार-उल-मुतख्खरीनचा करता सय्यद हुसैन तबा-तबाई लिहितो की ह्या करिता नजीबने होळकरांना भरपूर पैसे दिले. दिल्ली पूर्ववत केली. आलमगीर सानीला बादशहा, गाजीउद्दिन वजीर आणि अहमदखान बंगशला मीर बक्षी करून मराठे पुढे कुरुक्षेत्रच्या दिशेने निघाले. गंगेच्या प्रांतात दादासाहेबांनी रेणको अनाजी याला ज्वालापूर येथे नजीबच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगितले. मार खाल्लेला नजीब गंगा उतरून पलीकडे निघून गेला. त्याची सर्व ठाणी मोडून रेणको अनाजी यांनी स्वताची ठाणी वसवली. दिल्लीची मसलत आवरताच दादासाहेबांनी सर्व हकीगत नानासाहेबांना कळविली त्या पत्रातील हा काही सारांश
No comments:
Post a Comment