भाग २
“…मुलुख श्रीमंतांचे हाती आला. पुढील तह निम्मे-निम्मेचा करार ठरला. २२ पैकी ६ सुभे दक्षण आपले आहेतच. लाहोर ते अटक पावेतो ६ सुभे अब्दालीकडे आहेत. प्रयागचा काराकुडा व अंतर्वेद आपल्या कडे आली तसेच अयोध्या, पटना, बंगाल व दिल्ली. तसेच दिल्ली खालील एक करोडीचा व सरहिंद पावेतो ९० लाखाचा प्रदेश काबीज करून वसुली आहे. बाकी जाट आग्रा सुभ्यात आहे. आता मेहनत केली तर लाहोरही सुटावयाजोगे आहे. स्वामींचे पुण्य थोर. काहेकरून सर्व होऊन जाईल. आमचे पदरी लेकुरपण आहे. वारंवार शिक्षायुक्त लेखन केलीयास उत्तम.”
परंतु नेमके यावेळी मराठा छावणीत काय निचर होते यासाठी आपल्याला आणखी एक पत्र मिळते. हे पत्र त्रिंबक मुकुंद हा सखारामबापूस लिहितो -
“दादासाहेबांचा कारभार सुस्त व व लटका. ओढा भलतीकडेच. नजीब पहिल्या दिवशी येताच आम्ही सत्वर कार्यभाग साधण्याची विनंती केली पण खावंद प्राक्तवान. बापू आपणच नेहमी म्हणता की नानासाहेबांचे प्राक्तनाचा गुण ऐसा की अवघड काम सोपे होऊन मार्गी लागते व दादासाहेबांचा गुण ऐसा कि सोपे काम दिसत ते अवघड होऊन नंतर आयास व विलंब होतो.”
यावरून स्वारीत दादासाहेबांबद्दल काय मनी होते ते स्पष्ट दिसते. आपले लेकुरपण(अजाणतेपण) तर वरील पत्रात दस्तुरखुद्द राघोबाच काबुल करतात. दिल्लीच्या दुरुस्तीत नजीब हातचा सुटला ह्या प्रकाराने ह्या सबंध यशावर गालबोट लागले. एकूणच या प्रकारावरून स्वतःचे मत बनविण्यात आणि ते फौजेवर अंमलात आणण्यात राघोबादादा कच्चे लिंबू पडत होते हे देखील दिसून येते.
No comments:
Post a Comment