विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 3 August 2023

१७२२ते१७३०मराठ्याच्या लष्करी हालचाली

 १७२२ते१७३०मराठ्याच्या लष्करी हालचाली


🚩🚩
निजामुन्मुलुखाचे सरदार अर्काटाकडे स्वारीस निघणार अशी बातमी आली. निजामाच्या पाठीवर शह देण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवे बाजीराव सह दिग्गज मराठे सरदार १७२२ च्या नोव्हेंबरांत अवरंगाबादेस येथे पाठविले. तेथें ऐवजखानाचा पराभव करून स्वारी ब-हाणपुरास गेली. १७२३ च्या जानेवारींत बाजीरावाची हांडिया प्रांतांतील अनूपशिंगाशीं भेट जाहली. १७२३ च्या फेब्रुवारीत खुद्द निजामुन्मुलुखाची मुलाखत करून स्वारी बाधेलखंडाकडे गेली. तेथून १७२३ च्या जुलैंत साता-यास येऊन सेनापती खंडेराव दाभाडे, युवराज फतेसिंगबाबा भोसले व चिमणाजी बल्लाळ ह्यांच्या साहाय्याला बाजीराव १७२३ च्या डिसेंबरांत गेला. १७२३ च्या डिसेंबरांत अंबाजीपंत पुरंधरे, मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे व नंतर बाजीराव यांनीं माळव्यांत व बुंदेलखंडांत स्वारी केली. हैदराबादकर मोगलांनीं उत्तर व दक्षिण पाईन घाटांत गडबड केली, ती बंद करण्याकरितां १७२३ च्या सप्टंबरापासून १७२४ च्या जुलैपर्यंत खंडेराव दाभाडे, युवराज फत्तेसिंग भोसले व चिमणाजी बल्लाळ गुंतले होते. हैदराबादकर मोंगल कंबरजखान व निजामुन्मुलूख ह्यांचा युद्धप्रसंग १७२४ च्या पावसाळ्यानंतर सुरू झाला. ह्या प्रसंगी मराठ्यांनीनें निजामाचें साहाय्य करून कंबरजखानाचा साखरखेडले येथें पराभव १७२४ च्या आक्टोबरांत केला. तेथून मराठे लष्करी माळव्यांत जाऊन १७२५ च्या एप्रिलास साता-यास छत्रपती शाहू महाराजांच्या दर्शनासाठी आला. १७२५ च्या सप्टंबरांत युवराज फत्तेसिंग भोसले,यांच्या नेतृत्वाखाली त्रिचनापल्ली वर मोहीम मराठ्यांनी काढले त्रिंबकराव दाभाडे, रघूजी भोसले, प्रतिनिधि व बाजीराव त्रिचनापलीपर्यंत कर्नाटकांत स्वारी करून १७२६ च्या मेंत परत आले. ह्या अवधींत चिमणाजी बल्लाळ व कान्होजी भोसले निजामावर चाल करून गेले. निजामानें छत्रपती शाहू महाराजांच्या विरुद्ध कोल्हापूर छत्रपती संभाजी महाराज प्रतिनिधि वगैरेच्या मनांत विकल्प आणून युद्धाची तयारी केली होती मराठ्यांचे बहुतेक प्रमुख सरदार कर्नाटकांत गेला असें पाहून निजामानें हा डाव आरंभिला होता. परंतु छत्रपती शाहूने माळव्यांतून सरदार उदाजी पवार, सरदार कंठाजी कदम, सरदार पिलाजी गायकवाड ह्यांस राजपुत्र फत्तेसिंग भोसले व चिमणाजी बल्लाळ ह्यांच्या साहाय्यास बोलाविलें व उत्तरेतून बाजीरावासहि परत येण्यास पत्रें पाठविली. १७

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...