विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 9 August 2023

करहाटक देश- प्राचीन महाराष्ट्रात 'करहाटक' नावाचा एक देश

 करहाटक देश- प्राचीन महाराष्ट्रात 'करहाटक' नावाचा एक देश 

 * मरहट्टी साम्राज्यातील 'पट्टीजन/पाटील' यांच्या शोधात (भाग- १०५)- १) करहाटक देश- प्राचीन महाराष्ट्रात 'करहाटक' नावाचा एक देश असल्याचे उल्लेख आहेत सध्या त्याला कऱ्हाड या नावाने ओळखले जाते. काही अभ्यासकांच्या मते 'कर+ हाटक' या वरून करहाटक म्हणजे 'धनवान लोकांची वस्ती' असे नाव पडले असावे. चिकुर्डे गावातील गावडे कुळातील एका हाटकर- धनगर स्त्रीकडे असलेला ताम्रपट इतिहासाचार्य राजवाड्यांना पहायला मिळाला होता. त्यावेळेस त्याचा ठसा घेणे त्यांना शक्य झाले नाही, परंतु त्याचे वाचन करून तपशीलवार नोंद मात्र त्यांनी करून ठेवली व लगेचच १९०७ मध्ये विश्ववृत्त मधे या ताम्रपटाचे सटीक वाचन प्रकाशित केले. या ताम्रपटात 'करहाट ४५००' असा उल्लेख आहे. रामायण आणि महाभारत ग्रंथात तसेच दक्षिण भारतात हाटक म्हणजे सोने (स्वर्ण) म्हणून पण ओळखले जाते. (कर्नाटकात हट्टी नावाच्या शहरात एक सोन्याची खाण सुद्धा उपलब्ध आहे.) कर्नाटकातील उत्तरकालीन सिंदराजे खास स्वतःचा ‘करहाटपूर वराधिश्वेर’ असा निर्देश करतात, यावरून ते मूळचे करहाटचे होते, हे निश्चित. कर्नाटकातील काही सिंदराजांच्या लेखांत ते मूळचे करहाटकचे होते, असे उल्लेख येतात. महाराष्ट्र देशाला संस्कृतमध्ये मूळ भाषा 'मरहट्टा' म्हणून उल्लेख आहे. मरहट्टा आणि मरहाटा या दोन्ही शब्दात 'हट्टा' हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वाभाविकरित्या हा भाग हट्टादेश म्हणून ओळखला गेला असावा. नाशिक जवळ असलेले त्र्यंबकेश्वाराला 'हाटकेश्वर' म्हटले जायचे. वाचस्पत्यकोश ग्रंथात असे लिहिले आहे कि, "दृष्टं त्रैलोक्यभर्तारं त्र्यंबकं हाटकेश्वरम |". तसेच बसवा-पुराणमध्ये 'श्रीशैलेश्वरा हाटकेश्वरा' असे म्हटले आहे. तसेच, हाटकर पाटलांच्या गावांमध्ये आत्तापर्यंत प्राचीन मंदिरे, वीरगळी, शिल्पे सापडत आहेत. करहाटक या देशावर पाच पांडवांपैकी एक सहदेव यांच्या विजयाचा उल्लेख महाभारत सभ्पार्व मध्ये आढळतो.- 'नगरी सज्यंती च पाखंडं करहाटकं दूतैरेवशे चके करं चैनानदापयत्'। दंडक या नांवाचा कोंकणपट्टीत प्राचीन कालीं एक देश होता. सहदेवानें पश्चिम किनार्याचे जे देश जिंकले त्यांत शूर्पारक, दंडक आणि करहाटक या तीन देशांची नांवे आहेत. दंडक म्हणजे सध्याचें दंडकारण्य नव्हे तर शूर्पारकाच्या दक्षिणचें जें कोंकण ते हा सध्या डंडाराजापुरी किंवा दंडाराजापुरी ह्या शब्दांत राहिला आहे.दंडाराजापुर प्रांतांतून घांटाने वर चढलें म्हणजे करहाटक प्रांत लागतो.

२) हाटक देश- हिमाचल प्रदेशातील गीरीपार पहाडी भागामध्ये 'हाटी,हट्टे,हट्टी' जमातीचे लोक वास्तव्यास आहेत. श्री. पवन बक्षी यांनी 'हाटी जनसमुदाय' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये या जनसमूहाबद्दल सर्व माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. काही अभ्यासकांनी तिबेटला आर्यांचे मूळ वसतीस्थान म्हटले आहे. कारण आर्यांचा मुख्य व्यवसाय हा पशुपालकच होता. विशेष म्हणजे आजसुद्धा त्याच भागात हिमाचलप्रदेशातील गीरीपार पहाडी भागामध्ये 'हाटी,हट्टे,हट्टी' जनसमूहाचे लोक राहत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. श्री. पवन बक्षी यांनी 'हाटी जनसमुदाय' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये या जनसमूहाबद्दल सर्व माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाभारतात उल्लेख असलेल्या 'हाटक' नावाचा देशाच्या ठिकाणीच हे लोक फार वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. हे लोक पशुपालक असून स्वतःला पांडवांचे वंशज मानतात. महाभारतातील सभापर्व मध्ये 'हाटक' या देशाचे उल्लेख आहेत, त्याला यक्षांचा देश म्हटले आहे. पुराणकथांतील वर्णनानुसार 'यक्ष' हे कुबेराचे सेवक असून त्याच्या उद्यानांचे व निधींचे (धनाचे) रक्षण करतात. हिमालयातील अलका नगरीमध्ये त्यांचे वास्तव्य असते.वीर व ब्रह्म हे शब्द यक्षाचे पर्याय असून ‘वीरब्रह्म’ या देवतेची पूजा हा यक्षपूजेचाच अवशेष होय; महाभारत काळात अर्जुनाचे उत्तर दिशेच्या दिग्विजयाच्या वर्णनात 'हाटक' देशाचे उल्लेख आहे.- "तं जित्वा हाटकं नाम देशं गुह्मकरक्षितम्, पाकशासनिरव्यग्रः सहसैन्यः सभसदत्।" तसेच, हाटक देश हा मानससरोवर आणि तिबेट प्रदेश असल्याचे उल्लेख आहेत, त्याला यक्षाबरोबरच गंधर्वाची भूमी देखील म्हटले आहे. "सरोमानसामासाद्यहाटकानभितः प्रभु, गंधर्वरक्षितं देशमजयत् पंडवस्ततः"

* संदर्भ- 1) महाराष्ट्रीय ज्ञानकोश
2) मराठी विश्वकोश
3) भारतकोश
4) Marāṭhyāñcā itihāsa, Volume 1- A. Rā Kulakarṇī, Gaṇeśa Harī Khare, Maṇḍaḷāsāṭhī Kôṇṭineṇṭala Prakāśana, 1984)
5) Rajaramasastri Bhagavata 1979
6) Mahārāshṭra sãskr̥tī- Purushottam Ganesh Sahasrabuddhe
7) Bhāshā-vicāra āṇi Marāṭhī bhāshā- Gã. Ba Grāmopādhye
😎 Mahārāshṭra sãskr̥tī: ghaḍaṇa āṇi vikāsa- Harī Śrīdhara 9eṇolīkara, Pralhāda Narahara Deśapāṇḍe
10) महाराष्ट्रीय शब्दकोश
11) Link (http://www.maayboli.com/node/53877)

* फोटो सौजन्य- Google map (Edited by Sumeetrao Lokhande)



No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...