विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 18 August 2023

शिवरायांच्या इतिहासातील ऐतिहासिक घटणेचे साक्षीदार प्रसिद्ध रांझ्याच्या ( पाटलाचे ) मोकदमाचे गाव...

 

शिवरायांच्या इतिहासातील ऐतिहासिक घटणेचे साक्षीदार प्रसिद्ध रांझ्याच्या ( पाटलाचे ) मोकदमाचे गाव...
लेखन ::जीवन कवाडे
याच रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे. हे मंदिर यादवकालीन आहे असे सांगितले जाते.मंदिरात बाहेरच्या बाजूला खूपच सुंदर असे बांधकाम केलेले पाण्याचे तीन कुंड आहेत. या कुंडामधील पाणी वेगवेगळ्या कार्यासाठी वापरले जाते . पहिल्या कुंडामधील देवतेच्या पूजाअर्चानासाठी दुसर्या कुंडा मधील पाणी स्नान संध्या साठी व तिसऱ्या कुंडातील पाणी धुण्यासाठी वापरले जात असे असे समजते. या जलकुंडातील पाणी बाहेर जाण्याचा मार्ग अंडर ग्राउंड असून खूपच सुंदर आहे.मंदिराचे बाहेरच्या बाजूला अनखी एक शिवपिंडी असलेले मंदिर दिसते . बहुतेक हे समाधी मंदिर असावे ‌कारण या मंदिराच्या गाभाऱ्यातील देवळित एक स्मृती शिल्प दिसत आहे ‌.
मंदिर आणि परिसर खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे.
 
स्वराज्य हे रयतेचे राज्य.
रयतेच्या राज्याची संकल्पना साकारताना शिवाजी महाराजांना बरेच रयतेच्या हितासाठी व गुन्हेगाराना जरब बसेल असे अनेक निर्णय घ्यावे लागले. गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी आणि पीडितांना योग्य आणि लवकर न्याय मिळावा व रयतेत विश्वास निर्माण व्हावा असे कार्य राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. याचे ठळक उदाहरण म्हणजे स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर रांझे गावाच्या मोकादमास छत्रपतींनी दिलेली कठोर शिक्षा! रांझे गावाच्या बाबाजी भिकाजी गुजर मोकादम यांचा केलेला चौरंगा.
रांझे गावाने या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती जपल्या आहेत.
खाली फोटोत दर्शविलेली समाधी ( स्मृती स्तंभ ) बाबाजी भिकाजी गुजर मोकादम यांची आहे.














No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...