मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Friday, 18 August 2023
घनसावंगी उर्फ धनसावंगी येथील थोडक्यात देशमुखी व पाटीलकीचा इतिहास
घनसावंगी उर्फ धनसावंगी येथील थोडक्यात देशमुखी व पाटीलकीचा इतिहास राजे लखुजीराव जाधवराव याना २४००० जात व १५००० स्वार ची मनसब असताना .. त्यांच्या वंश शाखेतील राजेनिळकंठराव जाधवराव यांना घनसावंगी येथील देशमुखी व पाटीलकी मिळाली त्या कालखंडापासून वंशपरंपरागत आमचे पंजोबा राजेकवराजी जाधवराव यांच्यापर्यंत स्वतंत्रनंतर इसवी सन 1960-70 पर्यंत वतनातील गावांमध्ये महसुली नोंदी आहेत देशमुखी पाटीलकी त्याकाळी सांभाळणे ही काय साधी गोष्ट नव्हती युद्धामध्ये शत्रूच्या हाती सापडलं तर वीरगती प्राप्त व्हायची सर्व मनगटातील व तलवारीच्या जीवावर चालायचं परगण्यातील जनतेचे रक्षण करणे हे देशमुख व पाटलाचे प्रमुख कर्तव्य होते ज्यावेळेस या भागात शत्रूंचे आक्रमणे होत त्यावेळेस सर्व लोकांना सुरक्षित स्थळी गढीवर पोहोचण्याची जबाबदारी देशमुख यांच्याकडे असायची पोहोचवल्या नंतर सर्व समाजातील शूर वीर लोकांना सोबत घेऊन युद्धप्रसंगी लढण्याची व रक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी देशमुखांची व पाटलांची असायची देशमुख हे व्यवस्थापकीय पदासोबत लष्करी पद ही होते.. वेळप्रसंगी आपली स्वतःचे लष्कर देशमुख लढाईच्या मैदानात ऊतरत ... लष्करी पगारी करता राखीव जमिनी असायच्या त्या पण जमिनीची नोंद आमच्याकडे आहे आमच्या घराण्याची वंशपरंपरागत कागदपत्रे तसेच शासकीय महसुली कागदपत्रे हाताळत असताना बऱ्याचशा जमिनी मंदिर व धार्मिक स्थळांना आमच्या पूर्वजांनी दान स्वरूपात जमिनी दिलेल्या आहेत तसेच बऱ्याचशा लोकांना जमिनी कास्त करण्यासाठी देखील देण्यात आलेल्या आहेत त्यातील काही जणांकडे गढी व जमिनी आहेत आणि काही लोकांना दान स्वरूपात दिलेल्या आहेत आमच्या घराण्याकडून देशमुख परगण्यातील / भागातील सर्व जातीधर्मातील लोकांना सोबत घेऊन चालल्याचा इतिहास आहे आजपर्यंत आमच्या घराण्याकडून देशमुखीचा व पाटिलकी चा रुबाब कधी गाजवलेला नाही कुणाच्या भाजीच्या देठालाही हात लावलेला नाही हा आमचा इतिहास आहे लोकशाहीमध्ये सुद्धा आपल्या सर्वांच्या व पूर्वजांच्या आशीर्वादाने मला घनसावंगी शहराच्या नगराध्यक्ष पदावर काम करण्याची आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली*देशमुखी पाटीलकी जरी आज राहीली नाही तरी आडनाव स्वरुपात ते लावले जाते.. यामुळे पुर्वजांचा ईतिहास आणी स्वाभीमान टीकुन राहतो*.. * *श्री राजे राजेंद्र उर्फ राज जाधवराव देशमुख9689330111*
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment