आऊसाहेब व शिवाजी राजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला खेड शिवापूर चा वाडा.
आऊसाहेब आणि शिवाजीराजे बेंगलोरहुन पुण्यात आपल्या जहागिरी वर आल्यावर त्यांना पुण्यात वास्तव्यास घर नव्हते. आदिलशाही सरदार मुरार जगदेव ने पुणे जाळुन गाढवाचा नांगर फिरवून पुणे पार उध्वस्त केले होते. आऊसाहेबांनी पुण्यात कसबा गणपतीची स्थापना करुन लालमहालाचे बांधकाम सुरू केले. पण बांधकाम होईपर्यंत राहायचे कुठे हा प्रश्न होता. तेव्हा बापुजी मुद्गल देशपांडे यांनी त्यांच्या खेडबारे ( आजचे खेड शिवापूर ) येथील वाड्यात राहण्याची विनंती केली. त्या विनंतीस मान देऊन आऊसाहेब व शिवबा राजे खेड बारे येथे राहावयास गेले व तेथुनच आऊसाहेब व शिवाजी राजांनी स्वराज्याचा श्रीगणेशा केला.
हाच तो बापुजी मुद्गल देशपांडेचा वाडा .
एवढी मोठी ऐतिहासिक वास्तू पण आज दुर्लक्षित आहे.
No comments:
Post a Comment