विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 3 August 2023

तोतयांचे नाट्य

 

तोतयांचे नाट्य 


सदाशिवभाऊ पेशव्यांचे रुप घेऊन आलेला  तोतया म्हणजे " सुखलाल कनोजी '"यांची गर्दन मारण्यात आली.त्यावरील लेख!



पानिपताच्या तिसऱ्या युध्दात सदाशिवभाऊ पेशव्यांनी पराक्रमाची शर्थ करुन मायभूमीसाठी बलिदान दिले. मात्र आजकाल चित्रपट ,नाटक व कादंबरीमध्ये  तोतया म्हणजेच खरे  सदाशिवभाऊ होते. व त्यांना सत्तेसाठी तोतया ठरवून मारण्यात आले अशाप्रकारे चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात. त्यांतून या या प्रसंगाला भलतेच फाटे फोडले जाऊन पेशव्यांवर  काही जाणूनबुजून  चिखलफेक करतात. मात्र ऐतिहासिक कागदपत्रानूसार या सर्व गोष्टी पूर्णपणे खोट्या ठरतात. त्याविषयावर आपण आता  थोडक्यात माहिती मिळवू या -


            मराठ्यांच्या इतिहासात सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे  14 जानेवारी 1761 मध्ये झालेले पानिपताचे तिसरे युद्ध  होय. या युद्धात भलेही मराठ्यांचा पराभव झाला असला तरी अब्दालीला दिल्ली येथे वर्चस्व स्थापन करता आले नाही. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे नेतृत्व सदाशिवभाऊ पेशव्यांनी केले होते. या युद्धात सदाशिवभाऊ शत्रूशी शेवटपर्यंत लढत होते. युद्धात विश्वासराव पेशव्यांना गोळी लागल्यावर मराठी सैन्यात गोंधळ निर्माण झाला. सदाशिवभाऊ पेशवे शत्रूवर तूटून पडले. त्यांत सदाशिवभाऊ व विश्वासराव यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांचा मृतदेह सापडला नाही. त्याचा फायदा काही तोतयांनी घेतला. त्यांतील तोतयावर ही पोस्ट आहे.


         अॉक्टोबर 1765 च्या सुमारास सदाशिवरावभाऊंसारखा दिसणारा एक ब्राह्मण पुण्यात दाखल झाला. तो तंतोतंत  सदाशिवभाऊसारखा दिसत होता. याबाबत खुद्द  भाऊसाहेबांची पत्नी पार्वताबाईदेखील  विचारात पडल्या.त्यावेळी थोरले माधवराव पेशवेपदी विराजमान होते.माधवरावांना या तोतयांचा संशय  आला.कारण जर हा माणूस खरोखरच सदाशिवभाऊ असेल तर पानिपतच्या युद्धानंतर जवळजवळ तब्बल साडेचार वर्षानंतर कसा येई शकतो? जर सदाशिवभाऊ जिवंत असते तर एवढा वेळ उत्तरेत का थांबले ? नाना फडणवीसांनी खरे सदाशिवभाऊ पानिपतात पडल्याचे असल्याचे अनुभवले असल्याने हा "तोतया " आहे पक्के माहित होते. म्हणून नाना फडणीसांनी पुण्यातील पर्वतीवर या तोतयांची चौकशी सुरु केली. तोतयाने सदाशिवभाऊच्या अनेक सवयी छान आत्मसात केल्या होत्या. 

मात्र नाना फडणीसांनी तोतयांची चांगलीच उलटतपासणी केली. त्यावेळी आपले खरे नाव "सुखलाल "असून कनोजी ब्राह्यण आहे हे त्याने स्वतः कबूल केले. माधवराव पेशवे याठिकाणी प्रत्यक्ष हजर होते. मात्र तरी सदाशिवभाऊची पत्नी पार्वतीबाईंना या सर्व गोष्टी पटत नव्हत्या. कारण सदाशिवभाऊंचा मृतदेह जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी पाहत नाही. तोपर्यंत सदाशिवभाऊ गेले हे ते मान्य करण्यास तयार नव्हते. माधवरावांनी तोतया "सुखलाल कनोजीला" रत्नागिरीस कैदेत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर काही वर्ष या विषयावर पडदा पडला. माधवराव पेशवे  निजाम , हैदर व टिपू तसेच रघुनाथरावांच्या वेगवेगळ्या कारवा-या मिटवण्यात व्यस्त होते.
 माधवरावांच्या मृत्यूनंतर नारायणराव पेशवे पुढे त्यांची हत्या ,बारभाईचे कार्य असा मोठा काळ गेल्यानंतर सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात या सुखलाल नावाच्या तोतयाने पुन्हा डोके वर काढले. रत्नागिरीस कैद असलेला तोतया म्हणजे सुखलालला तेथील परांजपे मामलेदाराने सोडूध दिले कैदेतून सुटल्यावर सुखलालाने आपण सदाशिवभाऊ पेशवे आहे असे सांगू लागला. तसेच त्याने काही सैन्यही जमा करुन तो पुण्यावर चालून आला.त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ब्रिटिशांची मदत होतीच. नाना फडवणीसांनी परिस्थितीची अभ्यास करुन ब्रिटिशांशी तातडीने तह केला.सुखलाल नावाच्या तोतयाला पकडण्यात आले.तोतयाला पुण्यातील सर्व लोकांसमोर बोलंत केले. तोतयाने आपले खरे रुप पुन्हा सर्वासमोर कबूल केले. पुण्यात तोतयांची उंटावर बसवून धिंड काढण्यात आली.त्यामुळे सर्व लोकांना त्यांचे खरे रूप समजावे हा हेतू होता. अखेर 18 डिसेंबर 1776 रोजी तोतया उर्फ सुखलाल कनोजीची गर्दन मारण्यात आली. 


--- प्रशांत नारायण कुलकर्णी 
       इंदिरानगर नाशिक   (मनमाड  )

संदर्भ -
1.मराठ्यांचा इतिहास खंड -अ.रा.कुलकर्णी 
2.पेशवाई - महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णापान
-- कौस्तुभ कस्तुरे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...