उपभोगशून्य स्वामी
माधवराव पेशवे !
माधवराव पेशव्यांच्या काळातील अनेक
गोष्टी सांगता येतील पण याठिकाणी एक छोटीशी गोष्ट सांगून त्यांच्या
प्रशासनाच्या दक्षतेबाबत सहज समजते.
पानिपतच्या पराभव नानासाहेब पेशव्यांना अपेक्षित नव्हता त्यामुळे या धक्काने ते सावरु शकले नाही. २३ जून १७६१ मध्ये त्यांचे निधन झाले. नानासाहेब पेशव्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र माधवराव यांना पेशवाईची वस्त्रे २७ जुलै १७६१ मध्ये देण्यात आली. वयाच्या १६ व्यावर्षी ही मोठी जबाबदारी पार पाडणे सोपे नव्हते. कारण पानिपतच्या -३ मध्ये मराठ्यांची एक पिढी गारद झाली. मराठी सत्तेचा दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी माधवरावरावांनी अपार कष्ट घेतले
राजा हा राज्यांचा उपभोगशून्य स्वामी असतो. त्याला वैयक्तिक आयुष्य नसते. त्यांचे संपूर्ण जीवन जनतेच्या कल्याणासाठी असते. यांचे मूर्तिमंत प्रतिक म्हणजे थोरले माधवराव पेशवे होय, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात १७६१ मध्ये मराठ्याचा पूर्णपणे पराभव झाला. वित्तहानी , जीवितहानी बरोबरच मोठ्याप्रमाणावर मानहानी झाली. मराठी सत्ता संपते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा कठीण काळात थोरले माधवराव पेशवे गादीवर बसले. माधवराव विचारी व कर्तृत्ववान पेशवे होते. त्यांना परिस्थितीची पूर्णपणे जाण होती. अशा कठीण काळात स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता त्यांनी रात्रंदिवस जनतेची सेवा केली.
सैनिकांना पगार देण्यास पैसा नव्हता तर त्यांनी सोन्यांचे देव गहाण टाकले. त्यांची प्रकृती खालावली तरी ते डगमगले नाहीत. बिछान्यावर पडून राहावे लागले तरी त्यांनी विश्रांती घेतली नाही. त्यांनी राजवैद्यांना विंनती केली. " मला कफाच्या त्रासामुळे बोलता येत नाही. माझ्या शरीरातून कफ निघून जावा असे औषध मला द्या." त्यामुळे जनतेशी संपर्क साधून मला राजधर्म सांभाळता येईल. राजवैद्यांनी त्यांचे पाय धरले. अंतःकाळी सुद्धा त्यांच्या डोक्यात जनतेच्या कल्याणाचे विचार होते.
-- प्रशांत नारायण कुलकर्णी
इंदिरानगर नाशिक (मनमाड)
No comments:
Post a Comment