महाबली शहाजी महाराज यांची नातवंडे छत्रपती संभाजी महाराज, दुसरे शहाजी महाराज, पहिले सरफोजी महाराज, पहिले तुळजा महाराज (व्यंकोजी राजेंची मुले) ही आपल्या आजोबांप्रमानेच सर्वगुणसंपन्न आणि विद्याव्यासंगी होती या सर्व राजपुत्रांनी नृत्यविषयावर अनेक ग्रंथ रचले होती "नायिकाभेद", "संगितसारामृत", "मुव्वगोपाल", "नाट्यवेदाम्" असे अनेक ग्रंथ रचले होते या ग्रंथामध्ये दरबारातील नृत्यांगना व नृतकांनी नृत्य कसे करावे व त्याचे नियम यात सांगितले होते पुढे याच नियमात थोडेफार बदल होत जावून "भरतनाट्यम्" या प्रसिद्ध नृत्यप्रकाराचा जन्म झाला
तंजावरचे दुसरे सरफोजी महाराज हे "कलाकोहिनुर" होते अस एक हे कलाक्षेत्र नाही ज्यात त्यांनी भरीव काम केले नाही दुसरे सरफोजी महाराजांनी "दहा नाटके", "सहा पुराणे", अनेक काव्य, विविध कर्नाटकी पध्दतीचे संगीत राग, व अनेक प्रकारचे "नाट्यप्रबंध" असे विपुल साहित्य रचना केली होती सरफोजी महाराजांनी तंजावर राज्यात चालत आलेल्या नाट्यप्रकारात सुधारणा करून जयजय, शरनु, अलारू असे नवे सतरा ते आठरा नृत्यप्रकार तालबद्ध करून त्यात सुत्रता आणली शिवाय त्याचे प्रयोग करण्यासाठी तंजावर येथे भव्य "संगितमहाल" उभारला या संगितमहाल व "नड्डवारचावडी" येथे नव्या नृत्यप्रकाराचे म्हणजे मुळ "भरतनाट्यम्" चे यशस्वी प्रयोग केले जात याच संगितमहालात नृत्य करणाऱ्या श्री चेन्नय्या, श्री पोन्नया, श्री शिवानंद, श्री वेडुवेलू या चार बंधूंनी हा नृत्यप्रकार शिकून इतर आजुबाजुच्या राज्यात पसरवला व भरपूर किर्ती मिळवली पुढे हाच नृत्यप्रकार "हेमामालिनी" या हिंदी नृत्यांगनाने जगभर प्रसिद्ध केला परंतु याचे मुख्य निर्माते असलेले "मराठा राजा" मात्र उपेक्षित राहिले आहेत
संदर्भ_ तंजावूर नृत्य प्रबंध
No comments:
Post a Comment