जिंजीहून संताजी बरोबर परत येत असता बेंगरूळ मुक्कामी मोगलांबरोबर झालेल्या लढाईत 1696 मध्ये विठोजीराव पडले तेव्हा त्यांच्याबरोबर पुञ उदाजीराव ही होते. यावेळी त्यांचे वय 16/17 वर्षांचे असावे . विठोजीरावांची स्वराज्यसेवेसाठी गमावलेले प्राण आणि एकनिष्ठतेमुळे उदाजीरावांना राजाराम महाराज यांनी सरदारकीची वस्ञे दिली. वडीलांप्रमाणेच धाडसी पराक्रमी आणि शुर असून वयाच्या 80_82 पर्यंत गाठता लढाईतच धारातिर्थी पडले.
छञपतींकडून सरदारकीची वस्ञे मिळवणारे हे दुसरे चव्हाण होय . त्यांनी राजाराम महाराज यांच्या पासून ते ताराऊ , शाहू , करवीर छञपती संभाजी महाराज , राजसाबाई आणि जिजाबाई साहेब यांचेशी एकनिष्ठेने सेवाचाकरी केली. सातारा छञपतींकडून हिम्मतबहाद्दर आणि ममलकतमदार असे दुहेरी किताब पटकवणारे एकमेव उदाजीराव होय , या किताबावरूनच त्यांची योग्यता सामर्थ्य पराक्रम निष्ठा याचे दर्शन घडते.
बाळाजी विश्वनाथ पासून ते माधवराव पेशवे या सर्व पेशव्यांशी हर्षामर्श घडून आले परंतू पराक्रमात ते कुठे ही उणे पडले नाही. वर्षाभरातच मानेकडून दगलबाजीने संताजी मारले गेले तरी ही उदाजीरावांनी संताजीपुञांची पाठराखण केली. संताजीबरोबर काम केल्याने चव्हाणांचे विजापूरी मोठेच प्राबल्य होते.
शाहू छञपती कैदेतून सुटून आल्यावर दोन गाद्या निर्माण झाल्या पण उदाजीरावांनी ताराऊंना एकटे सोडले नाही. करवीर छञपतींशी एकनिष्ठेने राहून सातारा छञपतींविरूध्द अनेक लढाया केल्या.अनेक कामगिरीमुळे संभाजी राजेंकडून 1714 ला तीन लक्षांचा सरंजाम मिळाला . 1723/24 साली मराठ्यांनी कर्नाटकात स्वार्या केल्या . ञिचानापल्ली संस्थान जिंकून घेतले या मोहिमेत उदाजीराव आपल्या पथकासह तयार होते. माञ 1726 साली शाहूंच्या फौजा कर्नाटकात गेल्याचे पाहून तासगाव ते रहिमतपुपर्यंत धाभधुम उडवली. वारणातिरी हे शिरोळे ठाणे कायम केले. शाहूंच्या मुलखातून चौथाई वसूल करण्यास सुरुवात केली त्यासच चव्हाण चौथाई नाव मिळाले. ही चौथाई विजापूर अथणी या निजामभागातूनही वसूल करण्याचा सपाटा लावला.
उदाजीरावांकडून मुलखाची होणारी धामधूम थांबवण्यासाठी शाहू छञपती यांनी सिधोजी थोरात दाभाडे सरलष्कर दावलजी , ञिंबकराव सरलष्कर , जाधवराव 1728 साली आज्ञा पाठवून आणि करवीरचे संभाजी महाराज आणि उदाजीराव व साथीदारांचा लढाईत साक्षमोक्ष लावण्याचा इरादा कळवला. 1730 साली वारणेकाठी लढाई झाली आणि करवीरचा पराभव झाला. यातून बंधूंच्या वाटाघाटी ठरून 13 एप्रिल 1731 मध्ये वारणेचा तह झाला.
जो तह झाला त्यात करवीरकडून उदाजींचा मुलुख शाहूंना द्यायचा होता ही गोष्ट उदाजीरावांना पसंद नव्हती. निजामाकडून मोगलाईचा आणि करवीरकडून स्वराज्याचा अंमल मिळाल्याने विजापूर अथणी मिरज हा पन्नास लाखांचा मुलूख शाहूंकडे जाणार होता आणि तो मुलूख करवीरकरांनी दिल्याने उदाजीराव नाराज होऊन निजामास गेले. वारणेचा तह होऊन ही उदाजीरावांनी चव्हाण चौथाई सुरूच ठेवली. त्यामुळे पोतनिसांना उदाजीवर धाडले पण विशेष प्रभाव पडला नाही म्हणून उदाजीरावांना आपल्या बाजूस यावे अशा खटपटीस यश आले आणि 1734 सालापर्यंत शाहूंचे दोन सरदार सोबत घेऊन कर्नाटकात दोन वर्षे मोहिमेस होते. दोन सरदार शंभूसिंग जाधवराव आणि भूजबळराव हे होते.
शाहूंचे आणि उदाजींचे सख्य याच वर्षी 1734 ला संपले . आणि चव्हाण आपल्या बाजूस येऊन उपद्रव देऊ लागल्याने 1737 साली प्रतिनीधीमार्फत उदाजींवर चढाई करण्यास रवाना केले आणि मिरजेचे ठाणे जिंकून घेतले पुढे शिवाजी डूबल यांना दिले. अशा तर्हेने अथणी ही गमवावी लागली. बाजीरावाने तास गाव ही घेतले उदाजींची मोठी पिछेहाट झाली.
शाहूंनी उदाजींची सर्वच ठाणी घेतल्याने निजामाकडे गेले आणि चंद्रसेन जाधवराव आणि उदाजीरावांनी बीड मुलूखात मोठी धामधुम सुरू केली . याची रोख करण्यासाठी फत्तेसिंगबाबांना शंबूसिंग , सरलष्कर रघोजीराजे , बंडगर हे 1738 साली उभयंतावर चालून घणघोर युद्ध झाले आकाशात धुरूळा उडाला आणि चंद्रसेन उदाजींना माघार घेऊन मोगलाईत पळून गेले.
शाहू छञपती यांच्या प्रकृतीत नादुरूस्ती झाली तेव्हा 1747 करवीर संभाजी महाराज सातारा गेल्यावर उदाजीरावांना शाहूंकडेच ठेवण्यात आले. वर्षभराच्या मुक्कामात शाहूंनी उदाजींना 27 लक्षांचा सरंजाम दिला पण मिरज व अथणी सोडून बाकी मुलूक दिला. पुढे पंधरा वर्षे शाहूंचे सरदार म्हणून ते सेवा बजावित होते पण माधवरावांच्या पेशवेकारकिर्दित हा सरंजाम जप्त करून टाकला.
पानिपताच्या युध्दात मराठेशाहीचा र्हास झाला हजारो घरे पानिपती पडली. या युध्दापुर्वी युध्दात जाण्यासाठी जे सर्व सरदार आले होते त्यात उदाजीराव ही आपल्या पथकासह होते. यावेळी उदाजींचे वय 80 असावे ज्यांचे संपूर्ण आयुष्य घोड्याच्या पाठीवर आणि रणभूमित तलवार गाजवीतच गेले असावे अशा सरदारास युध्दाचे बारकावे आणि आखण्या चांगल्याच माहिती असाव्यात यात दुमत नसणारचं. पण उदाजीराव पुण्यात पथकासह हजर होताच पेशवे आणि उदाजींचे वाकडे आले आणि निजामाकडे गेले पुन्हा तीस लक्षांचा सरंजाम मिळाला.
पेशवे आणि उदाजीरावांचे वाकडे का आले ??
उदाजीराव पुण्यास हजर होताच पेशव्यास म्हणाले " गिलच्यांचे पारापत्य करण्यास आम्ही स्वत जातो , भाऊसाहेब आणि विश्वासरावांस साथ करतो असे नानास सांगितले " . त्यावरून पेशव्यांच्या मनात विकल्प आला आणि म्हणाले काकासाहेब आपण येऊ नये असे 80 वर्षांच्या हिम्मतबहाद्दरास म्हणाले की ज्याने खुद्द सातारा छञपतींच्या मुलखात हि दबदबा आणि मोगलाई निजामशाही यांच्याकडै ही विशेष दबदबा एवढेच नाही तर अख्ये आयुष्य घोड्यावर गेले आणि तलवार पेलण्यात गेलेल्या या हिम्मतबहाद्दरास नाना चे विधान ऐकून पेशव्यांचा सरंजाम धुडकावून निजामाकडे गेले.
नानांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या स्वभावाचा द्योतक होता. 1750 पासून मराठूशाहीची सुञे हाती आल्यापासून तो सत्ताधिश म्हणून तो एखाद्या हुकूमशहा सारखा वर्तन करेन असे गोव्याच्या व्हाईसराईने काढलेले वक्तव्य कसे खोटे ठरेल.
उदाजीराव जर पानिपत युध्दात हजर असते तर पराभवास काही अंशी तरी पायबंद बसू शकला असता असे वाटू लागते.
1760 साली नळदुर्गास वास्तव्यास गेले आणि अक्कलकोकर राजे भोसले यांच्याशी गावच्या हद्दिवरून तंटा झाला आणि उभयपक्षी मोठी लढाई झाली त्यात उदाजीराव अखेर 1762 रोजी धारातीर्थ पडले.
संताजी घोरपडेंबरोबर त्यांनी काही काळ थेट औरंग्यास टक्कर दिली होती. त्यानंतरच्या तिन पिढ्यानंतरही उदाजीराव पानिपतवर जाण्याची तयारी दाखवितात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पानिपतच्या या पराभवाच्या धक्यानेही नानासाहेब पेशवा पर्वतीवर मृत्यूला सामोरे गेला हा सर्वात मोठा विनाशकाल पाहण्याचे उदाजीरावांच्या नशीबी यावे हिचं पानिपतवरची दुर्दैवी घटना होय.
उदाजीरावांनी अनेक मोहिमा केल्या काही माघार तर काहीत पराभव ही आला पण पुन्हा तयारी ठेवून घोड्यावर मांड टाकून शञूंचे मुलूख तुडवावे यात खंड पडू दिला नाही. छञपतींनी त्यांना स्वतंञ ध्वजाचा मान दिला होता पांढरा शुभ्र रंगाचा आणि आकाराने भगव्याध्वजाप्रमाणे होता.
." श्री राजा शंभू छञपती चरणी तत्पर !
उदाजी चव्हाण हिम्मतबहादर , ममलकतमदार " !!
असा त्यांचा शिक्का होता.
अशा बहाद्दर चव्हाण घराण्याबद्दल प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा.
हिम्मतबहाद्दर चव्हाण घराण्याचा पहिला भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर जावा .
हिम्मतबहाद्दर , ममलकतमदार चव्हाण घराणे ...भाग 2

हिम्मतबहाद्दर चव्हाण घराण्यातील वीर पुरूषांना मानाचा मुजरा
गडप्रेमी बाळासाहेब पवार
9604058030
No comments:
Post a Comment