विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 23 September 2023

#पवार #घराण्याची #उपनावे...

 

श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान..
प्रथम मुलूखगिरी करताना काही खिताब (पदवी) मिळाले त्या पुढे तेच खिताब आडनाव म्हणून रुजू झाले.
पवार घराण्याला छत्रपती घराण्याकडून मिळालेले सन्मानदर्शक हुद्दे
१) सेनापंचसहस्त्री २)सेनासप्तसहस्त्री ३)सेनाबारासहस्त्री ४) सेनासुभा (सेनापती हुद्दा) ५) सेनाधुरंदर (सेनापती) ६) शाह आमत आवलीपन्हा.
सन्मानदर्शक खितांब..
१) विश्वासराव २) झुंझारराव ३)औषधराव ४) महिपतराव ५) मुकूटराव ६) धारेराव ७) धारकर ८) सरपाटिल ९) उमराव १०) अंबरराव ११) पर्वतराव १२) पंडितराव १३) बाघराव १४) बनेराव १५) राऊळराव १६) प्रतापराव.
१)आरफळकर / पवार - संत ज्ञानेश्वर अन संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळाचे मालक हैबतबाबा अरफळकर मूळचे धार पवार ग्वाल्हेरचे शिंदे सरदार यांच्या सोबत कामगिरीवर असणारे हैबतबाबा हे सातारा मधील आरफळ गावचे. श्रीमंत शितोळे सरकारांच्या मदतीने आजच्या पालखी सोहळ्याचे लष्करी स्वरूप सरदार हैबतबाबा अरफळकर यांनी दिले.
२) निंबाळकर / पवार - फलटणचे प्रसिद्ध असलेले राजघराणे मूळचे धार पवार आहे. मूळ पुरुष निंबराज पवार यांनी वसवलेल्या निंबळक गावावरून निंबाळकर उपनाव प्राप्त झाले. थोरल्या महाराणी सईबाईसाहेब याच निंबाळकर घराण्यातील.
३) विश्वासराव / पवार - हे शिवपूर्व व शिवकाळातील प्रसिध्द धार पवार घराणे. नगरदेवळे येथील पवार घराणे तसेच कोकणात राजापूर येथे कुरंग कोंडगे येथें तर पनवेल येथील काल्हे गावात विजयराव विश्वासराव (शिवनेरी किल्लेदार) यांची शाखा आहे. तर राजाराम महाराज यांच्या काळात बुवाजी पवार यांना विश्वासराव खितांब व विश्वसराई सरंजाम राजाराम महाराज यांनी पवार घराण्याला दिला.
४) दळवी/ पवार - हे शिवकालीन धार पवार सरदार घराणे आहे. यांचे मूलस्थान कोकणात पालवणी गावात होते. मुळशी तालुक्यात आंबवणे येथील दळवी घराणे सुद्धा ऐतिहासिक आहे. दलाचे अधिपती असल्या दळवी हे आडनावं झाले.
५) ढवळे / पवार - इस १३०० च्या सुमारास अबु येथील राणा रणधवलसिंह परमार (पवार) घराण्याचा मूळ पुरुष दक्षिणेत आला. त्यांनी सातारा जिल्ह्यात ढवळ व नांदवळ गावे वसवली. ढवळचे पवार फलटणच्या निंबाळकर यांच्या पदरी सरदार होते.
६) पाणसंबळ / पवार - छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षण लखोजी जाधवराव यांनी नेमलेले प्रशिक्षक सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचेकडूनच पूर्ण झाले. गोमाजी नाईक यांनी जिजाबाई साहेब आणि बाल शिवाजी हे शिवनेरी येथे असतानाच शिवाजी राजांच्या प्रशिक्षणाची सुरूवात केली होती.
नाईक पानसंबळ हे आडनाव मराठ्यांच्या शहाण्णव कुळातील पवार कुळातील आहे. ते मध्यप्रदेशातील धार संस्थानच्या परमारराव उर्फ पवार यांचे वंशज आहेत. परमाररावांचा पुढे पवार असा अपभ्रंश होऊन, पवारातील काही लोक 'नाईक निंबाळकर' अशा पडनावाने राहू लागले. आणि याच नाईक निंबाळकर आडनावातील काही लोकांच्या आडनावात पुन्हा एकदा अपभ्रंश होऊन, ते 'नाईक पानसंबळ' असे झाल्याचे गोमाजी नाईकांच्या वंशजांमधून सांगितले जाते. सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचे गाव अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडे हे असल्याचे सांगितले जाते.
७)जगदाळे / पवार - श्रीमंत जगदाळे हे धारच्या पवार घरण्याची शाखा. पानिपतच्या युध्दात आपल्या पराक्रम मूळ प्रसिद्ध. बहमनी काळापासून या घराण्याला १६८ गावाचा मसूर परगणा व देशमुखी होती. मसुरे गराडे व दौंड लिंगळे येथे दिडशे गावाची सरपाटिलकी मिळाली. जगदेवराव जगदाळे हे मूळपुरुष समजले जातात.
८) वैद्य / औषधराव पवार - वैद्यकीय ज्ञान व वैद्यकीय व्यवसाय असणाऱ्या धार पवार घराण्याची हि शाखा.औषधराव म्हणजेच वैद्य. मराठा ९६ कुळ या पुस्तकात उल्लेख. शस्त्र व शास्त्र या दोन्ही कलेत हे घराणे निपुण. छत्रपती संभाजी महाराज कालखंडात उल्लेख. मुळशी पेट्यात शेडाणी व अवळस या गावात वास्तव्य,भोर मुळशी मावळ तालुक्यात या घराण्यांचे वास्तव्य आहे.
९) धारेराव / पवार- सांगली जिल्ह्यातील रेनावी गावातील आपल्या कामगिरीच्या जोरावर पवार घरण्याला धारेराव हा खितांब.
१०) धारकर/ पवार- पुणे जिल्ह्यातील वाल्हे गावातील धार पवार घरण्याला धारकर हा खितांब. छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत असणाऱ्या सरदार तुकोजीराव पवार ह्याच गावचे.
११) सोरटे/ पवार - पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील हे मूळ धार पवार घराणे. आपल्या सरदारकी बरोबरच मानशिरकरी हा खितांब. दरबारात पूर्वी सोरट हा खेळला जाई. त्यात प्राविण्य असल्याने सोरटे आडनाव.
१२) वाघळकर - सुपेकर / पवार - आपल्या वतन मिळलेल्या गावात वास्तव्यामुळे धार पवार वाघाळे येथील वाघळकर तर सुपे येथील सुपेकर म्हणून ओळखले जाऊ लागले.
१३) पंडीतराव / पंडित / पवार - कोकणात काही गावातील मंदिरात पूजेचा मान असल्या मुळे पंडित उपणाव झाले. प्रसिध्द कासोटीपटू चंद्रकांत पंडित हे ह्याच धार पवार घराण्यातील.
१४) सावंत / पवार - कोकणात असलेले हे मूळ धार पवार घराणे. आपल्या स्वकर्तुत्वाने वर आले. १७०० साली नर्मदेच्या पलीकडे जाऊन हल्ला केलेला पाहिले मराठा सरदार हे कृष्णजी सावंत हे मूळ धार पवार.
१५) झुंझारराव / पवार - रणांगणात शत्रूला कडवी झुंज देणाऱ्या अन नामोहरम करून सोडणाऱ्या धार पवार सरदारांना झुंझारराव हा खितांब..
१६) सरपाटील / पवार :- बहुसंख्य गावात आपल्या पराक्रमच्या जोरावर अनेक गांवची पाटीलकी मिळाल्याने सरपाटिल हा बहुमानाचा हुद्दा.. पुणे जिल्ह्यात कोंढवे धावडे गावात या घराण्याचे वास्तव्य.
१७) मोकाशी / पवार :- सैन्याच्या खर्च करण्याकरता मोकसा हा वतनी हुद्दा दिला जात असे. ह्यांना मोकासदार असे म्हणत. पवार घराण्याला अनेक ठिकाणी असे मोकसा वतन मिळाले. मोकासाचा अपभ्रंश होऊन मोकाशी हे उपणाम प्राप्त झाले.*
१८) घुमरे / पवार - बाराव्या शतकात देवगिरी यादव यांचे सहाय्यक. पारगाव घुमरा ची जहागिरी. घुमरा गाव वरून घुमरे पवार हे उपणाम प्राप्त झाले.*
१९) घोसाळकर / पवार :- कोकणात असणारे हे मूळ धार पवार घराणे. किल्ले घोसाळगड चे किल्लेदार व सभोवतिच्या गावच वतनदार असल्याने ह्या पवारांना घोसाळकर म्हणून ओळखले जाऊ लागले.*
२०) गुढेकर / पवार :- आजहि गुढेकर पवारांचा भग्न राजवाड्याच अवशेष त्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. भव्य गढीत राहणारे पवार गढीकर व नंतर गुडेकर पवार म्हणून ओळखले जाऊ लागले.
२१) राऊळ/राऊळराव पवार :- समशेरबहाद्दर हा ह्या राऊळराव पवार घराण्याचा खितांब. रावळनाथ देवाचे पुजारी व देवस्थान चे मुख्य मानकरी म्हणून राऊळराव हे उपणाव.
२२) बाघराव / बागवे पवार :- बहामनी कालखंडापासून तळकोकणात असणार हे वतनदार पवार घराणे. बाघराव ह्या खिताबचे पुढे बागवे नाव रुजू झाले.
गूढेकर , घोसाळकर , पटेल ,बणेराव, गढीकर , सावंत , सरपाटिल, विश्वासराव ,जगदाळे,झुंझारराव, पंडित,घुमरे,सोरटे, कवडे, पोकळे, भरम , वाघ , धावडे, नातू , वैद्य ,कांचन,धनवडे ,धारराव, दुधाने, कान्हेकर, हि धार पवार घरण्याची उपणावे...
उत्तर भारतात पणवार , परमार , पँवार , पुवार तर गॊवा भागात पोआर असा उल्लेख करतात.
श्रीमंत राजे पवार घराणे निरंतर...!!
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र..

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...