विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 1 September 2023

करवीर छत्रपती घराण्यातील अपरिचित अश्या महाराणी ताराबाई यांचे समाधी मंदिर..

 


करवीर छत्रपती घराण्यातील अपरिचित अश्या महाराणी ताराबाई यांचे समाधी मंदिर..
महाराणी ताराबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मोगलमर्दिनी रणरागिणी अश्या शिवस्नुष्या ताराराणी साहेब दिसतात.परंतु याच करवीरच्या छत्रपती घराण्यामध्ये आणखी एक प.पू. ताराबाई राणी होऊन गेल्या. त्यांची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत.. करवीर राज्याच्या स्थापनेनंतर छत्रपती राजारामपुत्र छ.संभाजी महाराज यांनी १७६१ पर्यंत राज्य सांभाळले तसेच करवीर राज्याची उन्नती झाली. त्यांच्या नंतर खानवटकर राजेभोसले घराण्यातून छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांना दत्तक घेतले.यांनी सर्वात मोठी कारकीर्द अनुभवली.यांच्याच काळात राज्याने बरेच चढउतार पाहिले. यांना दोन मुले छ. संभाजी/आबासाहेब महाराज आणि छ. शहाजी उर्फ बुआसाहेब महाराज यातील छ. संभाजी महाराज यांचा दुर्दैवी खून झाला. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू शहाजी उर्फ बुआसाहेब महाराज हे गादीवर आले. यांना एकूण दोन मुले- आनंदीबाई अर्थात ताराबाईराणीसो यांच्याकडून छ.शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराज आणि नर्मदाबाई राणीसो यांच्या कडून शाहू उर्फ चिमासाहेब महाराज १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात खंबीरपणे नेतृत्व करणारे हेच चिमासाहेब महाराज होय. जोत्याजीराव पाटणकर यांच्या कन्या म्हणजेच ताराबाईराणीसो होय. ताराबाईराणीसो यांना एकूण ४ अपत्ये झाली. २ मुले छ.शिवाजी महाराज उर्फ बाबासाहेब महाराज,यु.राजाराम आणि २ मुली आऊबाई आणि बाळाबाई सो इ.स १८५३ साली बाबासाहेब महाराज यांच्या मातोश्री आनंदीबाई उर्फ ताराबाई राणीसो या आजारी पडल्या व त्यातच त्या कालवश झाल्या. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छ.बाबासाहेब महाराजांनी संस्थान शिवसागर मध्ये समाधी मंदिर बांधले. ब्रिटिश चित्रकार सिडनी जेम्स याने २० डिसेंबर १८५८ मध्ये या समाधी मंदिर चे चित्र काढले जे ऑस्ट्रेलिया मधील सिडनी येथील एका संग्रहालयात पाहायला मिळते.
अपराजित🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...