आज उगविनारा भगवा सूर्य आकाशात
जरी चमकत असाल..!!
विडा उचलला होता माय भुमी रक्षण्याचा..!!
आन भगवा यवनांच्या छाताडावर
रोवण्याचा..!!
पानिपत समर भुमीवर पाय घट्ट रोवुन मराठ्यांचे लष्कर उभे होते, बुराडी घटावरील दत्ताजीरावांच्या बलिदानाचा जनु सुड़च उगवायची वाट बघत असलेले भासत होते, शिंद्याच्या तुकडीचे नेतृत्व महादजी बाबा,तुकोजी बाबा आन १६ वर्षाचा आयन जवानीत आलेला तरुण जनकोजी शिंदे मोठ्या दिमाखात करत होता..
दिल्ली पासून अजमेर बंगाल, उज्जैन धार बड़ोदे बाकनेर घौड दौड़ करुन छतीस महाल मिळवीणार्या ,त्या बदली शिंद्यानी मराठ्यांच्या दौलतीसाठी रक्त वेचल होत त्या राणोजीराव शिंदयाचे नातू जनकोजी होय.
जय्यापाराव शिंदयाचे ते पुत्र व त्यांच्या पश्चात दत्ताजीरावांनी तळहताच्या फोड़ा प्रमाणे त्यांना संभाळले होते जनकोजी बाबा वर त्यांची भिस्त असे जनकोजी आपल्या आज्या प्रामानचे पराक्रमी होते महादजी बाबा आन दत्ताबाच्या तालमीत तयार झालेले जनकोजी मत्सुदी व साहसी बनले,त्यांच्या रुपान मराठ्यांचा दौलती साठी शिंद्याची तीसरी पुढी खपत होती.,
बुराडी घाटाच्या रणसंग्रामा मध्ये दत्ताबा सोबत जनकोजींनी देखील मर्दुमकी गाजवीली होती,दत्ताजींनी देशरक्षण्यासाठी आपले प्राण वेचले बचेंगे तो और भी लढेंगे हा त्याचे वाक्य इतिहासात अजराम झाले..
दत्ताजींच्या हत्येच्या सूडाने उसळलेल्या जनकोजींनी कुंजपूरा येथे क्षत्रुच्या घरात घुसुन कुतुब शाहच्या धड़ा वेगळे मस्तक करून भाल्याला घुंफुन सैन्यात मिरवले,जनकोजी आन महादजी बाबांच्या मनातला सुडग्नि थोड़ा निवाळला असला जरी बुराडी घाट ही पानीपताच्या रण संग्रामची चिंगारी इतुनच पेटली..
१४जानेवारी १७६१ रोजी पानिपत भूमिवर मराठा आणि अफगान सैन्य सोमरा समोर आले,एककड़े सारा देश मकर संक्रातीच्या सनात मग्न होता दूसरी कड़े मराठ्यांनी एक जंग पुकारला होता..युद्धाची रणशिंग फुकली गेली,अब्दालीला मराठ्यांची एवढी दास्ती घेतली होती की म्हणून तो युद्धा भुमीच्या बाहेरुन दुर्बीनीच्या साह्याने तो पाहात होता..
मराठा सैन्यानी आप आपले मोर्चे लावले,जनकोजी आपल्या पतकास चेतवत होता,
हर हर महादेव जय भवानीचे जय घोष करून मराठ्यांचे सैन्य अब्दाली वर तूटून पडले,दना दना तलावरी आदळु लागल्या, हर हर महादेवचा जय घोष घुमु लागला,पहिल्याच तडाख्यात मराठ्यांनी अफगानी फळी सपा सप कापून काढली, चौतळलेला जनकोजी क्षत्रु वर वाघा प्रमाने तूटून पडला सकाळच्या प्रहारात मराठे अघाडिवर होते, सूर्य डोक्याव येताच मराठ्यांचे नशीब देखील फिरले उन्हाच्या तिरपीने तीन दिवस उपाशी असलेल सैन्य गरा गर चक्कर येऊन पडू लागले, रणात अनेक बंडाल्या माजू लागल्या,अफगानांनी मराठ्यांचे सेनापती टीपू घेतले, सेनापती कोसळताच मराठा सैन्याचे मनोधर्य खचले एकच हा हा कार माजला भगदड़ पडू लागली,अब्दालीनी नव्या दमाची फ़ौज उतरविली नव्या दमाच्या फौजे पुढे मराठे जास्त काळ टीकू शकले नाही, पाटिल बाबा एकी कडे शार्थीने झुंजत होते,पाटी मागून पायावर वार केल्याने महादजी कोसळले,ते बेशुद्ध अवस्थे मध्ये मूडदयाच्या ढिगा खाली गेले,तुकोजी देखील पडले..
उरले सुरले सैन्या घेऊन जनकोजी झुंजत होता, रक्ताने हात माखले होते साऱ्या अंगावर वार झाले होते आंगातले बळ मात्र तेवढेच होते,क्षत्रु कापत कापत जनकोजी जरी पटका झुंजवत ठेवत होता.
जनकोजी निशानापाशी झोंबु लागला, तोच त्यांच्या बाजूने जहानखानाने तोफा आणून लावल्या तोफा आग ओकु लागल्या तस तश्या मराठ्यांच्या छतीच्या चिंदद्या उडु लागल्या, नुसत्या तलावरीने मराठे झुंझनार तरी किती,
जनकोजी आपल्या पन्नास निधड्या छातीच्या विरांना सोबत कड़वी झुंज देत होता,समशेर गर गर तलवार नाचवत एक एक गनिम टिपत होता,मनगट सपा सपा चालत होती,इतक्यात अफगानी सैन्यानी त्यांना घेराव घातला वाघ जसा पिंजरयात अड़कावा तसा जनकोजी अडकला तरी जनकोजी गुर गुरत होते लढाई चालूच होती अचानक एक तड़ाखा मांडिवर पडला दूसरा तडाखा मस्तकात बस्ताच जनकोजी खाली कोसळले,भगव्या निशाना खातीर जनकोजी जेरबंद झाले, अफगानानी जनकोजीस साखळ दंडामध्ये जखेड़ले,वाघ गुर गुराव तसे जनकोजी गुरारत होते, जनकोजी बाबांना छावनीत नेवून त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून छावनीत गाडले,एवढी भयानक बलिदान स्वराज्यासाठी मराठ्यांच्या इतिहासात दोन झाले एक शिव पुत्र शंभूराजे व दूसरी जनकोजी बाबा....
No comments:
Post a Comment