विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 September 2023

#श्रीमंत_शिवराव_कृष्णराव_पवार ( तृतीय ) #नगरदेवळे, ता. पाचोरा ,जि. जळगाव येथिल #जहागीरदार , #सेनाबारासहस्री

 


#नगरदेवळे
, ता. पाचोरा ,जि. जळगाव येथिल #जहागीरदार , #सेनाबारासहस्री
#श्रीमंत_शिवराव_कृष्णराव_पवार ( तृतीय ) यांच्या जयंतीनिमित्त
श्रीमंत शिवराव पवार यांचा जन्म दि. 28 ऑगस्ट 1908 रोजी धार येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीमंत कृष्णराव तर आईचे नाव लक्ष्मीबाई ( सातारा जिल्ह्यातील मोळ येथील गुणाजीराव घाडगे ,झुंजार राव यांच्या कन्या) ह्या होत्या .श्रीमंत शिवरावांना वयाच्या सहाव्या वर्षी शिक्षणासाठी पुणे येथे पाठवले. वयाच्या तेराव्या वर्षा पर्यंतचे त्यांचे शिक्षण पुण्यातील सेंट हेलिना स्कूल मध्ये झाले. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे शिक्षण बडोदा येथे झाले.
पुढे श्रीमंत शिवराव पवार यांनी आपली जहागीरी नगरदेवळे येथे राहण्याचे निश्चित केले. श्रीमंत शिवराव पवार नगरदेवळ्यात राहून सार्वजनिक कार्यात भाग घेत असत. पूर्व खान्देश जिल्हा लोकल बोर्डाचे प्रेसिडेंट म्हणून त्यांनी सन 1935 पासून दोन वर्ष कारभार सांभाळला. सन 1942 मध्ये जिल्हा स्कूल बोर्डाचे चेअरमन म्हणून काम केले . ते ऑनररी मॅजिस्ट्रेट ही होते.
सन 1937 मध्ये बादशहा सहावा जॉर्ज याच्या राज्यरोहण प्रसंगी त्यांचा रौप्य पदकाने सन्मान केला गेला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (1939 ते 1945 ) त्यांनी ऑनररी ऑफिसर या नात्याने सैन्य भरतीचे कार्य केले होते.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीमंत शिवराव पवारांनी नगरदेवळे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून 21 वर्ष काम सांभाळले. त्यांनी आपल्या मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने
" लक्ष्मीबाई पवार " लायब्ररीची स्थापना नगरदेवळे येथे केली. त्यांनी झेंडा बुरुज ,नगारखाना , राम मंदिराचा जीर्णोद्धार इत्यादी बांधकामे केली. ते निष्णात शिकारी म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी उघड्यावर वाघाची शिकार करण्याचे धाडस ही केले होते.
श्रीमंत शिवराव पवार यांचे दोन विवाह झाले होते. प्रथम विवाह सोंडूर संस्थांचे अधिपती व्यंकटराव महाराज घोरपडे यांच्या कन्या सुशीला राजे यांच्या बरोबर तर दुसरा विवाह मालेगाव येथील श्रीमंत कृष्णसिंह शंभूसिंह राजेजाधव यांच्या कन्या माणिक बाई यांच्या बरोबर झाला होता.श्रीमंत शिवराव पवारांना 1941 मध्ये एक पुत्र झाला त्याचे नाव कृष्णराव ऊर्फ बाळासाहेब हे होते .
श्रीमंत शिवराम पवार यांना हृदय विकाराचा आजार सन 1953 पासून लागून पुढे ते सन 1956 मध्ये जळगाव येथे हृदयविकाराने दु:खद निधन झाले !
श्रीमंत शिवराव पवार यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!
महेश पवार
7350288953

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...