विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 September 2023

ऐतिहासिक वारसा घोरपडे घाट पुणे.

 














ऐतिहासिक वारसा घोरपडे घाट पुणे.
श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान आयोजित समारंभ.
१० फेब्रुवारी १८३१ रोजी यशवंतराव घोरपडे यांचे वंशज दौलतराव घोरपडे आणि पिराजीराव घोरपडे यांनी ‘घोरपडे घाटा’ची निर्मिती केली. पूर्वी या परिसरात दौलतराव घोरपडे यांच्या मातुःश्री बयाबाई घोरपडे यांची समाधी होती. या परिसरात कळकीची झाडे होती म्हणून परिसरास‘कळकीचा बाग’ म्हटले जात असे. हा घाट परिसर ब्रिटिश सरकार तर्फे दौलतराव घोरपडे यांना इनाम म्हणून देण्यात आला होता. या ठिकाणी त्र्यंबकेश्वर महादेवाचे भव्य मंदिर असावे असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. मात्र १९६१ मध्ये पानशेत धरण फुटून आलेल्या महापुरात या घाटावरील मंदिर समाध्या आणि कळकीचा बाग वाहून गेला . मात्र या घोरपडे घाटावरील मंदिराचे जागेवर महादेवाचे सुंदर शिवलिंग आणि नंदी सुस्थितीत होते. नदीकाठचा घाट मात्र सुस्थितीत आहे पण देखभाली अभावी दुरवस्था झाली आहे. दिंनाक २१ ऑगस्ट २०२३ रोजी सरसेनापती संताजीराव घोरपडे सरसेनापती पदग्रहण दिवस निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वरिष्ठ इतिहासकार आणि मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक व लेखक पांडुरंग जी बलकवडे उपस्थित राहुन घोरपडे घाटाची ऐतिहासिक माहिती उपस्थितांना दिली.
पुर्वी इथे कळकाची झाडी होती पण आता नाहीत , म्हणून प्रमुख पाहुणे आणि उपस्थित इतिहास प्रेमीच्यां हस्ते कळकाचे वृक्षारोपण करण्यात आले.
|| जय हो सरसेनापती संताजी बाबा ||

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...