१८५७च्या उठावातल्या काही दुर्लक्षित, उपेक्षित आणि बेदखल रणरागिण्या
लेखक :रमेशचंद पाटकर
राजघराण्याशी संबंधित असलेली दुसरी स्त्री म्हणजे राणी लक्ष्मीबाई, मनकर्णिका. त्यांचा जन्म वाराणसीच्या ब्राह्मण पुरोहिताच्या घरात झाला. झाशीचे महाराज गंगाधरराव यांच्याशी त्यांचा विवाह मे १८४१मध्ये झाला. विवाहानंतरचे त्यांचे नाव ‘लक्ष्मीबाई’ ठेवण्यात आले. त्यांच्या पतीचे वर्षभराने म्हणजे मे १८४२मध्ये निधन झाले. त्यानंतर लक्ष्मीबाईला दत्तकपुत्र दामोदर रावच्या नावाने राज्यकारभार करण्यास ब्रिटिश सरकारने संमती दिली नाही. त्यांनी तिचे राज्य खालसा केले. नाईलाजाने तिला निवृत्ती वेतनावर गुजराण करावी लागली.
मार्च १९५८मध्ये ब्रिटिश फौजांनी झाशीवर हल्ला चढवला. त्याचा तिने प्रतिकार केला. ब्रिटिश फौजेची सरशी होत असल्याचे पाहून लक्ष्मीबाई आपल्या पुत्राला बरोबर घेऊन किल्ल्यातून निसटली. ती काल्पीला गेली आणि तात्या टोपेंना जाऊन मिळाली. त्या दोघांनी पुन्हा ग्वाल्हेर जिंकले. ग्वाल्हेरच्या किल्ल्याबाहेर राणीची फौज आणि ब्रिटिशांची फौज यांच्यात घमासान लढाई झाली. त्यात आपला निभाव लागणार नाही, हे लक्षात आल्यावर ग्वाल्हेरपासून काही मैलांवर असलेल्या काठा-की-सराई येथून (१० जजून १८५८ रोजी) लक्ष्मीबाई पुरुषी वेशात घोड्यावर स्वार झाली, पण पळून जाण्यात यशस्वी झाली नाही. ब्रिटिश सैनिकाच्या गोळीला ती बळी पडली.
No comments:
Post a Comment