भाग २
१७९७
ते १८११ असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी
मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार
प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:ची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त
करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध र्सवकष अथक
लढा उभारला आणि बलाढय़ इंग्रज सेनांना एकामागून एक वेळा पराजित केले.
पण
मराठ्या आणि पेशवाई मधील कर्तृत्वान पुरुष म्हणजे शिवाजी महाराज ,संभाजी
महाराज, पहिला बाजीराव ,माधवराव, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस कडे
पहाताना आपण या होळकर च्या महान योद्धकडे दुर्लक्ष केले आहे यात वाद नाही.
यशवंतराव
होळकर यांचा जन्म १७७६ साली झाला.यशवंतराव हे मल्हारराव होळकर यांचे
दत्तकपुत्र तुकोजीराव यांचे धाकटे पुत्र. .यशवंतराव हे तुकोजीराव होळकर
यांना यमुनाबाई या दासीपासून झालेले पुत्र होते. त्यांना विठोजीराव हे
सख्खे, तर काशीराव व मल्हारराव हे सावत्रभाऊ होते. तुकोजीरावांनंतर
इंदूरच्या गादीसाठी तंटे सुरू झाले, तेव्हा काशीराव यांनी पेशव्यांचा, तर
दुसऱ्या मल्हाररावांनी सर्जेराव घाटग्यांचा आश्रय घेतला. शिंदे यांच्याकडून
दुसरे मल्हारराव भांबुर्ड्याच्या लढाईत मारले गेल्यानंतर (१४ सप्टेंबर
१७९७) यशवंतराव व विठोजी हे पुण्यातून उत्तरेकडे पळून गेले. दुसरे
मल्हाररावांचे पुत्र खंडोजी यांच्या नावे राज्यकारभार करण्याचे भासवून सर्व
होळकरांना एकत्र येण्याचे आवाहन यशवंतरावांनी केले. यशवंतराव हे
नागपूरच्या रघुजी भोसल्यांकडे आश्रयास गेले दुसरा बाजीराव आणि दौलतराव
शिंदे यांनी रघुजी भोसल्यांस यशवंतरावांस कैद करण्यास भाग पाडले परंतु
यशवंतराव मोठ्या चातुर्याने कैदेतून निसटले आणि धारच्या आनंदराव पवार
यांच्याकडे तीनशे स्वारांसह चाकरीस राहिले. पुढे त्यांनी गनिमी काव्याने
मध्य प्रांतातील मुलखात लुटालूट करून आसपासच्या संस्थानिकांकडून द्रव्य
संपादन केले आणि त्यातून पेंढारी, भिल्ल, राजपूत, अफगाण वगैरेंची मोठी फौज
तयार केली. दौलतराव शिंद्यांचा सूड घेऊन होळकरांची सत्ता पूर्ववत
स्थापण्याचा त्यांचा कृतसंकल्प होता.याशवंतरे हे क्रूर, धाडसी व शूर होते.
त्यांस दिल्लीच्या बादशहाने महाराजाधिराज राजराजेश्वर अलिबहादूर असा
बहुमानाचा किताब दिला होता. त्या वेळी त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी
सेनानायक नव्हता.पण त्यांची ही समृद्धी काही लोकांच्या डोळ्यांत खुपत होती.
गवाल्हेर चे शासक त्यावेळी दौलतराव शिंदे हे देखील होते. होळकर
साम्राज्याची ही समृद्धी त्यांना बघवत नव्हती.
No comments:
Post a Comment