भाग १
भारताचा
नेपोलियन म्हणून ज्याकडे पाहतात ते म्हणजे यशवंतराव होळकर…1803 पासून 18
युद्धात त्यांनी इंग्रजांना सतत परभुतच केले.रियासतकारांच्या मते
मराठेशाहीच्या अखेरीस यशवंतराव होळकर हे एक असामान्य पुरुष निर्माण झाले,
भले ते विक्षिप्त, धाडसी आणि क्रूर म्हणून प्रसिद्ध असले तरी.यशवंतरावांना
जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज
सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य
मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे
झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन.
दौलतराव
शिंदे आणि दुसरे बाजीराव यांनी मिळून यशवंतराव चे सख्खे भाऊ विठोजी होळकर
यांचा काहीएक अपराध नसताना सत्तेच्या नशेत धुंद असणाऱ्या बाजीराव आणि
त्याच्या साथीदारांनी विठोजीच्या हत्येचे फर्मान काढले. विठोजीला अपमानित
करत साखळदंडांनी बांधून हत्तीच्या पायाशी सोडण्यात आले. पिसाळलेल्या
हत्तीने विठोजीचा चेंदामेंदा करून टाकला. विठोजीच्या हत्येची बातमी
यशवंतरावाला समजली आणि भावाच्या हत्येच्या बातमीने तो पेटून उठला.
बाजीरावाची आणि त्याच्या साथीदारांची सत्तेची नशा उतरवण्यासाठी यशवंतराव
पुण्यावर चालून आले. दौलतराव शिंद्यांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी
यशवंतरावांनी दक्षिण मोहीम काढून घोरपडी, वानवडी, हडपसर व बारामती या
लढायांत शिंदेव पेशवे यांच्या फौजांचा पराभव केला आणि मराठ्यांची राजधानी
पुणे लुटली. भ्याड बाजीराव पुणे सोडून पळून गेला. विठोजीच्या हत्येनंतर
खरेतर यशवंतराव फार दुःखी झाले होते. तरीही त्यांनी बाजीरावाशी बोलणी
करण्याची तयारी केली. परंतु यशवंतराव आपणाला जिवंत सोडणार नाही असे
वाटल्याने चर्चेची सारी निमंत्रणे धुडकावून बाजीरावाने पलायन केले.दुसऱ्या
बाजीराव नें केलेली चुकीचे फळे आपण आजपण भोगत आहोत .त्यांनी 1803 नंतर
एकही लढाई आपल्या माणसांच्या विरुद्ध लढली नाही
No comments:
Post a Comment