नोव्हेंबर १८५७ साली लखनौच्या सिकंदर बागेत ब्रिटिश सैनिकांबरोबर कडवी लढाई झाली. सिकंदर बाग बंडखोरांच्या ताब्यात होता. कोलिन कॅम्पबेल रेसिडेन्सीमध्ये अडकून पडलेल्या युरोपियन कुटुंबांना तिथून दुसऱ्या जागी घेऊन जात असताना बंडखोरांच्या तावडीत सापडला. बंडखोर आणि कॅम्पबेलच्या सैनिकांत तुंबळ लढाई झाली. त्यात शेकडो भारतीय सैनिक ठार झाले.
त्या वेळी एका झाडावर बसून एक ‘पुरुष’ ब्रिटिश सैनिकांवर गोळ्या झाडत होता. गोळ्या झाडता झाडता तो झाडावरून खाली पडला. जेव्हा त्याची झाडाझडती घेतली, तेव्हा तो पुरुष वेशीतील स्त्री असल्याचे लक्षात आले. ही स्त्री म्हणजे उदादेवी. ती पासी या दलित समाजातील होती. या पराक्रमी स्त्रीचा लखनौच्या सिंकदर बागेबाहेर पुतळा आहे.
No comments:
Post a Comment