विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 23 September 2023

प्रतिके_होळकरशाहीच्या_गर्भ_श्रीमंतीची

!! #
!! #

प्रतिके_होळकरशाहीच्या_गर्भ_श्रीमंतीची
!!
#लालबाग_पॅलेस, इंदोर (होळकर राजघराण्याचे शाही निवास्थान) - सन १८८६ साली "महाराजा तुकोजीराव राव होळकर दुसरे" यांनी महालाचे बांधकाम सुरू केले ते त्यांनी आपले पुत्र महाराजा शिवाजीराव होळकरांसाठी, सदरचे बांधकाम हे "महाराजा तुकोजीराव होळकर तिसरे" यांच्या कार्यकाळात म्हणजे १९२१ साली पूर्ण झाले. #इंदोर_मधील_७२_एकर मध्ये बांधलेले लालबाग पॅलेस हे होळकर राजघराण्याने बांधलेले त्याकाळातील एक चमत्कारीत बांधकाम होते. हे पॅलेस होळकरांची जीवनशैली, श्रेष्ठता आणि त्यांच्या रुबाब शाही इतिहासाला प्रतिबिंबीत करते. हा राजवाडा सुंदर उद्यानांसह आधी #देशातील_सर्वोत्तम_गुलाबाच्या बागेसाठी प्रसिद्ध होता. त्याच्या लक्षवेधी वास्तू सह आणि विस्तीर्ण पसरलेल्या त्याच्या क्षेत्रफळा मुळे लालबाग एक जीवंत स्मारक असल्या सारख भासत. हे महाल यूरोपियन शैलीमध्ये तयार केले आहे, ज्या मध्ये सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांचा समावेश त्याकाळात होता, उदा. लिफ्ट . या राजवाड्याचा सर्वात सुंदर भाग म्हणजे स्वयंपाक घर जे नदीच्या एका बाजूस स्थित आहे, ही नदी राजवाड्या जवळून वाहते. हे स्वयंपाक घर राजमहालास भूमिगत रस्त्याने जोडले आहे आणि त्याला लिफ्ट ची पण व्यवस्था आहे. राजमहलाचे प्रवेश द्वार, हे लंडन मधील बकिंगहॅम पॅलेस सारख बनवण्यात आलाय, ज्याच्या गेट वर होळकरांचे #कुलचिन्ह (राजचिन्ह) आहे.
ही वास्तू म्हणजे होळकरांच्या आधुनिक बांधकामातील उत्कृष्ट स्थापत्यप्रेम दर्शवते. महाराजा तुकोजीराव होळकर (तृतीय) यांनी जो विदेश दौरा केला त्यातून जे जे सुंदर ते सर्व ला लालबाग मध्ये आहे.
आतील वैभव पाहून डोळे दिपतात. या प्रसादाचे वेराकी आणि रेनेसा शैलीचे आहे. पहिल्या दालनात संगमेश्वरी भिंत आणि खांबाच्या गुळगुळीत पृष्ठभागावरून लाटांसारख्या लहरणाऱ्या रंगलहरी आकर्षित करतात. लाकडी दरवाजावरील डिजाईन सोनेरी रंगाने नाटविलेली आहे. दरवाजाच्या वरील बाजूस राजचिन्हे दाखविलेली आहेत. छतावरील आकर्षक डिझाईन आणि मध्यभागी विविधरंगी काचेचे चकाकणारे झुंबर जागोजागी दिसतात. दरबार हॉल, डासींग हॉल, शयनगृह, वस्तुसंग्रहालय अशी वेग वेगळी दालने आहेत.
या राजप्रासादातील फर्निचर प्रत्येक दालनाला साजेसे आहे, युरोपियन पध्दतीचे आहे. दरबार हॉल मधील सोनेरी रंगाचे सिंहासन, मखमली रेशमी कपडा आच्छादित खुर्च्या, सुंदर डिझाइनचे लुसलुशीत गालिचे, काचेचे दीप, झुंबर, शोभिवंत पडदे आशा कलात्मक वस्तूंनि सजवलेले आहे. इतर दालनामध्ये लाकडी काम केलेली कपाटे, संगमरवरी टॉपची टेबल्स, मोठी घड्याळे, आरसे, मेणबत्यांचे स्टँड अशा इतर वस्तूंनी मांडणी चांगल्या प्रकारे केलेली आहे. शयनगृहात पलंगावर चांदीचे नक्षीकाम केलेले आहे.
या महालात भिंतीवर तसेच छतावर चित्रे काढलेली आहेत. ही चित्रकला ग्रीक आणि रोमन शैलीत आहेत. एका मोठ्या चित्रामध्ये ग्रीक देवता हेलीओस चार घोड्यांच्या रथातून चाललेली आहे. चित्रातील वेगाने दौडणारे पांढरे घोडे आणि गुलाबी रंगाची छोटी बालके मोहक वाटतात. छतावरील गोलाकार चित्रामध्ये सभोवती वाद्य वाजविणारे आणि मध्यभागी प्रज्वलीत ज्ञानज्योत हातात घेतलेली स्त्री चित्रित केलेली आहे. या चित्रातील फिकट रंगकाम आकर्षित करते. चित्राच्या सभोवती डिझाईन फ्रेम आहेत. भिंतीवर गोलाकार फ्रेममध्ये गोंडस बालकांची चित्रे आणि त्या फ्रेम दोन्ही बाजूंना स्त्रियांची मूर्तीचित्रे जोडलेली आहेत.
वस्तुसंग्रहालय जुनी नाणी, हत्यारे, राजांचे अंगरखे, फेटे, इतर पोशाख, राजांचे फोटो, चित्रे, पेंटिंग्ज आणि मोठे वाघ शिकार करून आणलेले पाहता येतील. बाहेरील गार्डन मध्ये या घराण्याचे व इंदोरचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांचा भव्यदिव्य आकर्षक पुतळा बसवलेला आहे.
संकलन :- अवधूत लाळगे
फोटो साभार :- जयदीप राव बिंगळे (सरकार)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...