विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 23 September 2023

जाधवगढी ( गढी ) सासवड, पुणे












जाधवगढी ( गढी ) सासवड, पुणे
ह्याला 'गड' असे म्हटले, तरी 'रायगड', 'सिंहगड' यासारखे हे भव्यदिव्य प्रस्थ नाही. भुईकोट किल्ला किंवा एखादी गढीच म्हणा ना ! हा गड आणि आजूबाजूचा १५ एकराचा परिसर ही जाधव घराण्याची व्यक्तिगत मालमत्ता आहे.
सुमारे तीनशे वर्षापूर्वी जेव्हा संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज गादीवर आले तेव्हा मराठा साम्राज्याचे कोल्हापूर आणि सातारा असे दोन छत्र झाली. सातारामध्ये शाहू महाराजांच्या छत्राखाली जे सरदार गोळा झाले त्यात पिलाजीराव जाधवराव यांचा समावेश होता.
त्यांच्या अंगी असल्याले शौर्य आणि तलवारीचे पाणी ह्याच्या जोरावर त्यांनी शाहूराजांच्या सेवेत बरीच मर्दुमकी गाजवून ते राजांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळात पोहोचले. २१ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत काढून आलेल्या शाहूराजांना गादीवर बसविण्यात पिलाजीरावांचा सिंहाचा वाटा होता. सरसेनापती धनाजी जाधव यांच्या म्रत्यनंतर पिलाजी राव जाधव हे छत्रपती शाहू महाराज यांचे प्रमुख सल्लागार होते. उत्तरेकडील अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये त्यानी मोठा पराक्रम गाजवला होता. मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात अनेक सरदारांबरोबर पिलाजीराव जाथव यांचा मोठा सहभाग होता. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना सासवड, मल्हारगाव,आणि आसपासची काही गावे जहागीर म्हणून मिळाली.
सासवड हे शाहू महाराजांचे प्रमुख ठाणे होते. सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचं जाधववाडी गाव होतं. सासवड या जहागिरीवर लक्ष राहावे यासाठी त्यांनी जाधववाडीमध्ये एका प्रचंड गढी बांधली होती
तोच हा जाधवगड. तिथे महाराष्ट्रातील एकमेव हेरिटेज हॉटेल विकसित केले. . .
पृथ्वीराज माने सरकार

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...