' विजयदुर्ग विजयी राहिला '
साल
होते 1719 माणकोजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या मराठी
सैन्याने खांदरीच्या किल्ल्यावर इंग्रजांचा धुव्वा उडवला होता. यावेळी
मुंबईला इंग्रजांचा गव्हर्नर होता चार्ल्स बुंद. या बुंदने पुन्हा एकदा
विजयदुर्गाची मोहीम काढण्याचे ठरवले. त्याला अंग्र्यांवर सुड घायचा होता.
इंग्लंड मधल्या डायरेक्टर न पटवून त्यांच्याकडून मोठे मदत त्यांनी मागून
घेतली मुंबईला बांधल्या जाणाऱ्या नवकात एक मात्र विशेष होती तिच्या बाबतीत
विशेष गुप्तता बाळगली जात होती. तिला फ्लोटिंग फॉर्ट्रेस्ट म्हणजे तरंगता
किल्ला असे म्हटले जात होते. तोफांच्या गोळ्यांना दाद न देण्याची व्यवस्था
या तरंगता किल्ल्यात केली गेली होती. 48 Pond 12 तोफा त्यावर बसवल्या
गेल्या होत्या. हा तरंगता किल्ला विजयदुर्गवर नेऊन विजयदुर्ग जिंकण्याच
स्वप्न बुंदने बाळगल होत. या तरंगत्या किल्ल्याचे नाव होतं फ्राम.
अडमिनरल
अल्टर ब्राऊज या नाविक अधिकाऱ्याला विजयदुर्ग ची मोहीम सोपवण्यात आली.
अवघ्या इंग्रजी आरमाराचा भार तो सांभाळणार होता. लंडन - चांडोस - विक्टरी -
रेवेंज - पेल्हाम - देफियन्स - टेरर बॉम्ब अशी अनेक जहाज त्यासोबत होती.
तरंगता
किल्ला म्हणजेच फ्राम त्यांना दाभोळ मध्ये सामील होणार होता. लंडन या
प्रचंड युद्ध नवके वर आपला झेंडा चढवला. 13 सप्टेंबर 1720 रोजी
विजयदुर्गाच्या दिशेने निघाला. विजयदुर्ग मध्ये रुद्राजी अनंत अत्यंत
हिम्मतवाला किल्लेदार होता. विजयदुर्ग लढवायची त्यांनी पूर्ण तयारी केली
होती.
अडमिनरल ब्राऊज याने टेरर बॉम्ब हे जहाज पुढे केलं. पण त्यावरचे
गोळे हे पाण्यातच पडू लागले. ते किल्यावर पोहचेनात. फार जवळ गेलं तर
किल्ल्यावरून तोफेचा मारा होई. आणि त्याचे गोळे जहाजावर येऊन पडत.आता
त्याला आता सैन्य किनाऱ्यावर उतरवून विजयदुर्ग हल्ला करायचा होता त्यासाठी
जागा शोधण्याचे काम सुरू झालं याच दरम्यान तरंगता किल्ला लवकर पाठवणे विषयी
त्याने चार्ल्स बुंदला निरोप पाठवला. निरोप मिळताच फ्रामला सागरात
ढकळण्यात आल. बुंद च स्वप्न आता पाण्यावर तरंगत होत. तरंगता किल्ला
सागारात येताच इंग्रजांना कळालं की त्याचं वजन इतक जास्त आहे की फ्राम ला
वेगच घेता येत नाहीये. त्याला ओढून नेण्यासाठी इतर मोठी जहाज वजन कमी करून
लावण्यात आली. हा सारा प्रकार पाहिल्यावर आता इंग्रजाच धाब दणाणल. फ्राम
मुंबई बंदरातच लटकून होते. आपल्या सर्व लोकांना खुश ठेवण्यासाठी त्याने
दारू पिण्याची मुभा दिली आणि मग काय कित्येक लोक दारू पिऊन त्याच्या
जहाजांवरतीच आडवे झाले आता फ्राम येईपर्यंत कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता.
फ्राम कशीबशी विजयदुर्ग जवळ आणण्यात आली. हे जहाज नवीनच तयार केले गेले
असल्याने यावरून पूर्वी तोफांच्या मारा कधी झालाच नव्हता. यातून मारा कसा
होतो याबद्दल सर्वांचेच मनात खूपच उत्सुकता होती. उद्राजी अनंत आणि मावळे
हे इंग्रजी संचालन पाहत होते हा काय नवीन प्रकार आहे हे त्यांनाही कळत
नव्हतं. धुक बाजुल सरल अन् ते अवाढव्य जहाज त्यांना दिसलं. फ्रामवरच्या
गोलंदाजांनी तोफांना बत्ती दिली. धुरान सर्व वातावरण कोंधून गेलं. इंग्रज
धूर जाण्याची वाट पाहत होते तो गोळ्यांचा धूर बाजूला झाला तसे इंग्रजांचा
मनातला भ्रम ही दूर झाला. तोफा उडालेले गोळे विजयदुर्ग पर्यंत पोहोचलेच
नव्हते. ते गोळे फक्त 20 - 30 यार्ड गेले. मग त्यांनी जास्तच दारू ठासाली
आणि गोळे पुन्हा उडवले. धूर बाजूला होतातच समजल की ह्या ही वेळेला गोळे काय
पोहचले नाहीत. विजयदुर्ग वरून मराठी आनंद व्यक्त करत होते त्यांनी तोफातून
गोळे ही सोडले. त्यातला एक गोळा फ्राम वर जाऊन पडला पण त्यानं काही नुकसान
तसे झाले नाही. इंग्रजानी त्या साऱ्या बांधणीची पाहणी करायचं ठरवलं. फ्राम
काही वेळ मागे गेलं इंग्रजांचे स्वप्न दुसऱ्यांदा विरलं. एवढे पैसे खर्च
करून तयार केलेला आहे एवढा मोठा तरंगता तोफखाना किंवा तरंगता किल्ला फ्राम
याचा आता काही उपयोग होत नव्हता त्यावरच्या तोफांचा काडी इतका परिणाम होईल
विजयदुर्गवर झाला नव्हता.विजयदुर्ग वरची मराठी निशान डौलाने फडकत होती.
अडमिनरल ब्राऊज ने आता नवीन खेळी खेळायच ठरवलं. आरमारातील सैनिक आणि खलाशी
यांना किनाऱ्यावर उतरून विजयदुर्ग हल्ला करायचा असं ब्राऊज यांनी ठरवलं.
तरंगता किल्ला पाठीमागे गेला आणि सैनिकांना किनाऱ्यावर उतरण्याच्या आदेश
ब्राऊज ने दिले. तत्पूर्वीच खांदेरीच्या लढाईत मराठ्यांकडून भक्कम मार
खाल्लेले सैनिक मात्र या याकरता नाखुश होते. ब्राऊज ने आधी समजावलं मग
धमकावल मग हुकुमही केले. पण कशाचाही परिणाम होत नव्हता. अखेर निराश होऊन
प्रत्येक उतरणाऱ्याला चाळीस रुपये देण्याचं त्याने जाहीर केलं त्याचाही
काही उपयोग झाला नाही. आजवरचा अनुभव बघता या किनाऱ्यावर उतरण्यास कोणी तयार
नव्हतं कारण आपण जर मराठ्यांच्या तावडीत सापडलो तर आपली काही खैर नाही हे
इग्रज सैन्य जाणून होत.
तिकडे ती फ्राम पाठीमागे नेऊन त्याची पाहणी
करण्यास आली. तोफेचे गोळे लांब वर का जात नाहीत यासाठी इंग्रजी गोलंदाजांची
तुकडी त्या जहाजाची पाहणी करत होती. तोफेच्या खिडक्या खूपच खाली होत्या.
आणि तोफेच्या गाड्यांची रचना अशी होती खूप वाकवल्या शिवाय तोफ उडवणेनी शक्य
नव्हत. ही होती इंग्रजी बांधणी. आणि इतक्या मोठ्या युद्धनौकेला वल्लवत
जाणाऱ्या मराठी होड्या त्या आश्चर्य कार्यकर्त्या चकवत होत्या. आता फ्राम
ची दुरुस्ती सुरू झाली गोळ्यांना आणि तोफांना दाद न देणाऱ्या कडेच्या भिंती
त्यांना काही प्रमाणात फोडाव्या लागणार होत्या ब्राऊज ने कपाळावर हात
मारून घेतला. आरमारातील सर्व सुतारांना फ्रामवर आणून त्याने घाईघाईने
कामावर जुंपले. दोन दिवस हे सर्व काम सुरू होते. फ्राम मागे गेल्यानं
चांडोस आणि पेल्हाम ही जहाज पुढे आली. चांडोस वरचे काही सैनिक चाळीस रुपयात
किनाऱ्यावर उतरायला तयार झाले होते मग इतरही काही खलाशी त्यांच्यासोबत
जाण्यास तयार झाले. चांडोस जहाजावर 59 आणि इतर सर्व मिळून एकूण 180 लोक
होते अस आपल्याला कागद पत्रातून दिसून येत. फ्राम दुरुस्तीस दिवसां दिवस
दिरंगाई होत होती. ऍडमिरल वॉटर आणि गव्हर्नर चार्ल्स बुंद च्या
स्वप्नांच्या अशा रीतीने ठिकऱ्या उडत होत्या. 19 सप्टेंबर 1720 हा प्रचंड
हल्ल्याचा दिवस म्हणून ठरवण्यात आला. तोवर बरेच सैनिक आणि खलाशी
बक्षिसाच्या अशाने किनाऱ्या उतरण्यास तयार झाले होते. 2-3 दिवसात फ्राम ची
दुरुस्ती कशीबशी करून तो तरंगता किल्लाही तोफा डागण्यास पुढे आला. लेफ्टनट
व्हॉईज याला याता फ्राम चा कमांडर नेमण्यात आला.
इंग्रजी आरमाराची
बरीच जहाज खलाशी किनाऱ्यावर उतरण्यास पुढे गेली होती. त्यांच्या पाठोपाठच
फ्राम हे जहाज होतं. फ्राम वरून डागलेले गोळे हे विजयदुर्ग तर सोडूनच द्या
परंतु पुढे गेलेल्या इंग्रजी जहाजांवरच पडतात की काय अशी स्थिती निर्माण
झाली. नशीब हेच की फ्राम ने इंग्रजांच जहाजच तळाला पोहोचवलं नाही, यातच आता
इंग्रजांना समाधान मानावं लागलं. इंग्रजांनी तुफान भडीमार चालू ठेवला, इतर
जहाजातूनही तोफा उडत होत्या. इंग्रजांच्या अशा पल्लवीत होत होत्या.
तेवढ्यात विजयदुर्ग वरून मराठी तोफा धडाडू लागल्या. त्यातला एक गोळा तर थेट
फ्रामवर आदळला. फ्राम एका बाजूच्या भिंतीला आग लागली ज्या बाजूच्या भिंती
त्यांनी कापून खाली केल्या होत्या तोफा जाण्यासाठी नेमकी तीच बाजू आता पेट
धरू लागली होती. मराठी प्रतिकार पाहिल्यावर किनाऱ्या उतरणारे इंग्रजांचा
धीरज खाचला केवळ पैसे मिळणार आहेत म्हणून ते उतरणार होते. पूर्वी खाल्लेला
गोपण गुंड्याचा मार यांची आठवण काय विसरले नव्हते. जहाजातून छोट्या होड्यात
उतरलेले इंग्रजी लष्कर हे घाबरून पुन्हा जहजात चढू लागलं. मराठी
प्रतिकाराची त्यांना चांगलीच जरब बसली. हा प्रकार दूरवर दुर्बिणीतून
पाहणारा ब्राऊज आता हाताश झाला होता. विजयदुर्ग वरून विजयाच्या आरोळ्या उठत
होत्या, भगवा फडफडत होता. इंग्रजांचा डाव पुन्हा एकदा हुकला होता. ऍडमिरल
ब्राऊज आता दिवसा ऐवजी रात्री तोफांचा भडीमार करण्याचा ठरवलं.
फ्राम
रात्री हळूहळू विजयदुर्गाच्या आसमंत आली. आता तोफांचा भडीमार करण्यासाठी
गोलंदाज वाट पाहू लागले होते. लेफ्टनट व्हॉईज च्या हुकमाची ते वाट पाहत
होते. पण लेफ्टनट व्हॉईज होता कुठे. तो दारू पिऊन लाश होऊन पडला होता.
त्याला कशाचीही शुद्ध नव्हती. इतरही बरेच खलाशी दारू पिऊन बेहोश झाले होते.
जे काय थोडेफार शुद्धीवर होते त्यांनी आता फ्राम वरून तोफा डागण्याचं
ठरवलं. त्यांच्या मनास येईल तसा भडिमार सुरू केला, त्यात नियंत्रण नव्हते
ना काही संचालन. त्याचा परिणाम एवढाच झाला की मोहिमेच्या अधिकाऱ्यांची एकच
धांदल उडाली. रात्रीच्या अंधारातही विजयदुर्ग जागा होता. मराठी फौज वाटत
पाहत होते. रुद्राजी आनंद हे अतिशय जागरूक होते. कान्होजी आंग्रे यांनी
त्यांना योग्य वेळी सर्व रसद आणि सूचना पाठवल्या होत्या. फ्राम पुढे येऊन
तोफा डागत आहे हे पाहिल्यावर त्यांनी किल्ल्यावरून तोफांचा मारा सुरू केला
हा मारा अचूक झाला. मराठे काही दारू प्यायलेले नव्हते. मराठी तोफेचे दोन
गोळे असे काही आदळले की त्यामुळे जहाजाच बरच नुकसान झालं. फ्राम ची सुमारे
15 लोक ठार झाली, पंचवीस - तीस लोक जखमी झाले. आणखी एक गोंधळ झाला, फ्राम
एक तोफ डागताना swiggle झाली आणि ती जहाजावरच फुटली तिच्या जवळची माणसं
मृत्युमुखी पडली. आणखी एक तोफ होती ती उलटी फिरली आणि समुद्राच्या दिशेने
उडाली तिच्यातला एक गोळा दुसऱ्या एका इंग्रजी गलबतावर जाऊन पडला. इंग्रजी
फौजेत हाहाकार उडाला. त्या गलबतावचे निम्मे लोक आगीत होळपळले. अशा गडबडीत
बिचाऱ्या ब्राऊज ची अवस्था खूपच कठीण होती. विजयदुर्ग वरून हे सर्व
न्याहळणाऱ्या रुद्राजी अनंतांचा चेहरा मात्र आनंदात होता.
ऍडमिरल ब्राऊन
पोटात आता गोळा आला होता. इंग्रजांना थोडी सुखाची झालर होती की तोफेचे
काही गोळे हे मराठी अरमारावर जाऊन पडले होते, मराठी आरमाराची थोडी नासधूस
झाली होती. ऍडमिरल ब्राऊन ही बातमी बुंद ला जोरात कळवली, की बरीच जहाजे
नष्ट केले आहेत त्यात पाचशे टन एक मोठा जहाज आणि 200 टनांच एक आणि दहा
लहान जहाज असं काही पाण्यात बुडवलय. आमचं मात्र काहीच नुकसान झालं नाही,
अशी त्यांनी एक खोटी बातमी बुंद कळवली. इंग्रजी जहाज पुन्हा एकदा खोल
समुद्रात निघून गेलं. काही केलं तरी मराठी दात देत नव्हते एवढा सारा खटाटोप
वाया जाणार की काय अशी धास्ती
ब्राऊन ला वाटू लागली. काही काळ
परिस्थिती आजमावी, जहाजांची दुरुस्ती करावी आणि नक्की काय करावं म्हणजे
विजयदुर्ग हातात येईल या सर्व गोष्टींवरती निर्णय घ्यावा आणि आपल्याला
कळवावा असं त्याने चार्ल्स बुंद कळवल. झालं युद्ध आता लांबणीवर पडल.
त्यामुळे खलाशी पुन्हा दारू पिऊन लाश झाले. इंग्रजचा वेळ असा वाया चालला
होता. तितक्यात वाडीकरांचा सावंताकडून निरोप आला, अंग्र्याच्या विरुद्ध मदत
करायला सावंत आता तयार होते. पण त्याची एकच अट होती. विजयदुर्ग पासून 7-8
कोस दूर असलेला देवगड आपल्याला जिंकून द्यावा ही मात्र सावंताची अट होती.
लढाई
थोडी लावणीवर पडली आहे त्यामुळे ब्राऊज देवगड च्या दिशेने निघाला.
सावंतानी फौज येणार असे सागितले होते पण ती काय आलीच नाही. इंग्रज आता फसत
चालले होते वेळ आणि पैसा सगळाच वाया चालला होता. ऍडमिनल ब्राऊन आता पूर्ण
आता हताश झाला. त्याच्या दोन्ही मोहिमेचा बोजवारा उडाला होता. सैनिकांना
दारू देण्यापाई अर्धी लोकं ती पिऊन लाश झाले होते. सैनिक हे वरिष्ठ
अधिकाऱ्यांचा हुकूम पाळत नव्हते.
फ्राम सारख्या तरंगता किल्ल्याचे
स्वप्न सत्यात कधीच उतरले नाही त्यामुळे इंग्रजांचे उलट नुकसानच झाले होते.
झाली तेवढी हनी खूप झाली आता थोडीतरी आब्रू वाचून आपण परत निघाव या
विचारांना ब्राऊन आपले इंग्रजी जहाजांचा काफीला घेऊन मुंबईस परत जाण्यास
निघला. इंग्रजांचा काफीला विजयदुर्ग जवळ येतात तो थोडा पुढे गेला असेल नसेल
तोच दोन मराठ्यांच्या जहाज त्यांना दिसली आता मराठ्यांच्या जहाज आपल्या
पाठीवर आहेत. हे कळतच इंग्रजी काफिल्याच धाब दाणानल आणि मराठ्यांची जहाज
पिछाडीवर असताना इंग्रजी जहाज मुंबईच्या दिशेने वेगाने जाऊ लागले. दरम्यान
त्यांना लांबून काही चाचे ची जहाज येताना दिसली. चाचे म्हटल्यावर अनेकांची
गाळण उडाली. ब्राऊज आपलं जहाज विजयदुर्ग कडे नेण्याचा पुनः हुकूम दिला
चाचे आणि मराठी यांच्यामध्ये इंग्रजी आरमार आता अडकल होत. या वेळेला मात्र
इंग्रजी डाव वेगळाच होता.
विजयदुर्ग जवळ आपली सर्व जहाज येण्याची असं
ब्राऊनला वाटत होतं. इंग्रजी जहाज दिसल्यावर विजयदुर्ग वर धावपळ सुरू झाले.
आपल्या जहाजांनी इंग्रजी आरमार हे खोल समुद्रात पळउन लावले आहे अशा
विश्वासात मराठे किल्ल्यावरती बसले होते. परंतु अचानक त्यांना इंग्रजी
आरमार पुन्हा दिसू लागले. रुद्राजी आनंताने तोफा तयार ठेवण्यास सांगितलं.
इंग्रजी विजयदुर्गाकडे येत होती खरी परंतु त्यावरून तोफा धडाधडत नव्हत्या.
कसलं तरी भीतीने हे आरमार विजयदुर्ग जवळ येत आहे हे दुरूनच रुद्राजी
ओळखलं. त्यांनी आता सावधगिरीने वागायचं ठरवल. तोवर इग्रजी जहाजाची संख्या
पाहून, चाचे ची जहाज अंधारात दिसेनाशी झाली. ब्राउज आपला काफिला मुंबईकडे
नेण्याचा हुकूम दिला होता आणि चाचे ची जहाज जशी मागे फिरली तसं विजयदुर्ग
जवळ आलेला ब्राऊन हा पुन्हा लटपटला विजयदुर्ग हल्ला देण्याचा हुकूम त्याने
मागे घेतला आणि तो पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाला सकाळ होईत तोवर सारी
इंग्रजी जहाज तीतरबितर पसरली होती. काही मुंबईच्या दिशेने काही
विजयदुर्गाचा आसमंतात तर काही चाचे च्या पाठीवर. ही सारी इंग्रजी जहाज
इकडे तिकडे पसरलेली आहेत हे दिसतात रुद्राजी आनंताने तो मोका साधला. मराठी
आरमार आता वघोटणाच्या खाडीतून निघालं आणि इंग्रजांच्या आरमाराच्या पाठीवर
लागलं. मराठी आरमाराने इंग्रजांवर समुद्रातच हल्ले केले. अंग्र्याच्या दोन
गलबता वरून जोरदार तोफांचा मारा इंग्रजी आरमारावर होऊ लागला. त्यात दोन
मोठी जहाज तिथेच बुडाली. आता यात विलक्षण गोष्ट घडली. चाचेची जहाज दूरवर
गेलीच नव्हती, दिवे नेहमीप्रमाणे विझवले गेले. इंग्रजांचा जहाजाचं नाव
विक्टरी होत, आणि चाचेच्या एका जहाजाचं नाव पण विक्टरी होत. चाचेच्या
जहाजावरुन सुटलेला एक गोळा इंग्रजांच्या विक्टरी या जहाजावर येऊन पडला.
हाकारे आणि कुकारे यांनी वातावरण कोंदून गेलं आणि विक्टरी या नाम
साधर्म्यामुळे संभ्रम निर्माण झाला. इंग्रज विक्टरी अशा ओरडल्याने चाचेनी
एकदम जोरदार तोफाची सरबती सुरू केली. यात इंग्रजांचा गोंधळ उडाला नेमक्यात
कुठल्या विक्टरीला हा संदेश गेला आहे हे दोन्हीही पक्षांना कळत नव्हतं.
त्यात भर म्हणून काही इंग्रजी जहाजांचाही गोळीबार सुरू झाला. अंधारात नेमकं
काय होतं हे कळण्याऐवजी सगळीकडे गोंधळ उडालाला अर्थात आपलं नुकसान होऊ नये
असं दोन्ही बाजूंना वाटतं होत. युद्ध सदृश झालेली ही परिस्थिती काय वेळाने
शांत झाली. दोन्ही बाजूंनी उडणारे तोफ गोळे हे बंद झाले. चाचेचा जो
मोरक्या होता त्याचं नाव पिटर इंग्लंड असं होतं. इंग्रजांचे तारांबळ
उडलेली पाहताच त्याने casentra हे त्याचं जहाज इंग्रज आरमारत घुसून चौफेर
आतिषबाजी सुरू केली. मोठा गदारोळ सुरू झाला. चाचे प्राण पणाला लावून लढत
होते. इंग्रजांना काय करावे हे समजत नव्हतं. इकडून मराठे तिकडून चाचे अशा
कात्रीत ते अडकले होते. लंडन या ध्वज नौकेचा कॅप्टन आपटन याने आता चाचेच्या
गोळीबाराला उत्तर देऊ नये असं सांगितलं ही जहाजे चाचेच्या साठी नाहीत तर
विजयदुर्गच्या बंदोबस्तासाठी आहेत त्यामुळे ती मोहीम पूर्ण करावी अस त्यानं
ब्राऊज ला सांगितलं. अन् ब्राऊज ने लगेचच नौके वरीची सर्व निशाणे खाली
उतरून चाच्यान पासून जहाज दूर नेण्यास सांगितली. या निर्णयामुळे
इंग्रांजमध्येच मतभेद झाले. त्यामुळे एक गट उघड उघड ब्राऊजला शिव्या देऊ
लागला. या गदारोळात मात्र इंग्रजांचे विजयदुर्ग बुडवण्याच्या स्वप्न आता
पार पाण्यात मिळत होते.
या दरम्यान मराठ्यांनी पुन्हा एकदा इंग्रजी
आरमारावरती हल्ला चढवला. बहुदा यावेळी या हल्ल्यात खुद्द कानोजीं आंग्रे
उपस्थित होते. पूर्वी इंग्रजाचेच लुटून आणलेले Charlotte जहाज यावेळी
कानोजीं नेतृत्वाखाली खाडीतून पुन्हा उतरले त्यांनी इंग्रजांच्या आरमारा
वरती निकराचा हल्ला चढवला. हा चढवलेला असताना विजयदुर्ग वरून रुद्राजी अनंत
यांनीही जोरदार तोफा डागल्या. कडून चाचे चा हल्ला दुसरीकडे स्वतःच्या
जहाजांवरची उतरलेली निशाण. उतरलेल्या निशाणाचा अर्थ असा की आपण हल्ला करू
नये म्हणून इंग्रजांचे स्वतःचे जहाज हल्ला करत नव्हती. इकडून रुद्रजी अनंत
हा विजयदुर्ग वरून इंग्रजी आरमारा वरती तोप गोळे डागत होता. इंग्रजाची
अक्षरशः समुद्रावर चटणी होत होती. इंग्रजांनी आता एक नवीनच मार्ग शोधून
काढला गोवेकर पोर्तुगीजांकडे आश्रयाला जावे म्हणून ते आता गोव्याच्या
दिशेने पळत सुटले. अडमिरल ब्राऊजची आता पूर्ण नाचक्की झाली होती. लोक
त्याच्या नावाने शिवीगाळ करत होते. इंग्रजी जहाजे आता विजयदुर्गवरून जात
असताना मराठ्याच्या आरमारातून तोफाचा जोरदार मारा सुरु झाला. आता आंग्रेच
आरमार पाठीमागे येणार या भीतीने ब्राऊज आणि त्याचे लोक गर्भगळीत झाले.
इंग्रजांना एका नव्या भयाने सतावले. 'फ्राम' हा तरंगता किल्ला आता वेगाने
त्यांना नेता येईना. कान्होजी आंग्रेंचा पराभव करण्यासाठी त्यांनी या
अवाढव्य किल्ल्याची योजना केली होती. पण या योजनेचा आता बोजवारा उडाला
होता. सुरुवातीपासूनच फ्राम ला वेगाने जात आहेत नव्हते. वेळोवेळी फ्राम
खेचून देण्यासाठी इतर जहाज जोडावी लागत होती. चाचे मागावर असताना चांडोस
नावाचं एक जहाज फ्राम ला खेचून नेण्यासाठी कामाला लागले. या फ्रामला खेचून
न्यायचे असल्यामुळे चांडोस चा हि वेग कमी झाला. यावेळी आंग्रेंच आरमार ही
बाहेर निघालं आणि त्यांनी थेट चांडोस वरच हल्ला सुरू केला. फ्राम आता
आंग्रेंच्या किंवा चाचेच्या हातात पडेल अशी परिस्थिति आता निर्माण झाली
होती. ब्राऊज ला आता निर्णय घ्यावा लागलाच. फ्राम ला इंग्रजानी आग लावली.
जहाज त्यावरचे तोफा, साहित्य शत्रूच्या हातात जायास नको म्हणून इंग्रजानी
ते पेटून दिले. जहाज जळून ते बुडाले पार रसातळाला गेले. इंग्रजी स्वप्नांचा
आता चक्काचूर झाला होता. तरंगता किल्ला सागराच्या तळाशी गेला. इतका पैसा
ओतून परिश्रम करून मोठ्या अपेक्षा ठेऊन बांधलेल्या या जहाजाचा हा असा अंत
झाला. कान्होजी आंग्रेंच आरमार विजयदुर्गावर परत आले. रुद्राजी अनंतानी
विजयाची तोफ उडवली. मराठी आरमारात आनंद पसरला. परिश्रम करून आणि अपेक्षा
ठेऊन बांधलेल्या या मोठ्या फ्राम जहाजाचा असा अंत झाला.
' विजयदुर्ग विजयी राहिला '
मूळ लेखन : शिवभूषण निनाद बेडेकर
( टीप : कदाचित काही इंग्रजी शब्दाचे उच्चार वेगळे असू शकतात. )
No comments:
Post a Comment