विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 11 September 2023

केसोपंत आणि त्यांचा एक चाकर राघो खोपडे

 

औरंगजेबाला स्वराज्यावर तुटून पडून एक वर्ष होऊन गेलं तरी स्वराज्य अजून अभेधच होते. अनेक आघाड्‌यांवर त्याला पराभवच स्वीकारावा लागला. रामसेजचा किल्ला काही केल्या जिंकला जात नव्हता.
याच काळात धनाचा प्रयोग करून बादशहाने त्र्यंबकगड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. हा गड शंभूराजांच्या ताब्यात होता. तेथील किल्लेदार केसो त्रीमल हा गुप्तपणे रामसेजला दारुगोळा आणि रसदेचा पुरवठा करत होता. पुरवठा बंद पाडण्यासाठी मुजफरखान, बहरामंदखान, अनामतखान त्र्यंबकगडावर चालून गेले पण केसोपंत त्यांची डाळ शिजू देईनात. त्र्यंबकगड घेण्यासाठी औरंगजेब आता आटोकाट प्रयत्न करू लागला.
केसोपंतांनी बादशहाची थट्टा करायचं ठरविलं त्र्यंबकगडावरील त्यांचा एक चाकर राघो खोपडे एक दिवस आनमतखानाकडे आला. मोगलांची चाकरी करण्याची इच्छा व्यक्त करून त्यानं अर्जी केली की, 'बादशाही कृपा झाल्यास रक्ताचा एक थेंबही न सांडता मी बादशहाला त्र्यंबकगड मिळवून देतो.' औरंगजेब खुष झाला. राघो खोपड्याला त्यानं ताबडतोब शाही चाकरीत घेतलं त्याला ७०० जात आणि २०० स्वारांचा मान बहाल करून काही रोगा पैसेही बक्षीस दिले. हे सर्व घेऊन घेऊन राघो घोरपडे खोपडे त्र्यंबकगडावर आला. तिथून त्यानं बादशहाला कळवलं कि,
'मी भरपूर प्रयत्न केले पण केसो त्रीमल फितुर व्हायला तयार नाही. त्यामुळे मी इथून.पळून जात आहे!'
संदर्भ = राजा शंभूछत्रपती - शिवकथाकार विजयराव देशमुख
क्र. =९८- ९९

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...