विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 October 2023

सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध) भाग १

 


सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १
पूर्वार्धात आपण बघितलं की १६७० नंतर दक्षीणेतील राजकारण किती अस्थिर झाले होते व पठाणां विरुद्ध पूर्ण दख्खनमध्ये नाराजी पसरली होती. दक्षीणेचे राजकारण दक्षीणेतील सत्तांकडेच राहील हा शिवछत्रपतींचा दृष्टिकोन होता. थोडक्यात १६७६च्या सुरुवातीस एकंदर दक्षीण भारताच्या राजकारणात पुढील स्थिती आली होती -
१) खवासखान मारला जाऊन आदिलशाहीत पठाणांचे वर्चस्व वाढले होते.
२) बहलोलखानाच्या पक्षातील शेरखान लोदिच्या महत्वकांक्षेमुळे दख्खन मधील हिंदू राजे व कुत्बशहा संकटात होता.
३) व्यंकोजीराजांच्याकडे तंजावर आले होते.
४) कुत्बशाहीत मादण्णा - अक्कण्णांचा उदय झाला होता.
५) मुघल सरदार बहादूरखानला बहलोलने युद्धात हरवल्याने त्याने दख्खनमधील बहलोलच्या सर्व शत्रूंना एकत्र केले होते.
६) मुघलांकडून दिलेरखान पठाणाने विजापूरच्या बहलोलखान पठाणाशी संधान बांधले व धूर्तपणाने पठाणांचे अस्तित्व दख्खनमध्ये टिकवून ठेवले होते.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती महाराजांनी दक्षीणेत उतरायचे का ठरवले? ह्याचा विचार करुया. सर्वप्रथम दक्षीणेत उतरायचा विचार नक्की कुणाचा? महाराजांचा की व्यंकोजीराजांशी बिनसल्याने महाराजांकडे आलेल्या रघुनाथपंत हणमंतेंचा? कारण रघुनाथपंतांचे वडील नारो त्रिमल हणमंते हे शहाजीराजांकडे मुजुमदारी कारभारावरती होते. त्यांचे दोन्ही पुत्र रघुनाथपंत व जनार्दनपंत हे तिथेच वाढले. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर हे कुटुंब व्यंकोजीराजांच्या पदरी होते. व्यंकोजीराजे जिंजीत असताना, १६७५ मध्ये व्यंकोजींशी बिनसल्याने रघुनाथपंत कुटुंबासह महाराजांकडे आले. येताना ते बहुदा कुत्बशाहीत मादण्णांना भेटून आले व तिथले राजकारण घेऊन महाराजांच्या मनावरती ते बिंबबले असे शिवोत्तरकालिन बखरकार म्हणतात. मात्र ह्या मोहिमेची संकल्पना महाराजांचीच होती हे तीन गोष्टिंवरुन स्पष्ट होते एक म्हणजे खुद्द सभासद म्हणतो - "तुंगभद्रा देशापासून कावेरीपर्यंत कर्नाटक साधावे हा हेत मनी धरीला, त्यास लष्कर पाठवून साधावे तरी दिवसागतीवर पडते म्हणून खुद्द राजियांनी आपण जावे असे केले."

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...