श्रीगोंदा शहरातील शंभो महादेव मंदिरातील #पोर्तुगीज घंटी :#श्रीगोंदा शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत यात चालुक्य कालीन लक्ष्मी मंदिर,कालिका मंदिर ,हेमाड पंत म्हणत असले तरी हे चालुक्य कालीनच पांडुरंग मंदिरा बरोबर शहरात एकूण १०८मंदिर आहेत यातली अनेक मंदीर पुरातन आहेत यातील एक मंदिर .तसेच इथ छत्रपती मालोजी राजे याच्या पासून #छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यंत आणि नंतर शिंदे सरकार चे अधिपत्य राहिले आहे. अनेक मंदिराच्या दिवाबत्ती ची सोय छत्रपती आणि #शिंदे सरकारांनी केली आहेत.तसेच पराक्रमी अहिल्यादेवी #होळकर यांनी बांधलेले बारव, मंदीर घाट, ओहऱ्या देखील तालुक्यात आहेत.यातील एक मंदिर म्हणजे मेनरोड चे #शंभो #महादेवाचे मंदिर याचा निर्मिती चा निश्चित कालखंड जरी सांगता येत नसेल तरी इथे सात,आठ पुरातन वीरगळ आहेत.या वीरगळ मध्ये गाईचे रक्षण करताना वीर मरण आलेली वीरगळ, समोरासमोर युद्धांत वीर मरण आलेल्या वीरगळ आहेत.याच मंदिराची रचना दोन टप्प्यात असून पुढे गोलाकार कळस रचनेत संपूर्ण दगडी रचना असून आत गर्भगृह देखील दगडीच आहे.दहा कोपरे ,महिरप असलेली रचना याच ठिकाणी मध्ये कासवाच्या वर अडकवली आहे. ती मोठी घंटा बलदंड साखळदंडात अडकवलेली असून ती घंटा इतिहास अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय रहात नाही. त्याचे कारण ही तसेच आहे. इथे ही घंटा कुठल्या पेशवेकालीन मराठा सरदाराने अर्पण केली याची कुठे नोंद नसली तरी मी शिवाजी साळुंके आणि मित्रांनी निरक्षण केले असता या घंटे वरील अक्षरात पोर्तुगीजांनी १७१५साली बनवलेली असून यावर क्रॉस बरोबर काही पोर्तुगीज अक्षरे कोरलेली आहेत. मग हा संदर्भ जातो थेट पराक्रमी पेशवे चिमाजी आप्पा कडे चिमाजी आप्पा च्या नेतृत्वाखाली अनेक मराठा सरदारांनी थेट वसई म्हणजे गोव्यातील पोर्तुगीज सत्तेला सुरुंग लावला इथल्या पोर्तुगीजांनी केलेल्या हिंदू समाजाच्या छळ आणि धर्मांतरा विरोधात चिमाजी आप्पा नी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. निकराची लढाईत त्यांनी वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर त्यांनी मराठ्यांची सत्ता स्थापन केली. पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ म्हणजे चिमाजी अप्पा. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होते. ही लढाई जिंकत चिमाजींनी थोरले बंधू बाजीराव पेशवे होते . वसईची लढाई जिंकून त्यांनी पोर्तुगीजांचे त्या वर्चस्व नष्ट केले. 17 फेब्रुवारी 1739 रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी मोठ्या शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. अत्यंत चिकाटीने चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसईच्या किल्ल्याला वेढा घातल्यानंतर गनिमी काव्याच्या सहाय्याने त्यांनी किल्ल्यावर हल्ले चालूच ठेवले. या हल्ल्यातच पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मारला गेला. सेनापतीच्या मृत्युपश्चातदेखील पोर्तुगीजांनी लढा सुरूच ठेवला. हातबॉम्ब, बंदुका, उखळी तोफा यांच्या सहाय्याने त्यांनी मराठ्यांचा प्रतिकार चालूच ठेवला. आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्ग बंद केले होते. तेथूनही रसद मिळणे बंद झाले. त्यानंतर 16 मे 1739 रोजी वसईच्या किल्ल्यावर मराठयाचा जरी पटका फडकवला .
वसई वर मराठयाच्या वर्चस्वानंतर मोहिमेवरून आल्यावर इथल्या चर्च मधल्या अनेक मोठ्याला घंटा महराष्ट्रातील मंदिरात मराठा सरदारांनी अर्पण केल्या आहेत.यात जेजुरी, शिंगणापूर यासह अन्य मंदिरात आणि विशेष म्हणजे श्रीगोंदा शहरातील शम्भो महादेवाचे मंदिरात मराठ्यांच्या या पराक्रमाच्या हा गजर आजही सुरू आहे. श्रीगोंद्यात असणारी शम्भो महादेवाच्या मंदिरातील ही घंटेची माहिती देत आहे. यावेळी शहरातील इतिहासप्रेमी भाऊ दीक्षित, संदीप चौधरी सर ,अरविंद नाना कासार, आदित्य अनवणे,अनिकेत राऊत यासह मित्रमंडळी उपस्थित होती.
शिवाजी साळुंके ,पत्रकार ९८९००५४३४३
No comments:
Post a Comment