सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध)
भाग ५
या लेखाच्या
दृष्टिने कर्नाटकच्या राजकारणासंबधी पुढची महत्वाची गोष्ट अशी होती की,
हिंदुस्थानच्या राजकारणात आपले बळ वाढवायला १६५३ नंतर औरंगजेबाने ज्या
हालचाली केल्या त्यातली एक गोष्ट म्हणजे त्याने गोवळकोंड्याचा वजीर मीर
जुम्ल्याला फोडून आपल्याकडे घेतले व त्याच्या मदतीने कुत्बशाही गिळायचा
प्रयत्न सुरु केला. त्याने थेट गोवळकोंड्यालाच वेढा दिला. मात्र शहाजहानने
आपल्या मुलाला आवर घालण्यासाठी तो वेढा उठवण्याचे फर्मान सोडले. औरंगजेबाने
नाईलाजाने ते फर्मान मान्य केले पण त्याने कुत्बशाही आपल्या पंखाखाली
घेण्यासाठी कुत्बशहाकडून युद्धखर्च तर घेतलाच पण कुत्बशहाला त्याची मुलगी
जबरदस्तीने आपला मुलगा सुलतान मुहम्मद याला देण्यास भाग पाडले. इतकं करुन
औरंगजेब थांबला नाही. १६५६ मध्ये इब्राहिम आदिलशहाचा मृत्यू झाला आणि अली
आदिलशहा गादीवरती आला. हा अनौरस असल्याने गादिवरती बसवू नये असा विचार
करणारा एक गट होता. औरंगजेबाला अशी संधी हवीच होती ह्या गटाची तळी उचलून
त्याने आता विजापूरवरतीच हल्ला चढवला. विजापूरकरांची पळापळ सुरु झाली.
दिल्लीपर्यंत पत्रे जाऊ लागली, मोठी युद्धे होत होतीच. याच लढायां दरम्यान
अफझलखानाला एक संधी मिळाली होती ज्यात त्याने औरंगजेबाला जवळपास कैद केले
होते. परंतु औरंगजेबाने विजापूरच्या वजीराशी पत्र व्यवहार केला व मला काही
झाले तर दिल्लीवरुन फौजा येऊन विजापूरची धूळधाण करतील अशी गर्भित धमकी
दिली. ज्यामुळे त्याने अफझलखानाला न कळवताच औरंगजेबाला निसटून जाऊ दिले
होते. औरंगजेबाने एप्रिल १६५७ मध्ये बिदरचा किल्ला जिंकला, ३१ जुलै १६५७
रोजी कल्याणी जिंकली. याच अनागोंदिचा फायदा करुन घेऊन महाराजांनी त्यावेळी
मोठ्या चलाखीने आपण विजापूरच्या जिंकलेल्या प्रदेशाला औरंगजेबाची मान्यता
मिळवून घेतली होती. २३ एप्रिल १६५७ रोजी औरंगजेबाने पाठविलेल्या पत्रात तो
लिहितो - "..... सांप्रत जे किल्ले व मुलुख तुमचे हाती होते ते
पेशजीप्रमाणे होऊन तुमचे मनोगतान्वये बंदर दाभोळ व त्याखालील मुलुखाचा
महसुल तुम्हास दिला असे!" यानंतर मोजून एका आठवड्याने ३० एप्रिल १६५७ या
दिवशी महाराजांनी जुन्नर हे मुघली ठाणेच लुटले. पाठोपाठ मीनाजी भोसले व
काशीपंतांनी श्रीगोंदे व नगरपर्यंत धडक मारली.
सांभार :सांभार : सांभार : http://sahajsuchalamhanun.blogspot.in/2012/12/blog-post.html
No comments:
Post a Comment