शरभ, हत्ती, व्याल, व्याघ्र इत्यादी शिल्पांसोबत एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आढळून येते ते म्हणजे दोन तोंडाच्या पक्ष्याचे. मनुष्याचे किंवा पक्ष्याचे एक धड, पण दोन तोंडे आणि दोन पंख असणाऱ्या या पौराणिक पक्ष्याला गंडभेरुंड असे म्हणतात. त्यापूर्वी या पक्ष्याला भारुंड, भेरुंड किंवा भोरंड या नावाने ओळखले जात असे.
संस्कृत मध्ये भेरुडा या शब्दाचा अर्थ भयंकर असा होतो.
गंडभेरुंड: देशीताल: गंडभेरुंड तालोय गजाभ्यांमुपरिस्थल: लक्ष्मण: हस्त:
कपितथहस्तयोरर्मिलात्स्वास्तिकेनैव संभवेत गंडभेरुंड संज्ञाके विनियोगस्तु तत्र च गौरीमतम
याशिवाय ऋग्वेदात, अथर्ववेदात, मुंडक व श्वेताश्वेतर या पक्ष्याचा उल्लेख आल्याचे आपणास आढळून येते.
भेरुंड हा शब्द कदाचित भारुंड या शब्दाचा अपभ्रंश असावा. भा(बा) म्हणजे दोन आणि रुंड म्हणजे मुख. तर हे दोन शब्द मिळून भारुंड असा शब्द झाल्याचे नाकारता येत नाही. अशा रीतीने गंडभेरुंड हा शब्द तयार झाला असेल.
गंडभेरुंड हा पक्षी ताकदीचे आणि शौर्याचे प्रतिक मानला जाई आणि त्याचा संदर्भ बऱ्याच जणांनी विष्णूचे वाहन असणाऱ्या गरुडाशी जोडलेला आहे.पक्षाचे अथवा अर्धमानवाचे धड असणारे गंडभैरुंड हे विष्णूचे एक पौराणिक रूप मानले गेले आहे.
गंडभेरुड याच्या उत्पत्ती बद्दल एक दंतकथा सांगितली जाते ती म्हणजे भगवान विष्णूंनी नृसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. मात्र त्याला खून चढल्याने घाबरून जाऊन सर्व सृष्टीने भगवान शंकरांकडे याचना केली. तेव्हा त्यांनी शरभाचे रूप घेऊन नरसिंहाचा अवतार संपवला. तेव्हा भगवान विष्णूंनी गंडभैरुंडाचे रूप धारण करून शरभाशी झुंज दिली. त्यामुळे गंडभैरुंड हे महाशक्तीचे प्रतीक मानले गेले.
11 व्या शतकापासून, राजेशाही शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून गंडभेरुंड दक्षिण भारतात अत्यंत लोकप्रिय झाले. चालुक्य, कदंब, आंध्रातील काकतीय, कर्नाटकातील होयसळ आणि त्यांचे उत्तराधिकारी, विजयनगरच्या राजांनी, गंडभेरुंड यांसारख्या विविध राजघराण्यातील अनेक राजांनी राजेशाही चिन्ह तसेच उपाधी म्हणून दत्तक घेतले.
दक्षिण भारतात गंडभैरुंडाचा वापर अनेक राज्यकर्त्यांनी राजचीन्ह म्हणून केलेला दिसतो. त्यामध्ये कदंब ( इ.स. ३ ते ६ वे शतक ), चालुक्य ( इ.स. ६वे ते ८वे शतक ), होयासळ ( इ.स. ११०० ते इ.स. १३१४), आणि विजयनगर ( इ.स. १६३६ ते १६६७) ही राजघराणी दिसतात.
महाभारत, पंचतंत्र, जैन ग्रंथ यामधून भारुंड या शब्दाचा अर्थ वाचस्पस्पत्य भयंकर असा येतो. पण कालांतराने दाक्षिणात्य संस्कृतीच्या संबंधामुळे त्याला 'गंड' हे नामाभिदान लागले असावे. विजयनगर साम्राज्यातील शिल्पकला, नाण्यांवरील चित्रे, सम्राटांनी धारण केलेली बिरुदे यावरून गंडभैरूंडाला हत्तींचा विनाश करणारा गजसंहारक म्हणून मान होता हे नक्की.
कृष्णदेवराय सुद्धा ' गजोध गंडभैरुंड ' म्हणजे शत्रुरुपी हत्तींना गंडभैरुंडासारखा वाटणारा असे बिरूद मिरवीत असे.
आज कर्नाटक राज्याचे प्रतीक म्हणून गंड भेरुड हे चिन्ह वापरले जाते.
गंडभैरुंडाचे पक्षिरुप आणि अर्धमानवी असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्याचप्रमाणे इतर अनेक उपप्रकार देखील आहेत.
महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर ,मंदिरे समाध्या याच्यावर गंडभैरुंड दिसून येते. त्यामध्ये शिवनेरी, , नळदुर्ग, गाविलगड वगैरे येतात. तसेच राजाराम महाराज समाधी स्थळ .तळेगाव येथील खंडेराव दाभाडे समाधी स्थळ भुईंज येथील रायाजी जाधवराव समाधी.तसेच सिंदखेड राजा येथील लखुजी राजे जाधवराव याच्या समाधीवर हे शौर्याचे,पराक्रमाचे ,एका महासत्तेचे ताकदीचे व सामर्थ्यचे प्रतीक म्हणून कोरलेले दिसते.
राजे लखुजीराव जाधवराव हे भगवान श्रीकृष्ण यांच्या कुळाचे वंशज होते, म्हणुनच त्याना जदुराय कांतीया हा किताब होता व त्यांच्या समाधीवर श्रीकृष्ण शिल्प देखील कोरलेले आहे.
राजे लखुजी जाधवराव यांनी मुसलमान आमदानीत इतर मराठा सरदारांशी समन्वय साधून मराठा सत्ता एकत्रित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. आणि शिवपूर्व काळात मराठा उत्कर्षाच्या काळात प्रामुख्याने राजे लखुजी जाधवराव व त्याच्या घराण्यातील सर्व मंडळीने स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेली आहे ही आहुती मराठा स्वराज्याची पहाट होती.
संदर्भ.1...gandbherud and it's evolution.
2..दुर्ग द्वार शिल्प..
No comments:
Post a Comment