यांना पुण्यतिथी निमित्त
याच पवार कुळातील काळोजी पवार सुपेकर यांचे पुत्र जिवाजीराव पवार ( देवास धाकट्या पातीचे पहिले महाराज ) यांचेही नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. जिवाजीराव पवार यांनी आयुष्यभर अनेक मोहिमांमध्ये पराक्रम गाजवून स्वराज्याची सेवा इमानइतबारे केली.
छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेने उत्तर हिंदुस्थानावर मराठ्यांनी ज्या स्वार्या केल्या त्या बहुतांश मोहिमांमध्ये जिवाजीराव पवार हे आपले मोठे बंधू तुकोजीराव पवार (देवास मोठ्या पातीचे पहीले महाराज ) यांच्याबरोबर सामील होते. इसवीसन १७१५ मध्ये पन्नास हजारांची फौज नेमून मोगलांचा ताबा असलेल्या खान्देश , गुजरात , माळवा प्रांतावर ज्या स्वार्या करण्याचा हुकूम छत्रपती शाहू महाराजांनी दिला होता , त्या मोहिमेत काळोजी पवार हे तुकोजीराव , कृष्णाजीराव व जिवाजीराव ह्या आपल्या मुलांसोबत होते.
माळवा प्रांताच्या मोहीमेसाठी जे सरदार नेमण्यात आले होते त्या सरदारांमध्ये पवार घराण्यातील संभाजी पवारांचे पुत्र उदाजीराव, आनंदराव व काळोजी पवारांचे पुत्र तुकोजीराव ,जिवाजीराव हे प्रामुख्याने होते. १७१९ च्या दिल्लीच्या स्वारीतही तुकोजीराव व जिवाजीराव या बंधूंनी पराक्रम गाजविला. १७२३ व २४ मध्ये माळवा प्रांतावर मराठ्यांचा अधिकार होण्यासाठी ज्या लढाया झाल्या, त्यातही जिवाजीराव पवार हे आपले बंधू तुकोजीराव पवार यांच्या सोबत सामील होते.
पवारांची ही कामगिरी पाहून १७२४ च्या जुलै महिन्यात पवारांना सामायिक धार व झाबुआ या परगण्यांचा मोकासा देण्यात आला. माळव्यात सुभेदार गिरीबहाद्दर याच्याशी १७२६ मध्ये सारंगपूर येथे मराठ्यांची जी लढाई झाली त्यात गिरीबहाद्दरचा सपशेल पराभव झाला. या लढाईत तुकोजीराव पवार व जिवाजीराव पवार यांनी मोठा पराक्रम गाजवला.
१७२८ मध्ये मराठ्यांची निजामाशी पालखेड येथे लढाई झाली होती, त्यातही निजामाचा पराभव झाला या लढाईत तुकोजीराव पवार व जिवाजीराव पवार हे दोघे बंधू सामील होते .बुंदेलखंड ची मोहीम, वसईची मोहीम, कुंभारी चा वेढा अशा अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या लढ्यांमध्ये जिवाजीराव पवार यांचा सहभाग होता. जून १७५४ मध्ये मारवाड प्रांतावर मराठ्यांनी जी स्वारी केली त्यात तुकोजीराव पवार व जिवाजीराव पवार हेही सामील होते. या स्वारीत नागोरला वेढा दिला असताना तुकोजीराव पवार यांचे दिनांक १६/११/१७५४ रोजी दुःखद निधन झालं. त्यांचे मृत्यू नंतरचे सर्व सोपस्कार जिवाजीराव पवारांनी पुष्कर येथे पार पाडले.
यानंतर लागलीच जिवाजीराव पवार जोधपूरच्या वेड्याच्या कामगिरीवर गेले.मारवाडच्या स्वारीत मराठ्यांना जी खंडणी मिळण्याचा करार झाला, त्यातील दरसदे सात रुपये (७) कृष्णाजीराव पवार ( देवास मोठ्या पातीचे २ रे महाराज ) व जिवाजीराव पवार यांना मिळाला होता.
दत्ताजी शिंदे यांनी १७५८ मध्ये रूपनगर, इंद्रगड, सरकार रणथंबोर, सुभा अजमेर येथे खंडणी वसूल करण्याच्या वेळी जिवाजीराव पवार त्यांच्यासोबत होते . मराठ्यांची प्रसिद्ध लढाई पानिपताचे युद्ध यातही जिवाजीराव पवार आपल्या सेनेसह होते.
पानिपतच्या युद्धानंतर महादाजी शिंदे यांनी पानिपताचा बदला घेण्यासाठी १७७१ मध्ये दिल्लीवर स्वारी केली व दिनांक ११ फेब्रुवारी १७७१ ला दिल्लीच्या किल्ल्यावर मराठ्यांचे निशाण चढवले. या स्वारीत महादजी शिंदें बरोबर जिवाजीराव पवार सामील होते .
अशाप्रकारे जिवाजीराव पवार यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्याची सेवा केली .
अशा या पराक्रमी योध्यास पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन !!
महेश पवार
७३५०२८८९५३
No comments:
Post a Comment