वसईला येताच प्रथम पेशव्यांनी वसईच्या किल्ल्याला वेढा घालून तलासरी पासून वेसाव्या पर्यंतचा परिसर जिंकून घेण्याचा सपाटा चालवला.. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या या शिरगाव किल्ल्यावर चिमजी आप्पांनी १७ नोव्हेंबर १७३७ ला मल्हारराव हरिदासाला किल्ला ताब्यात घेण्यासाठी पाठवले, एक दोन दिवस नाही तर डिसेंबर संपत आला तरी शिरगावचा किल्ला फत्ते होत नव्हता शेवटी मराठ्यांनी २८ डिसेंबरला १७३७ ला शिरगावचा वेढा उठवला.. पण लगेचच नव्या कुमकेनिशी नव्या दमाने मराठ्यांनी सन १७३९ च्या सुरुवातीला जानेवारी मध्ये शिरगावचा वेढा करकचून आवळला...
वेढा जबर आवळून धरल्यामुळे पोर्तुगीजांचा दमच निघाला.. पोर्तुगीजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करून शिरगावचा किल्ला मराठ्यांच्या हवाली केला तो विजय दिवस होता, २२ जानेवारी १७३९....
———————————
No comments:
Post a Comment