विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 November 2023

अंकलीकर_शितोळे_आणि_ #माऊलींची_पालखी

 

राक्षसभुवन लढाईतील लढवय्ये महादजी शितोळे व त्यांचे भाऊ इंग्रजी अमंल बसेपर्यंत १८१८ पर्यत मयत झाले होते यामधे महादजी यांचे दत्तकपुत्र आपाजीराव शितोळे (थोरल्या महादजीचे पणतू) व बापुजी शितोळे असे दोन मुले होती इंग्रजांना कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी मराठा सरदारांची गरज होती त्यासाठी त्यांनी आपाजीराव शितोळे यांना कोल्हापूर भागात होणारी लुटमार,दंगे, दरोडे यांचा बंदोबस्त करण्यासाठी विनंती केली जी त्यांनी मान्य करून त्या भागात शांतता आणि सुव्यवस्था आणली १८२८पर्यत सर्व कारभार हाती घेत इंग्रजांनी आपासाहेब यांना साडेतीन पोशाखाचा मान, दिवानी व फौजदारी खटला चे अधिकार बहाल केले
याच दरम्यान याकाळातील प्रसिद्ध पुरूष हैबतरावबुवा यांना असा दृष्टांत झाला की "श्री आपाजीराव शितोळे व त्यांची धर्मपत्नी रमाबाईसाहेब शितोळे यांस श्रीक्षेत्र आळंदी येथे आणून त्यांना गादीचे शिष्य करावे व त्यांच्या कडून पालखीच्या मिरवणूकीची सेवा करून घ्यावी.यांचे नंतर आपाजीराव शितोळे यांच्या वशंजाकडून सेवा करून घ्यावी . तसेच आपाजीराव शितोळे यांच्या पत्नी रमाबाईसाहेब शितोळे यांचेकडून प्रत्येक महिन्याला पंढरीची वारी करून घ्यावी " असा दृष्टांत झाला. यानंतर हैबतरावबुवा यांनी आपाजीराव शितोळे यांस त्यांच्या पत्नी सह आळंदीला पाचारण केले त्यांचे गळ्यात माळा घालून त्यांस आपले शिष्य बनवले आणि झालेला दृष्टांत ऐकवला. श्रींच्या आज्ञेचा श्रद्धापूर्वक स्वीकार करून श्री आपाजीराव शितोळे हे गादीची एकनिष्ठपणे सेवा करू लागले व रमाबाईसाहेब ह्या प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशी ला पंढरपूर ची वारी करू लागल्या. त्यांच्या स्वारी सोबत श्रीपादराव कामत या नावाचे कारकुन जात असत याप्रमाणे सतत #चाळीस वर्षे . (४०वर्षे मधील प्रत्येक महिन्याला वारी ) त्यांनी वारी केली पुढे त्यांची प्रकृती अशक्त झाल्याने त्यांचे कडून वारी होईना म्हणून ती करण्याचा प्रघात कामत घराण्यातील इसमांनी सुरू ठेवला. व त्यांनी प्रत्येक तीन महिन्यांनी वारी करण्याचा क्रम सुरू ठेवला.त्या वारीच्या खर्चाप्रीत्यार्थ श्री आपाजीराव ऊर्फ आपासाहेब शितोळे यांनी कसबे मांजरी पैकी जमीन इनाम करून दिली जी अद्याप चालू आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टातांअन्वये पुर्व सांप्रदाप्रमाणे श्रीज्ञानेश्र्वर महाराजींची पालखी आषाड शुद्ध पक्षात पंढरपूरास जात असे त्या पालखीबरोबर श्री आपाजीराव शितोळे यांनी जाण्याचा सांप्रदाय सुरू ठेवला जो आजपर्यंत चालू आहे.
श्रीआळंदी येथे श्रीज्ञानेश्र्वर महाराजींची पालखी पुर्ण सरंजामासह गेल्यावर तेथील वारकरी पादुका पर्यत सामोरे येऊन तिला समारंभाने बोलावून नेतात व तेथे त्यांना श्रीज्ञानेश्र्वर महाराजांच्या संस्थानातून एक दिवसाचा शिधा मिळत असतो त्यानंतर सर्व सरंजामासह ती पालखी श्रीक्षेत्र पंढरीस जात असते. तेथे पंढरीस प्रदक्षिणा करून तेथून अहेर मिळतो तो घेतल्यावर गोपाळकाला झाल्यानंतर मौजे वाकेरी (आजचे गावाचे नाव वाखारी) पर्यंत श्रीज्ञानेश्र्वर महाराजांच्या पालखीस पोहचवून नंतर गावी येण्याची अद्याप चालू आहे त्याच प्रमाणे कार्तिकमासी वद्य पक्षी श्री नामदेव महाराजांची पालखी श्री पंढरीहून निघण्याचा सांप्रदाय आहे.
श्री आपाजीराव शितोळे यांस मुले नव्हती त्यामुळे त्यांचे पश्चात थोरल्या महादजीचा दुसरा मुलगा बाजी यांचे वशांतील सर्जेराव दादासाहेब शितोळे यांस दत्तक देऊन इनाम गावाची व्यवस्था लावली
सर्जेराव आपाजीराव शितोळे यांनी त्यांचे वडीलांनप्रमाणे श्रींची पालखी पंढरपूरला घेऊन जाण्याचा सांप्रदाय अव्याहत सुरू ठेवला. श्रींना पुत्रप्राप्ती चा नवस केला श्रींच्या कृपेने त्यास पुत्र प्राप्ती झाली नवस पुर्ण होताच सर्जेराव शितोळे यांनी पंढरपुरी नामदेव महाराजांचे मंदिरी १८९१ सालापासून चौघडा चालू केला व ३००रू नेमणूक करून सोय लावून दिली जी अद्याप चालू आहे.
सन १८७६ सालची इनामी गावांची जमाबंदी ची नोंद उपलब्ध आहे यामधे पडवी ता दौंड हे गावातून ३०० रू महसुल अंकलीकर शितोळे यांस भेटत होते अशी नोंद आहे , पडवी गावची पाटीलकी जी शहाजीराजे भोसले यांच्या काळापासून पासून शितोळे देशमुख यांचे कडे होती ती अद्याप ही १७३०ला अंकलीला स्थायिक झालेल्या शितोळेच्यां घराकडेच होती
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा अश्व आणि शामियाना मान अंकलीचे शितोळे देशमुख यांचे कडे असला तरी त्यांचे मुळ गाव‌ हे पडवी आहे व ते पडवी गावचे पाटीलकी करत होते थोडक्यात पडवी गावातील समस्त शितोळे देशमुख यांचे साठी ही अभिमानाची गोष्ट आहे .
माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आजचे भव्यदिव्य स्वरूप पाहता अंकलीकर/पडवीकर शितोळे यांचे ज्ञानेश्वर माऊली आणि विठुराया ने प्रसिद्ध पुरूष हैबतरावबुवा यांचे द्वारे जीवन पूर्णतृप्त केले हे मात्र नक्की
धन्य ते आपाजीराव शितोळे देशमुख आणि त्यांची धर्मपत्नी रमाबाईसाहेब शितोळे
संदर्भ : अंकलीकर शितोळे कैफियत (ही कैफियत इंग्लड मधील म्युझियम मधे उपलब्ध आहे)
हैबतरावबुवा यांचे चरणी नतमस्तक 🙏🚩
राहुल दोरगे पाटील यवत

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...