*"जे काही आपले "जातीचे मराठे" लोक आहेती ते" - छत्रपती शिवाजी महाराज*
“ऐशियास सांप्रति राजकारण वर्तमान तरी दक्षिणचे पातशाहा तीन, निजामशहा, आदिलशाहा, कुतुबशहा, त्यांमध्ये निजामशाही पादशाही बुडाली ते समई निजामशाही उमदे वजीर होते त्यांणी आदिलशाही दरगाहासीआ रुजुवात करुन आपणास रोजगारास जागा केली. हाली आदिलशाही बहलोलखान पठाणी घेतली.
पादशाहा लहान लेकरु. नांव मात्र. ते आपले कैदेत ठेविले आहेत. आणि तख्त व छत्र विजापूरचा कोट पठाणानें कबज केला आहे. कांही गुबारुन मिळाला नाही. ऐशियास दक्षिणचे पादशाहीस पठाण जाला हे गोष्टी बरी नव्हे ?
*पठाण बळावला म्हणजे एका उपरी एक कुली दक्षिणियांची घरे बुडवील. कोणांस तगों देणार नाही."*
दक्षिणेत आदिलशाही इतर शाह्यांमध्ये खासी समृध्द आणि बलाढ्य. पादशाही मधला जणु मोठा भाऊच. त्यातच निजामशाही नामशेष झाली असल्याने आदिलशाही टिकणे गरजेचे होते.
कारण फक्त एकच, दिल्लीपती बादशाहीबरोबर लढायचे झाल्यास एकास एक म्हणजेच द्विपक्षिय युध्द होता कामा नये.
यापुर्वी मोगल व आदिलशाहा स्वराज्यावर उठल्यावर महाराजांनी आदिलशाहा विरुध्द मोगलांना उभे केले होते. तसेच ब-याच वेळेस मोगलांची शक्ती सर्व शाह्याविरुध्द विभागली जात होती. जर शाह्या एक-एक करत नष्ट होवू लागल्या तर मोगलांशी सरळ युध्द करणे कठिण हे महाराजांना माहित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी घोरपडे यांना पत्र लिहले, स्वतः विधिवत राजे असता मालोजीस जोहार केला. घोरपडे अणि भोसले यांचे पारंपारीक शत्रुत्व तरीही महाराजांनी सर्व काही विसरुन तुमच्या फायद्यासाठी पठाणास दक्षिणेतून हद्दपार करण्यासाठी आमच ऐका असे सांगताना महाराज लिहतात- “पठाणाची नस्तनाबुद करणे. दक्षणचीआ पादशाहीआ आम्हा दक्षणियाच्या हाती राहे ते करावे म्हणून. त्यास हा मनसुबा ये प्रसंगी आमचे हातास आलिया उपरि आम्हीं हाच विचार केला की जे कांही आपले जातीचे मराठे लोक आहेती ते आपल्या कटात घेऊन कुतुबशाहीस त्यांची रुजुवात करावी. दौलत देवावी, त्यांचे हातें पादशाही काम घेऊन पादशाहाची दराज करावी. आणि तुम्हां लोकांच्या दौलताहि चालेत, घरे राहेत. ते करावे.” महाराज कुतुबशाहाच्या वतीने अथवा कुतुबशाहा बद्दल इतक्या खात्रीने कसे बोलू शकतात या बद्दलची माहिती आपणास फॅक्टरी रेकॉर्ड मध्ये मिळते.
दि. १८ जुन, १६७७ च्या फॅक्टरी रेकॉर्डच्या वृतात लिहतात-“त्याचे (शिवाजीचे) सामर्थ्य एकसारखे वाढत आहे. गोवळकोंड्याच्या मुलखांत त्याचा इतका अमल चालतो की, राजाला (कुतुबशाहाला) मिळावयाचा कर तो सर्व आपल्या लोकांकडून वसूल करवितो. आणि राजाचे ‘अवलदार’ व इतर मोठे अधिकारी आहेत त्यांना आपल्या मनाप्रमाणे शासन करितो.”
शिवाजी महाराज या पत्राचा शेवट करताना महाराज लिहतात –
“हेजीब आपला पुढें पाठविणें; त्या हाती, आम्हांसी घरोबियानें बरें वर्तावें, मागील दावियाचा किंतु मनांतून टाकीला, ऐसें आपला आराध्य व कुलस्वामी असेल त्यांची शपथ लिहून पत्र हेजीबा हाती पुढे पाठवून देणें. आम्ही सर्व प्रकारे तुमचे गोमटें करावयासी अंतर पडो नेदेऊन. बहुत काय लिहिणें. मर्यादयं विराजते.”
या पत्रावरुन महाराजसाहेब आपल्या स्वजाती विषयी अभिमानी व स्वजातीय लोकांच्यासंबंधित लोकांचे भले ,गोमटे व्हावे यासाठीचा कल दिसून येतो.
तसेच आपलंया जातीच्या मराठयांना प्रमुख पदावर नेमा असे आवर्जून सांगतांनाच मालोजीरावांना मागील दाव्याचा किंतू मनातून टाकला आहे व आपआपसांतील भोसले व घोरपडे घरोब्याचे संबध जाणून वैरभाव , मतभेद विसरुन आपण मराठा म्हणून एकीने मराठ्यांचा धबाधबा कायम दक्षिणेत राहवा यासाठीची तळमळ या पत्रातून दिसून येतो.
तसेच शिवरायांना स्वजाती विषयी अस्मिता व प्रेम होते , आणि ते प्रेम सर्वांनाच हवे.
शिवकालिन पत्र
No comments:
Post a Comment