#
कुलश्रेष्ठ_साबुसिंग_पवार_महाराज_यांना_स्मृतिदिनानिमित्त
कुलश्रेष्ठ_साबुसिंग_पवार_महाराज_यांना_स्मृतिदिनानिमित्त
मध्य उत्तर भारतातील मालवा प्रांतात राजधानी धार येथे प्रसिद्ध अशा परमार राजघराण्यात साबुसिंग यांचा जन्म झाला.त्यांच्या आईचे नाव नगीना कुॅंवर (कछवा घराण्यातील राजकन्या) व वडलांचे नाव किसनसिंग परमार होते.साबुसिंग महाराजांचे मामा रामदास कच्छवा हे अकबराच्या दरबारी २००० घौडेस्वारांचे मनसबदार होते, तेव्हा साबुसिंग महाराज शस्रकला,युध्दकौशल्य, युद्धतंत्र ,घोडेस्वारी चे शिक्षण मामाच्या देखरेखीखाली आग्रा येथे झाले.ते लवकरच पराक्रमी व युद्ध नीती मध्ये पारंगत म्हणून प्रसिध्दीस आले.
माळव्यात मुघलांच्या वाढत्या वर्चस्वामुळे साबुसिंग महाराज धारानगरी सोडुन आपल्या भरवश्याच्या साथीदारांसह दख्खनेत आले.नंतर अहमदनगर जवळील कामरगांव घाटात आले तेथेच सुकेवाडी या ठिकाणी स्थायिक झाले.
साबुसिंग महाराज शहाजीराजे भोसले यांच्या प्रभावाने आपल्या ३०० घोडेस्वार आणि २०० पायदळासह निजामशाहीत सामिल झाले .निजामशाहीतील आपल्या दहा वर्षांच्या काळात त्यांनी फालेपुरच्या युध्दात , बालापुरच्या युध्दात , मलिक अंबरने शहजादा खुर्ररमकडे शरणागती घेतलेल्या युध्दात , बर्हाणपुरच्या युध्दात आणि प्रसिध्द भातवडीच्या युध्दात भाग घेऊन पराक्रम गाजवला.
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या कार्यात साबुसिंग महाराज सामिल झाले .ते तोरणा किल्ल्याच्या मोहिमेत सहभागी झाले.हा स्वराज्याचा पहिला विजय होता.तेथून पुढे छत्रपतींच्या प्रत्येक मोहिमेत सहभागी असत कल्याणच्या स्वारीत , दुर्गादि टेकडीवरील किल्ला काबीज करतांना छत्रपतींनीही साबुसिंग महाराजांचा त्यांच्या वयाच्या ६० व्या वर्षीचा पराक्रम अनुभवला.कल्याणच्या आंबेगाव घाटानजीक झालेल्या घनघोर युध्दात साबुसिंग पवार यांना खाद्यांस जबर जखम झाली. छत्रपती शिवरायांनी
साबुसिंग पवारांच्या पराक्रमावर खुश होऊन सुपे येथिल पाटीलकीचे वतन नूतन इनाम करुन दिले.
सुपे शेजारीच असलेल्या हंगा या गावच्या पाटील असलेल्या दळवी यांनी साबुसिंग व त्यांच्या भाऊबंदासोबत वाद निर्माण केले या वादाचे रूपांतर लढाईत झाले.दळवी यांनी कपटाने भाऊबीजेच्या निमित्ताने साबुसिंग पवारांना घरी बोलावून घेतले पाहुणचार करून वाटेत साबुसिंग महाराज व त्यांचे मोजके सैनिक पाहून परत माघारी जाताना दळवी यांनी लपून बसून अचानक हल्ला केला, साबुसिंग पवार यांनी निकराने लढाई केली अत्यंत पराक्रमी व बलाढ्य शक्ती असलेले साबुसिंग पवार यांच्या मानेवर पाठीमागून तलवारीने घाव घातल्याने या हल्ल्यात च साबुसिंग पवार यांचे निधन झाले.
याप्रकारे भाऊबीजेच्या दिवशी (कार्तिक शु. २ सोमवार शके १५८०) , सुपे-हंगे (नगर जिल्हा) गावाच्या वेशीवर , जांभूळ ओढ्या जवळ , रात्रीच्या वेळी साबूसिंग पवारांचा , घात करून हत्या करण्यात आली.
पुढे यांच्या वंशजांनी छत्रपतींबरोबर अखंड हिंदुस्थानात कर्तृत्व गाजवलं .अफजलखानाचा वध ते पानीपत व त्यानंतर ही स्वराज्याच्या बहुतेक लढायांमध्ये भाग घेऊन पराक्रम गाजवला...
साबूसिंग पवारांच्या वंशजांच्या शाखा पुढीलप्रमाणे : सुपे - धार - देवास - मलठण - आमदाबाद - वाघाळे - नगरदेवळे - पाथरे - चितेगाव
अश्या या पराक्रमी योध्यास आज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !!
महेश पवार
७३५०२८८९५३
No comments:
Post a Comment