विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 9 December 2023

स्वराज्याची पहिली खळद मध्ये बेलसर-पुरंदरची लढाई...

 


स्वराज्याची पहिली खळद मध्ये बेलसर-पुरंदरची लढाई...
लेखन :किशोर गरुड
छत्रपती शिवरायांनी स्वराज्यस्थापनेच्यावेळी सुरुवातीच्या टप्प्यात झालेली मोठी पहिली बेलसर पुरंदरची लढाई । पहिला गनिमी कावा ।।
शिवरायांनी स्वराज्याचे तोरण तोरणा किल्ला जिंकून बांधले आणि त्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस दिवसातच तोरण्या पासून पूर्वेला असणाऱ्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर त्यांची नजर गेली. त्या ठिकाणी त्यांनी तोही डोंगर जिंकून नवीन किल्ला बांधण्यास सुरुवात केली. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा वापर करून राजगड किल्ल्यावरील बांधकाम माच्या इमारती तटबंदी या सर्व गोष्टी बांधून घेतल्या. स्वराज्याच्या पहिल्या राजधानीला आकार दिला. (स्वराज्याची पहिली लढाई बेलसर).. छत्रपती शिवरायांची युद्धनीती म्हंटले की आपल्या डोळ्या समोर उभी राहतात ती स्वराज्य स्थापने साठी लढली गेलेली युद्धे ! छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा या तंत्राद्वारे लढलेली युद्धे!
बेलसर इथे बाजी पासलकर यांच्या नेतृत्वाखाली लढली गेलेली लढाई ही आदिलशाही सरदार फत्तेखान यासोबत होती. यात वीर बाजी पासलकर यांना वीरमरण आले. पण शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईत मोठेच यश प्राप्त झाले. आदिलशाही विरुद्ध लढलेली आणि विजय मिळवलेली ही पहिलीच लढाई होती. या युद्धाने शिवरायांना मोठा आत्मविश्वास प्राप्त झाला. त्यांचे युद्धनेतृत्व आणि युद्ध कौशल्य पणाला लागले. पण या विजयाने ते झळाळून निघाले. या लढाईत बाजी जेधे, गोदाजी जगताप अश्या वीरांनी शर्थ केली. त्यावेळी शिवरायांचे वय होते अवघे १८ वर्षे..! त्यांनंतर अफझलखान वध, जावळीची लढाई (१६५९), कोल्हापूर येथे रुस्तमेजमान याचा पराभव, मग पन्हाळा लढाई आणि सुटका (१६६०), चाकण ची लढाई (१६६०), उंबर खिंड (१६६१), शाहिस्तेखान फजिती (१६६३)..
इथवर ही घोडदौड चालूच होती. पण त्यानंतर १६६५ ला झालेल्या किल्ले पुरंदरच्या लढाईत मघळांच्या सोबत कराव्या लागलेल्या तहामुळे १६६५ ला झालेल्या किल्ले पुरंदरच्या लढाईत मुघलांच्या सोबत कराव्या लागलेल्या तहामुळे त्यावेळेस स्वराज्याचे एकूण २३ किल्ले त्यांना मुघलांना द्यावे लागले. हा फार मोठा आघात होता. पण शिवराय याही परिस्थितीत न डगमगता १६६६ ला चातुर्याने आग्र्याहून सुटका करून पुन्हा स्वराज्यात किल्ले राजगडी आले. त्यानंतर च्या काळात पुन्हा हे सर्व किल्ले मिळविण्यासाठी प्रयत्न केले गेले.यात मग सिंहगडाची लढाई, कांचनबारी, साल्हेर, खान्देरी या महत्वाच्या लढाई होत्या. शिवप्रभूंनी कल्याण इथे स्वराज्याचे आरमार स्थापन करून समुद्रात ही आपला पराक्रम आणि वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांच्या या कार्याची दखल अगदी विदेशातील शाशकांनी घेतली. हिंदुस्थान चा त्यावेळस असलेल्या मुघल बादशहा औरंगजेब ला त्यावेळस असलेला एकमेव मोठा शत्रू म्हणजे शिवाजी महाराज होते असे जदुनाथ सरकार यांनी नोंदवले आहे..
खानाची छावणी बेलसर जवळ आली. त्याची फौज म्हणजे नुसता पसाराच राजांचे सैन्य ते किती महराजांचा एकूण जमाव तीन हजाराहून अधिक होता. गुंजण मावळचे शिळीमकर देशमुख, मोसे खोऱ्याचे बाजी पासलकर, कारीचे बाजी कान्होजी जेध, हिरडस मावळचे बाजी बांदल देशमुख, कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव देशमुख, वेळवंड खोऱ्यातील बाबाजी डोहर देशमुख हे आपल्या जमावानिशी पुरंदरावर उपस्थित होते याशिवाय राजें भोवती गोदाजीराजे जगताप देशमुख, भिमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरोजी चोर, कावजी मल्हार यांसारखे तरुण रक्ताचे खंदे वीर गोळा झाले होते. या लढाईत बाजी पासलकर यांना वीरमरण आले, बांदल देशमुखांचे २५० जन धारातीर्थी पडले तसेच फतेह खानाचा सरदार मुसेखान याचा गोदाजी राजे जगताप यांनी सटकून पराभव केला, जगतापांनी मुसे खानची गर्दन मारली..
या लढाई आणि त्यांची युद्धनीती यावर इतके विस्तृत लिहिण्यासारखे आहे की प्रत्येक लढाईवर एक स्वतंत्र पुस्तक होईल. तर अश्या या अवघ्या ३८ वर्षाच्या "कार्यरत" किंवा "सक्रिय" अश्या आयुष्यात शिवछत्रपतींनी स्वराज्यासाठी जवळपास ५०० लढाया लढल्या..
――――――――――――
चित्रकार : अनिकेत कांबळे 👌🏼♥️🔥

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...