विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 9 December 2023

नागोजी जेधे यांची पत्नी गोदुबाई व त्यांचे बंधू नाईक निंबाळकर यांच्या विषयी व समाधी ची ऐतिहासिक महिती

 लेखन :जीवन कवाडे

इतिहासाच्या पाऊलखुणा
स्वराज्य इतिहासातील सुवर्ण पान कान्होजी बाबा जेधे यांचे गाव ‌ कारी ता भोर जिल्हा पुणे.
खाली दर्शविलेल्या दोन्ही समाध्या बहिण गोदुबाई ( नागोजी जेधे यांची पत्नी )भावाच्या ( नाईक निंबाळकर) पवित्र प्रेमाची साक्ष देणार्या आहेत.
कान्होजी जेधे यांचें नातू, बाजी सर्जेराव जेधे यांचें पूत्र नागोजी जेधे दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर गेले होते. जाताना सरसेनापती हंबीरराव मोहिते बरोबर होते. कोप्पल परिसरात मियाना बंधु हिंदुंवर अन्वित अत्याचार करत असल्याचे छत्रपती महाराजांना समजले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मियाना बंधुस धडा शिकविण्यासाठी पाठवले. बरोबर सेनापती संताजी घोरपडे आणि नुकतेच मीसरुड फुटलेले नागोजी जेधे होते. कोप्पल येथे हुसेन खान मियाना बरोबर घनघोर लढाई झाली . मराठ्यांच्या विजय झाला. या युध्दात संताजी घोरपडे आणि नागोजी जेधे यांनी नेत्रदीपक पराक्रम केला पण कोप्पल विजयाला ग्रहण लागले. धनुष्यबाणाचा एक तिर नागोजी जेधे यांच्या काळात घुसला व नागोजी जेधे स्वराज्य कामी आले. नागोजी यांच्या मृत्यूची बातमी कारी येथे व नागोजी जेधे यांच्या सासुरवाडीला नाईक निंबाळकरांना समजली दोन्ही घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
नागोजी जेधे यांचे मेहुणे नाईक निंबाळकर कारी येथे बहिण गोदुबाईस माहेरी घेऊन जाण्यासाठी आले पण बहिणीने माहेरी जाण्यास नकार देऊन नागोजी रावांच्या पादुका बरोबर घेऊन सती गेल्या.
बहिणीस घेण्यासाठी आलेल्या भावांवर दुःखाचा डोंगर कोसळला. गावी गेल्यावर बहिणीस का आणलें नहीं म्हणून आई वडीलांनी विचारल्यावर काय तोंड दाखवू म्हणून ते आपल्या गावी गेले नाहीत. बहिण गोदुबाई जीथे सती गेली तिथेच जवळ बहिणीच्या दुःख वियोगात प्राण त्याग केला. तिथे जवळच पंधरा वीस फूट अंतरावर बहिण भावाच्या समाधी बांधण्यात आल्या आहेत. काय असेल त्या बहिण भावाचे पवित्र प्रेम.
बहिण गोदुबाई, भाऊ नाईक निंबाळकर व नागोजी जेधे यांना मानाचा मुजरा.



नागोजी जेधे यांची पत्नी गोदुबाई व त्यांचे बंधू नाईक निंबाळकर यांच्या विषयी व समाधी ची ऐतिहासिक महिती जेधे परिवार सदस्यांनी मौखिक दिलेली आहे.🙏🚩
(नागोजी जेधे यांची समाधी अज्ञात आहे. बहुतेक कोप्पल किल्ला परिसरात नागोजी जेधे यांची समाधी असावी.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...