मोगलांचा केवळ मराठ्यांशी लढा सुरू नव्हता. तर मोगल-राजपूत, मोगल-अफगान, मोगल-छत्रसाल बुंदेला तर दक्षिणेत बेरडांचाही मोगलांशी मराठ्यांप्रमाणेच स्वातंत्र्य लढा सुरू होता. स्वराज्यात मोगलांशी लढताना मराठ्यांनी त्यातल्या त्यात धनाजी जाधव व हिंदुराव घोरपडे यांनी आपले कुटुंब बेरडांच्या वाकिनखेड्यात सुरक्षित ठेवले होते. औरंगजेब मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्यात मग्न होता. अखेरची त्याची मोहीम तोरण्यावर झाली आणि त्याने मराठ्यांना मदत करण्याऱ्या बेरडांचा वाकिनखेडा जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली..
यापूर्वीही त्याने बेरडांवर आपल्या प्रख्यात सेनानींना तीन वेळेस होते. पण बेरडांनी तीनही वेळेस मोगलांना पराभूत करून त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळविली. फेब्रुवारी १७०५ मध्ये स्वतः औरंगजेब वाकिनखेडा जिंकून व्येण्यास निघाला. धनाजी जाधव व बेरडांचे विशेष सख्य होते. धनाजी जाधवाची मुले, माणसे वाकिन खेड्याच्या किल्ल्यात होती. इतर मराठे सरदारांचेही कबिले होते. ताराबाईसाहेबांने पाच हजाराचे घोडदळ आणि वीस हजारांचे नायदळाची जंगी फौज धनाजी जाधव व बहिर्जी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली देऊन पाठविले. त्यांनी मोगलांवर डल्ला करून एकीकडे लढाईत गुंतवून दुसरीकडे कबिले सुरक्षित बाहेर काढले. किनखेड्यास मोगलांविरुद्ध मराठ्यांचा लढा सुरू झाला. हा लढा मराठ्यांनी रडांच्या स्वातंत्र्यलढ्यास पाठिंबा म्हणून दिला. इकडे स्वराज्यासाठी मराठ्यांचा संघर्ष सुरू असताना मराठ्यांनी बेरडांना स्वातंत्र्यलढ्यात मदत करणे. मोठे धाडसाचे काम होते तरीही मराठ्यांनी ते धाडस पत्करले..
स्वातंत्र्याची, स्वराज्याची किंमत काय असते याची जाणीव मराठ्यांना होती म्हणूनच बेरडांच्या स्वातंत्र्यलढ्यास त्यांनी कदत केली. धनाजी जाधवांच्या कार्याचा हा वेगळाच पैलू म्हणावा लागेल. या लढ्याविषयी भीमसेन म्हणतो.., “छावणीतील मोगल सैन्य अगदी मेटाकुटीस आले. छावणीच्या बाहेर पाऊल टाकण्याची एकाही मोगल सैनिकाला हिम्मत होईना.....” एवढा प्रखर लढा मराठ्यांनी बेरडांसाठी दिला. मराठ्यांच्या हा मनाचा मोठेपणाच होता..
● शिवकाळात बेरड जमाती बाबत थोडक्यात माहिती :
महर्षी वाल्मिकी यांना ते आपला पूर्वज मानतात आणि रामाची भक्ती करतात. राष्ट्रजात अशीही एक ओळख या जमातीची करून दिल्या जाते. रामोशी आणि बेरड या दोन जमातीत शरीराची ठेवण आणि राहणीमान याबाबतीत साम्य आहे. सुरुवातीस बेरड व रामोशी हे एकाच जातीचे असून भाषा आणि वास्तव्य यावरून दोन जाती झाली असल्याचे मांडले जाते. खास बेरड, दुर्गामुर्गी बेरड, हलगे बेरड, जास किंवा यास बेरड, नेकमकुल बेरड व रामोशी बेरड असे वर्गभेद बेरड जमातीत आहेत. पेशव्यांच्या काळात बेळगाव जवळच्या चिकोडी येथे बेरडांचे मुख्य ठाणे होते. कन्नड आणि मल्याळी मिश्रभाषा या जमातीत बोलली जाते. व्यवसायाच्या निमित्ताने ते सांकेतिक भाषेचा वापर करतात. रामोशी-बेरड समाज शूर, धाडशी, काटक व इमानी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची व गावाची राखण करतात. एखाद्याच्या चोरीचा तपास लावून देतात. त्याला माग काढणे असे म्हणतात. हा त्यांचा मुख्य व्यवसाय. इंग्रजांच्या काळात त्यांच्या वाट्याला उपेक्षित जीवन आले. ते गांव सोडून रानावनात राहू लागले..
――――――――――――
चित्रकार : Ram Deshmukh
No comments:
Post a Comment