छत्रपती #शिवरायांचे द्वितीय पुत्र छत्रपती #राजाराम महाराज यांनी आपल्या पित्याच्या स्मरणार्थ बांधलेलं श्री शिवराजेश्वर मंदिर,
सिंधुदुर्ग या अरबी समुद्रातील प्रसिद्ध अशा #जलदुर्गात अगदी मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मंदिर
महाराजांचे द्वितीय पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी उभारले
या मंदिरातील महाराजांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती
बिन दाढीची आहे पण पिळदार मिशा मूर्तीमध्ये दाखवण्यात आल्यात
क्षत्रिय राजवंश सम्राट छत्रपती वैदिक धर्मशास्त्र अनुसरूनच छत्रपतीं शिवरायांचं मूर्ती साकारण्यात आली विशेष वैशिष्ट्य
मूर्तीरूप घडणावळ स्वतः छत्रपती राजाराम महाराजांनी करून घेतली आहे...
#शिवराजेश्वर मंदिरातील महाराजांची ही मूर्ती पन्हाळा येथे तयार केली होती व तेथून ती #सिंधुदुर्गात आणून शिवराजेश्वर मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली कृष्ण पाषाणात घडवलेली ही मूर्ती राजासन -वीरासन पद्धतीची बैठक असलेली
मूर्तीच्या गळ्यात कंठा रत्नजडित हार माळा आहेत
डाव्या दंडामध्ये तसेच उजव्या व डाव्या मनगटात कडे आहेत
मूर्तीच्या पायात वाळे कमरेस मेखला आहे व छातीवर जानवे/ यज्ञोपवीत आहे.
मूर्तीस वेगळ्या पद्धतीचे #शिरस्त्राण
असून कमरेस तुमान आहे मूर्तीच्या मागे उजव्या सूर्य तर डाव्या बाजूस चंद्राची प्रतिमा कोरली आहे क्षत्रिय #चंद्रवंश #सूर्यवंश प्रतीक या अनुषंगाने मूर्तीमध्ये कोरले जातात
डोक्यावर शिरस्त्राण आणि कमरेस तुमान दाखवलेले आहे. मूर्तिच्या मागे चंद्र आणि सूर्य तर दोन्ही बाजूस 'मोर्चेल' कोरलेले आहे. मोर्चेल हे राजसत्तेचे, राजवैभवाचे प्रतीक..
राजाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1670 चा तर शिवरायांचा मृत्यू इसवी सन 1680 ला झाला. आपल्या वडिलांचा अवघ्या दहा वर्षांचा सहवास राजाराम महाराजांना लाभला. त्यातच, कळत्या वयात राज्यभिषेकासारखा प्रचंड वैभवशाली प्रसंगानंतर राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे निधन झाले आणि आईच्या निधनानंतर ज्या काही धार्मिक विधी शिवरायांनी केल्या, त्यावेळेस दाढी राखली नसावी. हीच प्रतिमा राजाराम महाराजांच्या मनावर कायमस्वरूपी कोरली गेली. त्यातूनच या अप्रतिम आणि सर्वार्थाने वेगळ्या मूर्तिची निर्मिती त्यांनी केली.
पायात तोडे, चंद्र-सूर्य, मोर्चेल, #यज्ञोपवीत ही #अभिषिक्त क्षत्रिय राजाची लक्षणे आहेत
त्यामुळे या मूर्तिचे ऐतिहासिक महत्व प्रचंड आहे..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराची व्यवस्था संकपाळ या घराण्याकडे पारंपारिक आहे त्या मूर्तीची रोज पूजा केली जाते
पूजा केल्यावर मूर्तीस मुखवटा चढवला जातो दोन मुखवटे आहेत सोन्याचा व चांदीचा
मूर्ती समोर शिवकालीन तलवार असून तिच्या म्यानावर एका बाजूला उड्डाण करणारा #हनुमान व दुसऱ्या बाजूला गरुड कोरलेला आहे
तर असे हे विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांचे पुत्र राजाराम महाराजांनी उभारलेले ऐतिहासिक श्री शिवराजेश्वर मंदिर
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
राजनीतिधुरंधर छत्रपती राजाराम महाराजांचा विजय असो #क्षत्रिय_धर्म_युगे_युगे
No comments:
Post a Comment