छत्रपती थोरले शाहु महाराज
छत्रपती शाहु महाराज यानी इ सन १७३१-३२ साली प्रांत सुरत,प्रांत गुजराथ व परमुलखी प्रांत सोरट व काठेवाडी, मारवाड व द्वारका वगैरे महाल हुजुर खाजगीकडे (म्हणजे स्वतः कडे) ठेऊन नारो विठ्ठल यास कमावीसदार व बंदोबस्तासाठी मानाजी पवार यांची नेमणुक करुन त्या प्रांताचा सरदार म्हणुन रवानगी केली. सुरत व गुजराथ प्रांताचा एक त्रुतियांश कर तेथील फौजेच्या व ठाण्याच्या खर्चासाठी ठेवावा व बाकी दोन तक्षिमा ऐवज हुजुरकडे पाठवावा व बाकी सोरट,काठेवाड,मारवाड व द्वारका प्रांताचा दोन-तृतियांश कर तेथील फौजेच्या व ठाण्याच्या खर्चासाठी ठेवावा आणी बाकी चौथी तक्षिमा ऐवज हुजुरकडे पाठवावा... असा आदेश देऊन सदरील प्रांताची व्यवस्था लावली....
यावरुन छत्रपती शाहु महाराज यांचे व्यवस्थापन व काटेकोर आर्थिक नियोजन दिसुन येते....तसेच मराठा स्वराज्याच्या विस्ताराचा आवाका व त्यावरील शाहु महाराजांची मजबुत पकड दिसुन येते. परंतु गो स सरदेसाई यानी मात्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी इ सन १७०७-१७४९ या काळात केलेले आर्थिक नियोजन, प्रशासन व मराठा साम्राज्याचा केलेला विस्तार हा प्रधानांच्या नावावर टाकुन चुकीचे लेखन केलेले दिसुन येते... निर्विवाद प्रधान सेवक / सरकारकुन हे छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे निकटवर्तीय, तसेच पराक्रमी होते, परंतु मराठा साम्राज्याच्या विस्ताराचे व आर्थिक नियोजनाचे जनक मात्र छत्रपती थोरले शाहू महाराज हेच होते, हे अशा बरेच ऐतिहासिक पत्रावरून स्पष्ट होते..
"छत्रपती शाहू महाराज (राजधानी सातारा)"
१८ मे १६८२ रोजी या स्वराज्याचे राजपुत्र जन्माला आले. आपल्या वडिलांप्रमाणेच म्हणजे छत्रपती शंभूराजांप्रमाणे मोगली गोटात राजधानी रायगडाच्या पाडावानंतर कैद भोगली. १२ जानेवारी १७०८ रोजी शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक झाला. पण याच शंभूपुत्राचे इतिहासाला कलाटणी देणारे वर्ष ठरले १७१८ साल कारण यांनी दिल्ली सल्तनत या साली नामोहरम केली.
आपल्या बेचाळीस वर्षांच्या कारकिर्दीत मोगलशाहीचा दोनदा दारूण पराभव केला. हिंदुस्थानचा तीनचतुर्थांश भाग मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आणून सातारा हे केंद्रस्थान बनवले.
१५ डिसेंबर १७४९ रोजी छत्रपती शिवरायांचे नातू आणि छत्रपती शंभूराजांचे पुत्र अखंड मराठा साम्राज्याचे सम्राट अजातशत्रू छत्रपती शाहूराजे शंभूराजे भोसले यांचे निधन झाले.
"हिंदवी स्वराज्याचे अखंड मराठा साम्राज्यात रूपांतर करणारे, साताऱ्यात बसून दिल्लीचा बादशहा ठरवणारे, ज्यांच्या काळात मराठा साम्राज्याने त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ पाहीला असे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्ररत्न छत्रपती शाहू महाराज (राजधानी सातारा) यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा"
No comments:
Post a Comment