विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 15 December 2023

छत्रपती थोरले शाहू महाराज साहेब यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवसशी काय घडेल

 




छत्रपती थोरले शाहू महाराज साहेब यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवसशी काय घडेल😢😢
६०) १५-७-१७४९
छ ११साबान
श्री
पु।। तीर्थरूप राजश्री नाना व ता।राजश्री भाऊ स्वामीचे सेवेसी
विनंती उपरी राजश्रीच्या वृषणा सुजले. नारू किंवा वायु विकार. प्रथम दिवसी मुसलमान तबीबानी लेप लाविला होता. सेकित बसले असतां राजश्रीस मुर्छना आली. बापुजीबावा पलंगावर चढोन धरले. तोड उघडून तोंडात पाणी घेतले. आर्ध घटिकेने किचिंत पीत पडले. त्याउपरी चौका घटिकानी सावध जाहले .वैद व पंचाक्षरी आवधे जमा केले होते. दर्याबाईहि जवळ आली होती. हे वर्तमान मागेच ल्याहावे ते लिहिले नाही. यावस्त हाली लिहिले आसे. आजी तीन रोज जाहाले आधापिवर सूज तसीच आहे. उपाय होत आहे. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.
सं --पे. द. नि का.प.
मराठे साम्राज्यचा स्वराज विस्तीरकी व छत्रपती संभाजी महाराज यांची पुत्र सातारकर छत्रपती थोरले शाहू महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेक मराठे घराणे उदयास आणले .
हिंदुस्थानचा इतिहासात सुवर्णाक्षरांनी ज्या छत्रपतींचा उल्लेख प्रत्येक मराठ्यांनी अभिमानाने सांगत त्या छत्रपती च्या आयुष्यात शेवटच्या दिवशी काय घडले ते या पत्राच्या मधुन आपणास समजते
छत्रपती थोरले शाहू महाराजांनी संपूर्ण आयुष्यात हिंदवी स्वराज्याची मराठे साम्राज्यात रूपांतर केले त्यासाठी हे पत्र.......
फोटो :-प्रत्यक्षात छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या समाधी स्थळावर नतमस्तक होताना काढले आहेत
दोन दिवसांपूर्वी यांची नोंदी घ्या
_________________
अजातशत्रू
🌞🌞छत्रपती शिवाजी महाराज ऊर्फ छत्रपती थोरले शाहू महाराज🌞🌞
🙏🏽🙏🏽छत्रपती शिवाजी दुसरे ऊर्फ थोरले शाहू महाराजांच्या जन्म
18 मे१६८२रोजी मौजे गांगवली , माणगाव तालुका, जि रायगड येथे तर मृत्यू १५डिसेंबर १७४९सातारा
🙏🏽🙏🏽
राजधानी :--किल्ला अजिंक्यतारा
आजोबा :--छत्रपती शिवाजी राजे शहाजीराजे भोसले
वडील :-छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
आई:-महाराणी येसुबाई साहेब राणीसरकार
काका :-छत्रपती राजाराम महाराज साहेब
विशेष नोंद :-छत्रपती थोरले शाहू महाराजांनी आपल्या आईसाहेब महाराणी येसूबाईसाहेब सरकार यांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई साहेब माँसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार चालविले आहे कारण एक छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या अनेक पत्रातून महाराणी ताराबाई साहेब माँसाहेब यांची उल्लेख आईसाहेब असे येत व आपले वारसदार म्हणून दत्तक घेताना आईसाहेब महाराणी ताराबाई साहेब माँसाहेब यांच्या सूचनेनुसार छत्रपती राजाराम महाराजांची पुत्र छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुत्रास म्हणजे रामराजे यास दत्तक घेतला आहे
बहिण :-भवानीबाई राणीसरकार महाडिक घराण्यातील शंकरोजीराजे महाडिक यांच्या शी विवाह
पत्नी :- १)अंबिकाबाई राणीसरकार, :- जाधवराव घराणे सिदंखेडराजा
२)महाराणी सावित्रीबाई राणीसरकार,:- कण्हेरखंड येथील शिंदे घराणे
३) महाराणी सुगाणाबाई राणीसरकार :-शिर्के घराणे
४) महाराणी सकवारबाई राणीसरकार तळबीड येथील मोहिते घराणे
🌙🌙छत्रपती थोरले शाहू महाराज यांना ही अष्टप्रधान मंडळ नेमले.
१)बहिरो रामेश्वर पिंगळे - पेशवा
२)धनाजीराव जाधव - सेनापती
३)नारो शंकर- सचिव
४)रामचंद्र पुडे- मंत्री
५)महादजी गदाधर - सुमंत
६)अंबुराव हणमंते ऊर्फ ७)बाळकृष्ण वासुदेव - अमात्य
८)होनाजी अनंत - न्यायाधीश
९)मुदगलभट - पंडितराव
सरलष्कर-हैबतराव निंबाळकर.
चिटणीस- खंडोबल्लाळ .
पायदळ सरनोबत :-सरदार पिलाजीराव गोळे
पोतनिशी व खासनिशी- आनंद प्रभू ( मुरारबाजीचा पुतण्या )
अशा नेमणुका केल्या
. तसेच
थोरले शाहू महाराज यांनी परसोजी भोसले यांनी सेनासाहेब सुभा ही पदवी ही दिली
.. तर सल्लागार पदी हे रायभानजी काका भोसले हे होते त्याच्या निधनानंतर हे पदवी सुभेदार पिलाजी राव जाधवराऊ यांना दिले .
जित्याजी केसरकर हे मार्गदर्शन करतो.🌙🌙
🏹🏹मराठेशाही साम्राज्याची विस्तार करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक मराठे सरदारांना विविध भागातील लष्करी मोकासा व वतन दिले व अखंड हिंदुस्थान मराठ्यांच्या नियंत्रणात आणले मराठ्यांचा भगवा जरीपटका दिल्लीवर फडकविला अशी महत्त्वाचे सरदार घराणे
१)अक्कलकोटकर :- युवराज फत्तेहसिंह राजे भोसले
२)ग्वाल्हेरकर:- सरदार राणोजीबाबा शिंदे
३) गुजरात :-सेनापती :-खंडेराव दाभाडे
४)बडोदाकर :-सरदार दमाजीराव गायकवाड
५) इंदुरकर :-सुभेदार मल्हारराव होळकर
६) नागपूरकर :--सेनासाहेबसुभा परसोजीराजे भोसले
७)धारेकर:-- उदाजीराव पवार
८)गजेंद्रगडकर :-हिंदुराव घोरपडे
तर पंतप्रधान "-बाळाजी विश्वनाथ व पहिला बाजीराव यांनी उत्तर तील मराठ्यांचा राज्यविस्तार साठी छत्रपती शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा भूमिका वठवली
यासह अनेक घराणे तत्कालीन कालखंडात छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या नेतृत्व खाली आपल्या पराक्रमाने उदयास आले पण वेळी अभाव येथे देणे शक्य नाही 🏹🏹
⚔️⚔️४२ वर्ष स्वराज्याचा राज्यकारभार चालवणाऱ्या तसेच अखंड हिंदुस्थानावर अधिराज्य गाजवणारे एकमेवाद्वितीय छत्रपती थोरले शाहू महाराज होय! ⚔️⚔️
⛳⛳अखंड हिदुस्थानावर राज्य करणार छत्रपती संभाजी महाराज यांचा पुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा पोवाडा⛳⛳
🏹🏹।।मराठयाचा जरीपटका।।
।।तुम्ही अटकेपार नेला।।
।।दरियावरच्या शिवाजीस
तुम्ही आपुला केला।।
।।अहद पेशावर तहद तंजावर।।
।।साम्राज्य स्वप्न पुर्ण केले।।
मराठा रियासतीचे आपण छत्रपती स्वामी झाले।।
दख्खनेच्या घेडीस पाजले यमुनेचे पाणी।.
।।शत्रूला ही भुरळ पाडी ऐसी मधाळ वाणी।।
।।अटकेपार रोविले झेडे ते मानाजी पायगुडे।।
।। आजही उत्तरेत घुमती त्याचा पराक्रमी चौघडे।।
।।शिदेशाही होळकरशाही।।
।।स्वामी आपण घडविली।।
।।हिदुस्थानचे देशमुख ।।
असा तुमचा दरारा।।
।।मराठयाच्या टापाखाली आणाला हिदुस्थान सारा।।
।।दिल्लीचेही तख्त राखिले।।
।।परख्याची मिजास लागली उतरू।।
।।शिवछत्रपतीचे स्वप्न पुर्ण केले।।
ते थोरले शाहू अजातशत्रू.. अजातशत्रू... अजातशत्रू।।🏹🏹
⚔️⚔️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडून संयमित व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कडून आक्रमकता घेऊन ४२ वर्षे हिदुस्थानचे राज्य कारभारी करणार एकमेव छत्रपती थोरले छत्रपती शाहू याना मानचा मुजरा........।।
🔱🔱
शाहू महाराजांचा राज्याभिषेक १२जानेवारी १७०८रोजी साताऱ्यात अजिंक्यताऱ्यावर झाला.
शाहू महाराजांनी वयाची १९वर्षे औरंगजेबाच्या कैदेत काढली .८मे १७०७रोजी औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने त्यांची मुक्तता केली. शाहू महाराजांनी स्वतःस १२जानेवारी १७०८ रोजी साताऱ्यातील अजिंक्यताऱ्यावर राज्याभिषेक करवून घेतला . शाहू महाराजांनी प्रथमच मराठ्यांची राजधानी गडावरून जमिनीवर आणली.त्यांनी मराठा स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले.शाहू महाराजांनी ५ जून १७३०रोजी रायगड मुघलांकडून घेतला. १३एप्रिल १७३१रोजी कोल्हापूरकर छत्रपती संभाजी व शाहू महाराज यांच्यामध्ये वारणेचा तह झाला व कोल्हापूर व सातारा राज्याची वारणा नदी हद्द ठरली .अखेरीस १५ डिसेंबर १७४९ रोजी साताऱ्यातील महालात छत्रपती थोरले शाहू महाराजांचे निधन झाले.🔱🔱
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
संतोष झिपरे9049760888

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...