सरसेनपती संताजी घोरपडे....!!
लेखन :इंद्रजीत खोरे
संताजी
हे फौजबंद होऊन दक्षिणेत गदग प्रांती उत्तरले.तशे मोगली सुभेदार,
सरदारांची गाळण उडाली.जवळच्या कोप्पल सुभ्यातील देशमुख-देशपांडे व इतर
वतनदारांना त्यांनी जरबी खलीते धाडले.
सेनापती लिहितात...
"
राजश्री हणमाजी बनारस देशमुख व देशकुलकर्णी ता हवेली किल्ले कोपल गो
अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्ये श्री संताजी घोरपडे सेनापती जत्फतन मुळूक
दंडवत... आम्ही गदग प्रांते कटे फौजेनसी आलो आहो
परंतु तुम्ही हशम दारूगोली पाठविली नाही व आपली हकीकत लिहिली नाही. यावरून काय म्हणावे? हाली राजश्री माहादजी
शंकर सरसुभेदार प्रांत कोपल यास दर्शनास बोलाविले आहेत.
तरी त्याबराबरी आपला जमाव हशम दारूगोली बाण येसे सिताबीने पाठऊन देणे. तुम्ही याचे आज्ञणे वर्तत जाणे. जाणिजे.
11 नोव्हेंबर 1695
No comments:
Post a Comment