विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 10 December 2023

औरंगजेबाची कबर ही स्वराज्यात म्हणजे महाराष्ट्रात आहे तीही मराठ्यांमुळेच...!!

 औरंगजेबाची कबर ही स्वराज्यात म्हणजे महाराष्ट्रात आहे तीही मराठ्यांमुळेच...!! 

लेखन :इंद्रजीत खोरे



 

औरंगजेबाचा इतिहास ज्या इतिहासकारांनी जगासमोर मांडला त्या प्रमुख व्यक्तींच्या पंगतीतील एक अग्रगण्य नाव म्हणजे जदुनाथ सरकार उर्फ जदूबाबू.औरंगजेब हे इतिहासतील पात्र नक्कीच किरकोळ नव्हते.म्हणजे दोन-पाच पुस्तक संदरबा दाखल वाचली आणि हाती लेखणी घेतली.औरंगजेब लिहायचा झाल्यास बऱ्याच पुस्तकांचा,संदरबांचा,कागतपत्रांचा आणि ज्या ज्या गोष्टी लिखाणासाठी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टींवर बाबूंनी बराच अभ्यास केला असेल.पण प्रमुख मुद्दा हा की औरंगजेबाचा इतिहासा हा मराठयांन शिवाय पूर्ण होऊ शकत नाही हे ही तिकच सत्य...!!

म्हणून बाबू लिहितात...!!

" शेवटी आदिलशाही आणि कुतुबशाही राजवंशांचा शेवट करून आणि त्यांची राज्ये जिंकूनसुद्धा आपल्या हाती काहीच लागलेले नाही अशी औरंगजेबाला एप्रिल १६९५ पासून हळूहळू कल्पना येऊ लागली. शिवाजीच्या किंवा संभाजीच्या काळात मराठयांच्या समस्येचे जे स्वरूप होते तसे स्वरूप आता मराठयांच्या प्रश्ननाचे राहिलेले नाही असे त्याला आता दिसून येऊ लागले.पूर्वी मराठे दऱ्याखोऱ्यातून पुंडवा करीत किंवा लहान प्रमाणात दरोडेखोरी करीत.आता त्यांचे स्वरूप तसे राहिलेले नसून दक्षिण हिंदुस्थानातील राजकारणावर प्रभुत्व गाजविणारे तो एकुलता एक घटक आहे आणि मोगल साम्राज्याला तो आता एकुलता एक शत्रू उरलेला आहे आणि असे असूनसुद्धा मुंबईपासून मद्रासपर्यंत ह्या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत तो वाऱ्यासारखा सतत निसटणारा आणि सर्वव्यापी बनलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना कोणीही शासनप्रमुख न राहिल्यानं किंवा त्यांची ताकद कोणत्याही एका जागी एकवटली नसल्याने त्यांना नष्ट करणे अशक्यप्राय होऊन बसलेले आहे असे त्याच्या लक्षात आले.मोगली साम्राज्याचे सर्व शत्रू संपूर्ण दक्षिण हिंदुस्थानात आणि इतकेच नव्हे तर माळवा,मध्य प्रांत आणि बुंदेलखंड ह्या दूरच्या प्रदेशातसुद्धा ज्यांना शांतता आणि सुव्यवस्था नको होती,नियमित राज्यकारभार चालावा असे ज्यांना वाटत नव्हते असे सर्व जण मराठयांच्याच ध्वजाखाली एकत्रित येत होते आणि मराठयांशीच त्यांची सतत हातमिळवणी चाललेली होती असे धोकादायक स्वरूप आता मराठयांना प्राप्त झालेले होते...!! "

बाबूंनी जे हे मत व्यक्त केलेले आहे हे नक्कीच कुणी मोगली इतिहासकारनं नोंदवून ठेवलेलं असावं.पण एक मात्र नक्कीच की औरंगजेबाची कबर ही स्वराज्यात म्हणजे महाराष्ट्रात आहे तीही मराठ्यांमुळेच...!!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...