"मराठेशाहीच्या अखेरीस यशवंतराव होळकर हा असामान्य पुरुष निर्माण झाला. म्हणूनच पेशवाईच्या बुडत्या काळात मराठ्यांचा अंगचे पुर्वीचे पाणी पुनः एकवार चांगले झळकले.यशवंतरावांचा मुख्य गुण? म्हणजे तडफ व शौर्य. त्यावेळी त्याच्या तोडीचा दुसरा सेनानायक कोणी नव्हता. त्यांचे अंतःकरण उदार होते. आणि स्वतः पेक्षा आपल्या साथीदारांच्या सुख सोयीकडे विशेष लक्ष देई. आरंभी त्याचा उत्कर्ष झाला तेंव्हा तो हाताखालच्या मंडळीत सर्वात प्रिय होता. यशवंतरावा एवढा गनिमी पध्दतीने लढणारा सेनापती उत्तर मराठेशाहित कुणी झालाच नाही. मराठशाहीचे अस्सल पाणी त्याच्या द्वारे पुनः एकवार चमकले."
*मराठ्यांच्या इतिहासाचे मर्मज्ञ रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई.*
यशवंतराव होळकर ही एक मराठी इतिहासातील गूढ शक्ती होय. यशवंतराव हा मराठी परंपरेतील शेवटचा सेनापती होता. शौर्य आणि धाडस , तत्कालीन जुन्या - नव्या युद्धशास्त्राचे ज्ञान , हजारो लोकांवर हुकूमत चालविणारा व्यक्तीविशेष या बाबतीत होळकराच्या तोडीचा दुसरा सरदार पेशवाईच्या उत्तरार्धात निपजला नाही. होळकर या व्यक्ती मध्ये एवढी मोठी जादू होती कि , होळकर कुठेही उभा राहिला तरी त्याच्या भोवती हजारो अनुयायी हा हा म्हणता गोळा होत. होळकर या व्यक्तीत एवढा आकर्षकपणा होता की शत्रू सुध्दा त्याला ताबडतोब वश होत असत. इंग्रजांविषयी प्रत्येकजण मनातल्या मनात जळफळत होत. परंतु इंग्रजांशी लढण्याची हिंमत कोणालाच वाटत नव्हती. जो तो घर कसे वाचेल याच फिकीरीत होता. अश्या या नामर्दपणाच्या अंधकारात पराक्रमाचा एक तेजस्वी तारा सर्वांना डोळ्यापुढे दिसत होता तो तेजस्वी तारा म्हणजे यशवंतराव होळकर होय."
*वा. वा.शास्त्री खरे*
"यशवंतरावांचा एकूण जीवनप्रवास थरारक होता,संकटाची एवढी वादळे , युध्दांचा सतत झंजावात ,सतत विजयाची आस , स्वातंत्र्याची आस , विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी अफाट नेतृत्व क्षमता ,पराकोटीचं युद्ध कौशल्य नितांत दुर्दम्य आशावाद , प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्टा ,क्षमाशीलता ,शत्रूशी दुर्दात क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारा असा महायोध्दा राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल."
*संजय सोनवणी.*
"जनरल लेक व वेलस्ली यांनी शिंदे व भोसल्यांच्या सैन्यावर जे विजय मिळवले त्याने ब्रिटिश जनता रोमांचात पार बुडून गेली. व त्यानंतर यांची प्रसिध्दी त्यांच्या राष्ट्रात गगनाला जाऊन पोहचली. ब्रिटिश जनता , कंपनीचे संचालक मंडळ व ब्रिटिश सरकार यांच्या कडून त्यांची प्रचंड वाहवा होऊन राष्ट्रनायक म्हणून त्यांची प्रतिमा त्यांच्या देशात झाली. पण युद्धाचा दुसऱ्या फेरीत मात्र होळकरांच्या हातून सपाटून मार खाल्ल्याने त्यांची प्रतिमा रसातळाला जाऊन पोहचली. आता वेलस्लीच्या ध्येय धोरणावर आक्षेपघेतला जाऊ लागला. व त्याच्या वर्चस्ववादी धोरणी कारकिर्दीची शोकांतिका सुरू झाली. भरतपुरच्या लढाईतील जनरल लेक चा झालेला पराभव ब्रिटिश फौजेच्या अजिंक्यत्वचा मिथकाला तडा देऊन गेला. या अपयशाने वेलस्लीची गच्छंती अटळ बनली. लवकरच त्याला त्याचा देशात परत बोलावून घेतले गेले."
*जसवंतलाल मेहता*
"युद्धात जय मिळवणे ही गोष्ट केवळ फौजेच्या तयारीवर अवलंबून नसते. पहिली गोष्ट सेनानायक चतुर व अनुभवी पाहिजेत. आणि त्याबरोबरच कपट विद्येचा मारा सारखा चालू ठेवण्याची पात्रता व परिस्थितीचा फायदा हरघडी घेण्याची चतुराई सेनानायकांच्या अंगी असावी लागते. या बाबतीत एकमेव यशवंतराव होळकर लायक म्हणावा लागेल. त्यास मोठी अडचण पडली ती पैशाची इतरांनी नुसना त्यास बाहेरून पैशाचा पुरवठा केला असता तरी त्याने एकट्याने इंग्रजांस वठणीवर आणले असते."
*डी सी बुल्जर*
"यशवंतराव हा मध्यम उंचीचा पण अत्यंत बळकट बांध्याचा होता अपघाताने त्याचा एक डोळा अधू झाला असला तरी त्याचे एकंदरीत व्यक्तिमत्व प्रसन्न होते. अत्यंत दुर्बल परिस्थिती मध्ये ही त्याचे मनोबल कधी डळमळत नसे. उलट तो आश्वासकच वाटत असे. त्याचे शिक्षण उत्तम झाले असून मराठी तो उत्तम बोलेच पण हिंदी व पर्शियन वरही त्याचे प्रभुत्व होते. मराठी तो अत्यंत शुद्ध लिहू शकत होता. आणि हिशेब ठेवण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नव्हता. घोडेस्वारी ,तलवारबाजीत तो उत्कृष्ट होता पण भाला फेकीत त्याच्या इतका अव्वल दर्जाचा कुणीच नव्हता. त्याच्या कौशल्या इतकेच श्रेष्ठ असे त्याचे साहस होते. आणि त्याचे दर्शन अनेक वेळा घडवले होते."
*सर जॉन माल्कम*
"No member of his race ever possessed the gift of guerilla warfare in such higher mesures as did yashwant rao holkar. his resources were always! slight , but his energy and hopefulness boundless. when for the war that now followed he announced to his troopers that they must gather their own rewards ॥ and these conditions were accepted with enthusiasm. His repution was such that , evan when himself a fugitive from scindis army , he had been continually strengthened by desertions form his pursuer. his personal courage was of the kind which soldiers most esteem ,that of such leaders as ney and lannes, and he never lost his personal ascendancy until he lost his reason."
*Sir jems vhillar*
"Yashawantrao was a man of middle stature possessing an extremely powerful and muscular frame. Yashwantrao's army always presented a most picturessque spectacl,being composed of soldiers belonging to heterogeneous rasces - marathas , rajputs, pathans, jata and sikhs. in fact adventures from evary part of india flocked to serve under his banners.
As a military strategist he ranks among the foremost gennerals who have ever trod on indian soil. his heroic achievements shed a noble lustre on his military genius, political sagacity and indefatiguable industry. He was undoubtedly they greatest and most romantic figure on the stage of indian history during the opening decade of the 19 th century."
*Hemchandra Roy*
संदर्भ :- सरंजामी मरहट्टे पृ 365-370
लेखक संतोष पिंगळे
फोटो :- महाराजा यशवंतराव होळकर यांचा शिक्का
मधुकर सर्जेराव हाक्के
मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ
No comments:
Post a Comment