स्वराज्याचे सरसेनापती मराठ्यांचे सरलष्कर हंबीरराव (हंसाजी) मोहिते
१६ डिसेंबर १६८७ साली मराठी साम्राज्यासाठी अथक जीव वेचलेल्या ह्या वीरपुरुषाला रणांगणात वीरमरण आले...
सरलष्कर हंबीरराव (बाजी) मोहिते ह्यांचे खरे नाव हंसाजी हंबीरराव हि पदवी त्यांना शिवछत्रपतींनी दिली.. महाराणी सोयराबाई ह्यांचे ते भाऊ प्रखर पराक्रमी अशा ह्या वीराने प्रतापगडाखाली आफ्जुल्ल्याच्या सैन्याची दाणादाण उडवली होती ह्या लढाईत त्यांनी ६०० हून अधिक शत्रूसैन्या कापून काढले हा पराक्रम गाजवणारी त्यांची तलवार आजही प्रतापगडच्या भवानी मंदिरात पहावयास मिळते...
राज्याभिषेकाच्या वेळी सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी महाराजांनी हंबीररावाची निवड केली ते त्यांच्या नात्यामुळे नाही तर ह्या वीराचे अतुलनीय शौर्य आणि स्वराज्याठाई असलेल्या निष्ठेने शिवछत्रपतींच्या निधनानंतरच्या वादळी काळात शंभूराजेंना साथ देऊन त्यांनी अफाट कर्तृत्व गाजवले.. आदीलशाही सोडून मुघलांना मिळालेला सर्जाखान, सरसेनापती हंबीरराव मोहीते यांच्या मार्गावर होता अखेर वाई येथे सर्जाखान व हंबीरराव यांच्यात घनघोर युद्ध झाले.. या लढाईत तोफेचा गोळा लागून “सरसेनापती हंबीरराव मोहीते” यांना वीरमरण आले... ती तारीख होती १६ डिसेंबर १६८७...
शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे सरसेनापती, रणभैरव ज्यांनी शिवरायांपश्चात स्वराज्याप्रती आपली निष्ठा कायम ठेवत संभाजी महाराजांना राज्यारोहन व राज्यकारभार करण्यास मदत करुन स्वराज्य रक्षिले आणि वाढविले असे शुर सेनानी हंबीरराव मोहिते यांचं तळबीड हे जन्मगाव.. पुण्याहून साताऱ्याला जाताना कराडच्या अलीकडे १३ किमी आंतरावर उजव्या बाजूला ‘सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते प्रवेशद्वार’ अशी कमान दिसते..कमानी पासून सुमारे ३ किमी आतमध्ये हे गाव वसलेले आहे.. या गावातच हंबीरराव मोहिते यांची मोठी समाधी आहे गावात बहुतांशी लोक हे मोहिते आहेत...
समाधीच्या उजव्या बाजूने गावात गेल्यास आत मध्ये सेनापतींच स्मारक उभारल गेल आहे..
‘स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहीते’ यांना मानाचा मुजरा...
———————————————
No comments:
Post a Comment