बाजीराव बल्लाळ....!!
लेखन :इंद्रजीत खोरे
राज्याचे कदीम चाकर बाळाजी विश्वनाथ हे कालवश झाले होते.जास्त काळ हे पद रीकामे ठेवणे छत्रपती शाहू स्वामींना
रुचत नव्हते.स्वामींच्या मनी या पदासाठी बाजीराव हीच व्यक्ती
योग्य
होती.तरीही सर्वानुमते हा निर्णय व्हावा या आशेन स्वामींनी सर्व दरबारी
मांडळीना सदरेस हजर होण्याचा हुकूम केला.बरीच चर्चा झाली.बऱ्याच जानकारांणी
विरोध दर्शवला
शेवटी निर्णय झालाच नाही.काही दिवसांनी महाराज मसूर
मुक्कामी असता स्वामींनी बाजीरावास थेट बोलावून घेऊन त्यांचा उचीत सन्मान
करून पेशवाई बहाल केली. त्यावेळी बाजीराव हे वीस वर्षाचे होते. ( 17 एप्रिल
1720 )
कालांतरे साताऱ्यास पुन्हा मोठा दरबार भरला.छत्रपती दरबारात
येताच संपूर्ण दरबार लपकन कमरेत झुकला. अदब मुजरे झडले.स्वामी आसनस्थ
होताच पंतांनी कामकाजी मायना खुला केला.मराठ्यांनच्या राज्याला आता बळकटी
प्राप्त झाली होती. राज्य विस्तारा बाबत चर्चा सुरु होती.हिंदुस्थान भर
मराठ्यांचे राज्य व्हावे ही छत्रपती स्वामींनी इच्या बोलून दाखवली.प्रथम
दक्षिणेत उतरायचे की उत्तर झोडपायची असा विषय नीघाला.त्यात मोगलांनी
मराठ्यांची कुमक मीळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.ह्याच संदिचा फायदा
घेऊन पेशवा बाजीराव छत्रपतींची परवानगी घेऊन बोलण्यास उठले.
पुढे राव बोलीले की
" मोगलांचे राज्य जिंकण्याची उत्तम संधी हीच आहे. बादशाही
कमजोर
झाली आहे. तीत कांही जीव राहीले नाही. बखेडे बहुत झाले आहेत, बादशहा
आमच्या कुमकेनेच बादशाई रक्षु इच्छित आहे. अशा संधीस आपले कार्य साधून
त्यांचेही बखेडे मोडावे. मागे छत्रपती शंभूराजे यास कैद केल्यावर मोगलाने
मराठी राज्य व स्थळे सर्व घेतली व बादशहा मोठीं फौज घेऊन महाराष्ट्रात
असताही हिसाब न धरीता औरंगाबाद मारीली, अम्मल बसविले, राज्य, किल्ले व
स्थळे साध्य केली.
हे राज्य गेलेले पुन्हा साध्य झाले, अनायासेकरून
स्वामी राज्यावर येऊन पदरी मोठी देववान माणसे मीळाली व बादशाहीस कुमकुवत
करावी, बादशहा स्थापावे, असे होऊ
लागले, पूर्वी वडिलांनी मोठमोठी कार्य केली, तशी न करावी तर
मोठी पदे काय उपयोगाची महाराज!मला सदना मात्र द्याव्या, फौज व खजिना स्वामींने चरणप्रतापेकरून सिद्ध करीतो.
राज्य
साध्य करीतो, निजामाचा शह राखून हिंदुस्थानची मसलत करीतो,कर्नाटकची मसलत
घरातील आहे. ती सहज साध्य होईल. थोरले महाराजांचा संकल्प हिंदुस्थान कबीज
करावे असा होता. त्यासाठीच आपला अवतार उदय झाला आहे व पुण्याप्रतापही तसाच
आहे.यास्तव आधी हे साध्य करावे आणि संकल्प शेवटास न्यावा...!!"
शवटी मोगलानं बाबतच्या धोरणाला बाजीराव म्हणतात
" महाराज, अगोदर हे जुने खोड तोडावे, म्हणजे फांद्या आपोआप खाली येतील. "
बाजीरावांचे
बोलणे आयकून छत्रपती बहुत खुश झाले. पुढे महाराज म्हणाले " तुम्हांसारखी
माणसे पदरी असल्यास हे साध्य होऊन हिमालयापलीकडे दुसरे किन्नरखंडही प्राप्त
होईल.
छत्रपती स्वामींनी भर दरबारी लगेच उतरेवर चढाई करण्याचा
मनसुभा जाहीर केला. त्यांनी बाजीरावास फौजबंद होऊन उतरेस नीघण्याचा हुकूम
केला.
बाजीरावांन सारख्या समशेर बहादरास मानाचा मुजरा
No comments:
Post a Comment