१४ डिसेंबर इ.स.१६८४
नारोजी त्रिंबक सारख्या असंख्य वीरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली जिद्द कायम होती. नारोजी त्रिबकांबद्दल मराठी साधनांत काहीच माहिती मिळत नाही. "मासिरे आलमगिरी" त कोथळा किल्ला घेतल्याची नोंद आढळते ती अशी, "मुहर्रम महिन्याच्या १७ तारखेस म्हणजेच १४ डिसेंबर इ.स.१६८४ मुखलीसखान याचा जावई अब्दुल कादिर याने शत्रुकडून कोंडाण्याचा किल्ला जिंकला होता. त्याला ५००, पाचशे चा मनसबदार करण्यात आले."
या नोंदीतील तारिख आणि अब्दुल कादिर या नावाच्या उल्लेखावरून "कोथळा" ऐवजी "कोंडाणा" ही चुक झालेली दिसते.
"जेधे शकावली" तील नोंद,-"शके १६०६, कार्तिक सुध ११, कोथळागड मोगलांनी घेतला".
पुढे इ. स. १६८४, च्या डिसेंबर महिन्यात काजी हैदर याने कोथळा किल्ल्याचे वर्णन केल्याप्रमाणे, कोथळा किल्ला आहे किंवा कसे?
अशी शंका बादशहास आली असावी. त्याला "तो खरोखरच कोथळा किल्ला आहे," असे अतिशखानाने कळविले आणि किल्ल्याचा नकाशा काढून पाठविला. बादशहाने कोथळागडास "मिफ्ता हुलफुलफुजुल" हे नाव दिले आणि महरमखानाकडून कोथळ्यास पक्के ठाणे केले आणि सावधगिरीने रहावे अशी ताकीद दिली. कोथळा किल्ला घेण्यासाठी गोविंदराव वगैरे मराठे मावळ्यांनी मदत केली. त्याबद्दल त्यांना २५०० होन देण्यात आले. कोथळा किल्ल्याच्या दुरुस्तीकरिता अतिशखानाने पाथरवट पाठविले.
No comments:
Post a Comment