मराठाशाहीतील ताकदवर
पवार घराणे
भाग 3
लेखन :सुरेश नारायण शिंदे
इ.स.१७१८ मधे छत्रपति शाहू महाराजांनी सय्यद बंधूच्या मदतीने पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली जे मोठे सैन्य दिल्लीस पाठवले होते, त्यात खंडेराव दाभाडे, भोसले, मल्हारराव होळकर, बाजीराव बाळाजी व उदाजी पवार यांच्या समावेश होता. माळवा व गुजरातवर अनेक मोहीमात उदाजीरावांचा प्रामुख्याने सहभाग होता. पेशवा थोरला बाजीराव व उदाजीराव यांच्यात १७३१ च्या आधी काही मतभेद झाल्याने ते सेनापति खंडेराव दाभाडे यांच्या पक्षास सामील झाले होते परंतु त्याचवर्षी सेनापति दाभाडे व थोरले बाजीराव यांच्यात डभोई नजीक असलेल्या भीलापुर येथे झालेल्या लढाईत उदाजीराव व चिमणाजी दामोदर यांचा पराभव झाला. त्याचवर्षी पेशवा बाजीराव व उदाजीराव, चिमणाजी यांच्यात समेट झाल्याने पेशव्यांनी दोघांनाहि मानाची वस्त्रे व हत्ती भेट देऊन गौरव केला. इ.स.१७३५ मधे छ.शाहू महाराज हे उदाजीरावांवर नाराज झाले होते परंतु धावडशीचे ब्रम्हेंद्रस्वामींनी काही दिवसांतच महाराजांची नाराजी दूर करून पुन्हा उदाजीरावांना दौलतीच्या सेवेत घेतले. माळवा व गुजरात येथे सुरूवातीला मराठ्यांचे वर्चस्व स्थापन करण्यात उदाजीरावांचे योगदान फार मोठे आहे. आपल्या अंगच्या धाडसाने, रणशौर्याने बादशाही मुलुखात त्यांचा दरारा निर्माण झाला होता. माळवा प्रांतात उदाजीरावांच्या पराक्रमाचे वर्णन करणारी म्हण प्रचारात आली ती म्हणजे, " जिधर उदा उधर खुदा." ब्रम्हेंद्रस्वामींनी उदाजीराव पवार यांना लिहलेला पत्राचा मायना त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा आहे. स्वामी लिहतात," सहस्त्रायु चिरंजीव विजयी भव रणधीर रणशूर अर्जुनतुल्य उदाजी पवार."
मलठणचे सरदार पवार घराण्याचा वंशवेल
१) साबूसिंह / साबाजी पवार
l
कृष्णाजी
|
----------------------------------------------------------------
| | |
१)बुबाजी २)राणोजी (रायाजी) ३) केरोजी
(सुपेकर) (वाघाळकर) (नगर देवळेकर)
|
----------------------------------------------------------------
|
१)काळुजी २)संभाजी
|
-------------------------------------------------------------------
| | |
१)उदाजीराव १) आनंदराव जगदेवराव
(मलठण) ( धार ) ( चित्तेगाव )
|
-------------------------------------------------------------------
| | | |
२)दार्कुजी मैनारावजी गोविंदराव चंद्रराव
|
३) मल्हारराव
|
४) यशवंतराव
( दत्तक )
|
------------------------------------------------------------------
| | |
मल्हारराव अनिरुद्धराव ५) संभाजीराव
(दत्तक धार) (दत्तक धार ) |
|
|
---------------------------------------------------------------
| | |
६) यशवंतराव भागुजीराव सेतुरामसिंह
| ( दत्तक धार ) |
७)धैर्यशीलराव |
|
-----------------------------------------------------------------
| |
विक्रमसिंह जगदेवराव
( दत्तक धार )
संदर्भ - १) धार संस्थानचा इतिहास
( अर्वाचीन काल )
लेखक - काशिनाथ कृष्ण लेले
शिवराम काशीनाथ ओक
इतिहास कचेरी संस्थान धार इ.स.१९२६
२) मराठी रिसासत - गो.स.सरदेसाई
®© सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com
No comments:
Post a Comment