रायगड हा मराठ्यांसाठी क्रांतीचा विषय आहे.झुल्फिकारखानाला रायगड किल्ला मराठ्यांनी मजबुरीने दिला कारण तख्त, गादी आणि राज्य हे कधी तहात किंव्हा फितुरीने दिले जात नसतात. रायगडावरील संभाजीराजे व राजाराम महाराज ह्यांचे कुटुंब व इतर मराठे सरदार यांना घेऊन तो तुळापूर येथील औरंगजेबाच्या छावणीत आला. त्यावेळी शाहू अवघे सहा वर्षाचे होते, ते सहा वर्षाचं बाळ झिनतुन्नीसा बेगम ह्यांनी त्यांची देखभाल केली , त्यांची आई व आप्त स्वकीय जिव्हाळ्याने वागविन असा संकल्प केला आणि बादशहाला कळविले. बादशहाला आपल्या मुलीवर पूर्ण विश्वास होता आणि म्हणून तिचा शब्द आलमगीर टाळत नसे. लहानपणी थोरले शाहु राजे अतिशय गोंडस आणि लोभस होते. झुल्फिकारखानाने "साव" म्हणजेच थोरले शाहु ह्यांना बादशहापुढे नेले तेव्हा बादशहा त्याला बघून अतिशय खुश झाला आणि म्हणाला तूच काय तो साव आहेस. ह्याच वरून साव नावाच्या प्रचलित शब्दातून " शाहु " ह्या शब्दात रूपांतर झालं.
काही इतिहासकरांच्या मते शाहूंचे सुरवातीचे नाव शिवाजी नसून शहाजी ( राजवाडे यांचा लेख ) असे म्हंटले आहे.
या संदर्भात त्याला पुष्टी देणारा आणखी एक आधार दिला आहे. मुंबईचे एक महान मिशनरी गृहस्थ , रेव्हरंड जे.ई ऑबट, यांनी शिवराई अथवा छत्रपतींच्या नाण्यांचा पुष्कळ संग्रह केला आहे व त्याचे अध्ययन करीत होते.त्यांना ह्या छत्रपती नाण्यांविषयी एक निबंध मुंबई येथील रॉयल एशीयटीक सोसायटीपुढे दि. १७ नोव्हेंबर १८९८ रोजी वाचला. या निबंधात त्यांनी 'राजा साव' अशा ठशाची काही नाणी आपणास मिळाल्याबद्दल उल्लेख केलेलाय. ही नाणी अर्थात शाहूंची असावीत असा तर्क असून त्याबद्दल त्यांनी पुढील उदगार काढले.
I have three coins on which the name appears to be " साव "coin may perhaps belong the
Shahu I , this was the name given to Shivaji the grand son of Shivaji the founder of Swarajya. Aurangzeb who called the great shivaji ( शिवाजी लुटारू ) (robber) and his grand son शिवाजी साव ( shiaji the honest). This name Shivaji. Chase to tetain, and with difference of pronouncation साव , शाऊ , शाहू he is known in the list or the king as Shahu. या शिवाय 'सीव व साव' असे संयुक्त नाव वाचता येण्यासारख्या संदिग्ध ठशाची २० नाणी रेव्हरंड ऑबट यास सापडली असून ते याबद्दल पुढील प्रमाणे लिहितात.
"There is a coin of which i have found Zospeciments which looks as through it were Intended to be read both "सिव" and "साव" that is to say it is except at first reading.It would be toten of "साव" but above the upper headlines suggest it as a possibility that his true name bring Shivaji and assumed name "साव" he so inscribed some of his coined as to enable both readings- possible ofcourse this is a conjecture.
थोरले शाहू जन्मदिवस , १८ मे
संकलन - अमित राणे
No comments:
Post a Comment