श्रीमंत सरदार चांदजीराव पाटणकर
भाग एक
ज्यानी चालुक्य कुळाचा क्षत्रियत्वचा वारसा आणि पराक्रम समस्त जगाला दाखवून दिला ज्यानी सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचा खांद्याला खांदा गणीमास जेरीस आणले असे पराक्रमी श्रीमंत सरदार चांदजीराव पाटणकर
नागोजीरावांचे पुत्र चांदजीराव हे तरुण, शूर असल्यामुळे रिकामें बसणें त्यांना आवडेना. मराठी राज्याची स्थापना होऊन बराच विस्तार झाला होता. शिवाजीमहाराजांच्या वेळचे मोठमोठे पराक्रमी सरदार व मुत्सद्दी नाखूषहोऊन राजाश्रयास मुकले. त्यामुळे त्यांच्या कर्तबगारीचें व पराक्रमाचें तेज फिक्कें पडत चाललें. औरंगजेब यानें शिवाजीचा बहुतेक मुलूख हस्तगत केला. परंतु मराठे सरदारांच्य पराक्रमांमुळे डोंगरी किल्ले त्यांच्या स्वाधीन झाले नाहींत. मराठे लोक प्रसंगविशेषी औरंगजेबाला नम्र होऊन त्याची चाकरी करण्याचें कबूल करीत, परंतु सवड सांपडली म्हणजे त्याच्या सैन्यावर तुटून कत्तल उडवीत. औरंगजेब विजापूर शहरीं वर्षभर राहिला, परंतु शेवटीं रोग उत्पन्न झाल्यामुळें, तो तेथून अकलूज येथेजाऊन राहिला.
चांदजीराव विजापूरचें राज्य बुडाल्यावर इ. स. १६८८ सालाच्या आरंभीआपल्या लोकांसह बाहेर पडले. त्यांना शौर्याची व साहसाची कृत्ये करण्याची फार हौस होती. अशा शूर मनुष्यांची त्यावेळीं फार जरुरी असून औरंगजेबाच्या धामधुमीमुळें
मराठे लोकांना आपला पराक्रम दाखविण्यास मोठी संधी आलेली होती. मोंगल सैन्याला आपल्या शक्तीनुसार त्रास देण्याचा हेतु धरुन चांदजीरावांनी प्रथमत: त्या सैन्याची एक टोळी विजापूरकडे जात होती तीवर हल्ला करण्याचा बेत केला. त्या टोळीला गाठून त्यांनी रात्री अचानक जाऊन छापा घातला. मोंगल लोक गर्वाने उन्नत होऊन, आपल्या पराक्रमावर भरंवसा ठेवून उतरले होते. कित्येक पोषाख उतरुन खुशाल झोपा घेत होते व कांही मोठमोठे पलीते पेटवून व लाकडाचे ढीग एका आंबराईत जाळून त्याच्या उजेडात गाणे बजावणें करीत होते. चांदजीरावांचे लोक त्यावेळी पायदळ पैकी असून ते लपत छपत गोंगाट न करता त्या टोळीच्या जवळ गेले. परंतु कांहीं कारणानें मोंगलास त्या लोकांचा सुगावा लागल्यामुळे, ते उठून तयारी करू लागले. इतक्यात चांदजीराव स्वतः पुढे होऊन त्यांनी आपल्या • लोकांसह त्यांच्यावर हल्ला केला. मोंगल लोकांनी सुमारें एक प्रहर मोठ्या निकरानेंयुद्ध केले व चांदजीरावाचे कांही लोक ठार करून त्यांना मध्यें कोंडिलें, तथापि चांदजीरावांनीं आपले धैर्य न सोडिता हातातील तलवार अशा शिताफीने चालविली कीं, थोड्याच वेळात त्यांच्या आसपास शत्रुपक्षाकडील एकही मनुष्य राहिला नाहीं. ह्या लढाईत त्यांना कित्येक घोडे व हत्यारें सापडलीं, ती घेऊन ते राहिलेल्या लोकांसह कोल्हापूराकडे जाऊन एखाद्या मराठे सरदारास मिळावें, अशा हेतुनें पुढें चालले. त्यावेळेस डफळे, माने, निंबाळकर वगैरे मराठे सरदार बंड करण्याच्या थाटांत होते. परंतु तो बेत त्यावेळेस साधला नाही. एक मुक्काम पुढे गेल्यावर त्यांना पांच हजार मोंगल स्वारांची एक टोळी भेटली. ह्या लोकांबरोबर युद्ध करून जय मिळविण्याची आशा नव्हती. मोगलांकडे मराठे सरदार व घोडेस्वार पुष्कळ होते, यामुळें चांदजीरावांनी त्यावेळीं हिकमतीनें व चातुर्यानें आपण बादशहाचे नोकर आहों, असें त्या टोळीच्या मुख्यास सांगितलें. परंतु तो बेत अंगावर आला. कारण रिसालदारानें असें सांगितलें कीं, बादशहाचे हुकमावरून आपण राजगडाकडे जात आहों व तुम्हीही आमच्या बरोबर तिकडेच चलावें. चांदजीरावांना त्याचे बरोबर जावें असें वाटलें नाहीं. परंतु ह्या वेळेस विरुद्ध बोलण्याची सोय नव्हती, यामुळे त्याचें म्हणणें कबूल करुन, ते त्या स्वारांच्या टोळीबरोबर निघाले. त्यांच्या मनात असें आलें कीं, ह्या स्वारांचा वाटेंतच मोड करण्याची कांही तरी तजवीज करावी. त्यांनी आपल्या लोकांपैकीं चार विश्वासू मनुष्यांस तो बेत कळवून आसपास कोठें मराठे लोक किंवा मावळे असल्यास शोध करून त्यांना बरोबर घेऊन येण्यास सांगून त्यांची रवानगी गुप्तपणें केली. पुढें ते सर्व लोक घाटमाथ्याचे आसपासचे रानात आले व त्यांनीं एका ओढ्याचे काठीं मुक्काम केला. चांदजीरावांनीं पाठविलेल्या मनुष्यांपैकीं, एका नावजी नांवाच्या मनुष्यानें सुमारें ३ हजार मावळे लोकांची टोळी जमा
केल्याची हकीकत त्यांना येऊन कळविली. तेव्हा रात्रीं छापा घालावयाचासंकल्प करून त्यांनीं तो बेत आपल्या लोकांस कळविला. भुरटी झाडी वडोंगराळ प्रदेश यामुळे सर्व लोकांस एकाच मैदानांत पाण्यानजीक उतरण्याचीसोय नव्हती. यास्तव चांदजीरावांनी आपल्या लोकांचा तळ ओढ्याचे दुसरे
बाजूस मोंगल घोडेस्वारांचे तळापासून थोड्याशा अंतरावर दिला असून जागा उंचवट्याची होती. मध्यरात्रीच्या सुमारास मुसलमान लोक आपआपल्या पथाऱ्या टाकून खुशाल घोरत पडले. चांदजीरावांना व त्यांचे लोकांना झोंप मुळींच आली नाहीं. प्रत्येक इसम मावळे येण्याची वाट पहात तयारीनें आपआपले गाशावर व घोंगडीवर पडून राहिला. नंतर हळूहळू एक, दोन असे पुष्कळ मावळे जमा झाले. शिवाजीमहाराजांच्या कारकीर्दीतील कृती ते विसरले नव्हते. सर्व तयारी झाल्यावर त्यांनीं भराभर घोड्यांचीं दवासनें व पायबंद तोडून काही घोडे उधळून लाविले. त्यांचें खिंकाळणें व टापांचा आवाज ऐकून मुसलमान धडपडून उठले व आपआपलीं शस्त्रें सांवरून आरडाओरड करून तयार झाले. चांदजीरावाकडे घोडेस्वार फार नसून बहुतेक मावळे पायदळपैकींच होते.मुसलमानांचे घोडे पळून गेल्यामुळें तेही पादचारीच झाले. घोडेस्वारांचा मुख्य सरदार पांचशें धिप्पाड मुसलमानांसह चांदजीरावांवर तुटून पडला. रात्रीचाप्रसंग, शत्रू मित्र समजण्यास सुद्धा पंचाईत. तथापि रानात नेहमी भटकणारे मावळे लोकांस त्यांचा काही हिशेब वाटला नाहीं, ही झटापट उजाडेपर्यंत चालली. विजयी कोण होईल हें कळेना. परंतु मुसलमानांचा सरदार असह्य जखम लागून पडला. त्यामुळें मोंगलाचें धैर्य सुटून ते इकडे तिकडे पळू लागले व मावळे त्यांचे पाठीस लागले, युद्धाचें सर्व जोखीम चांदजीरावावर पडले असल्यामुळे, त्यांनी आपल्या जिवाकडे न पाहता मोठा पराक्रम करून विजय संपादिला. मावळे लोकांनीं दुसऱ्या दिवशी रानांतून बहुतेक घोडे शोधून आणिले व ते स्वार बनले व काहीं दिवस त्या ठिकाणीं मुक्काम करून ते परत कोल्हापुराकडे जाण्यास निघाले. त्यावेळेस औरंगजेब अकलूज येथेच होता. मराठे लोक त्याला वारंवार उपद्रव देत असत. नाशिकाजवळ पुष्कळ मराठे सरदार मोगंलाशीं लढत होते. त्यामुळे औरंगजेबानें तिकडील सैन्याच्यामदतीकरिता आपला पुत्र शाहजादाअज्जम याजबरोबर काहीं सैन्य देऊनत्याची तिकडे रवानगी केली आणि वजीराचा पुत्र सादतखान याजबरोबर कांहीं सैन्य देऊन कोंकणप्रांत सर करावयास त्याला पाठविलें व कोल्हापूर प्रांताचा राहिलेला भाग सर करण्यासाठीं तकरीबखान नांवाचा एक सरदार पाठविला.तकरीबखान कोल्हापुरास आल्यावर संभाजी संगमेश्वरास थोड्यालोकांनिशीं एका बागेंत राहिले आहे अशी बातमी समजली. तेव्हां तो काही • विश्वासू शूर लोक बरोबर घेऊन आपल्या पुत्रासह संगमेश्वरी आला व त्यानें छत्रपति संभाजीच्या वाड्यावर हल्ला केला. छत्रपती संभाजीच्या तर्फे कलुषा यानें काहींसा प्रयत्न केला. परंतु तो जखमी झाल्यामुळे बाकीचे लोक पळून गेले व संभाजी त्याच्या हात सापडला. त्याने संभाजी राजांना कैद करून कोल्हापुरास आणिले व बादशहा तुळजापुरी होता. तेथे त्याला संभाजी राजांना धरल्याबद्दल वर्दी दिली. चांदजीराव कोल्हापुराकडे जात असता वाटेत त्यांना पुष्कळ संकटे सोसावी लागली. पुढे तकरीबखान कोल्हापुरास आल्याची बातमी लागताच ते कोल्हापुरास न जाता मिरजेच्या आसपास वाट चुकवून रानांत राहिले. कोल्हापूरयेथे राहिलेल्या सैन्यापैकीं एखादी टोळी लुटीला वगैरे आसपास गेली तरतिच्यावर हल्ला करून चांदजीराव त्या तुकडीचा मोड करीत समयविशेषीकोल्हापूरच्या आसपास येऊन मुसलमान लोकांवर हल्ला करीत. अशा रीतीनेंबरेच दिवस त्यांनीं मोंगल सैन्याशी झुंझण्यात व त्यावर हल्ले करण्यांत घालविले.इकडे औरंगजेबानें छत्रपति संभाजी राजांना क्रुरपणानें ठार मारल्याची बातमी सर्व मराठे लोकांना समजतांच त्यांना अतिशय त्वेष आला. राजाराम व त्याचें कुटुंब आणि संभाजीची बायको व मुलगा रायगडावर होतीं. म्हणून मराठे सरदार व मुत्सद्दी रायगडावर येऊन मसलती करूं लागले. चांदजीरावही त्यावेळीं रायगडीं गेले होते.संताजी घोरपडे त्यांच्यावर फार प्रीती करीत असत. चांदजीरावांनी आपली सर्व हकीकत त्यांना सांगितलीं. पुढें जनार्दनपंत हणमंते, प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत बहुरकर, खंडो बल्लाळ, चिटणीस, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे वगैरे सरदार व मुत्सदी मंडळीनी संभाजीची बायको येसूबाई हिचा विचार घेऊन संभाजीचा राजांचा पुत्र मोठा होईपर्यंत राजारामानें राज्यकारभार करावा असा ठराव केला. नंतर राजाराम आपल्या कुटुंबासह विशाळगडावर रहावयास गेला. तथापि मुसलमान• लोकांना राजारामाचा ठिकाणा न लागावा म्हणून त्याने एकाच ठिकाणीं न राहता • असेल त्याचें आसपास असावें, असें ठरविलेलें होतें. पुढें मोंगलांनी रायगड किल्ला.रायगडापासून पन्हाळा किल्ल्यापर्यंत विखरून विखरून रहावें व स्वार शिबंदीनें तो हस्तगत करून येसूबाई व तिचा पुत्र शाहू यांना बादशहाकडे नेलें. परंत औरंगजेबानें त्यांचा योग्य सन्मान राखून त्यांना आपले जवळ इतमानानें बाळगिलें.नंतर मोगलांनीं मिरज व पन्हाळा किल्ला घेतला. तेव्हां प्रल्हाद निराजी,धनाजी जाधव वगैरे मुत्सद्यांनीं विचार करून राजारामानें जिंजीस जाऊनराहावें असे ठरविलें व त्याला तिकडे सुरक्षित पोंचविण्यासाठी ते सर्व सरदार व चांदजीराव व आणखी कांही निवडक लोक बरोबर घेऊन तडक करून कर्नाटकांत जिंजीकडे निघून गेले, परंतु वाटेंत कांही कारणानें राजारामाविषयीं मोगलांच्या लोकांना संशय आल्यावरून कारभाऱ्यांनी चांदजीराव, धनाजीराव आणि राजाराम ह्या तिघांना जिंजीकडे रवाना करुन आपण मोंगल लोकांच्या स्वाधीन झाले व युक्ति प्रयुक्तीने सुटून जिंजीस गेले. राजाराम जिंजीस जात असतां त्याला वाटेंत बरेच मराठे लोक येऊन मिळाले. मोंगल लोकांच्या टोळ्या इकडे तिकडे भटकत होत्या. त्यांनी कित्येक वेळां राजारामावर हल्ले केले. परंतु मराठा सरदारांच्या पराक्रमानें व युक्तीने राजाराम जिंजीस सुखरूप पोहचले. यावेळी चांदजीरावाचे शौर्य व पराक्रम
राजारामाच्या प्रत्यक्ष अवलोकनात येऊन ते फार खुष झाले.
नंतर अष्ठप्रधान व कारभारी जिंजीस आल्यावर त्यांनी राजाराम
महाराजांना तक्ताधिपति केलें. तेव्हां त्यांनी आपल्या प्रधानांच्या वगैरे नेमणुका करुन सर्व मराठे सरदारांना पोषाख, इनामें व जहागिरी वगैरे दिल्या
No comments:
Post a Comment