विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 January 2024

सरदार हिरोजीराव व नागोजीराव पाटणकर



सरदार हिरोजीराव व नागोजीराव पाटणकर 
लेखन :

सिंहावलोकन पाटणकर

इ. स. सन १६५६ साली महंमद अदिलशहा विजापूरचा बादशहा मयत झाला व त्याच्या पाठीमागून त्याचा पुत्र अल्ली आदिलशहा गादीवर बसला.परंतु त्याने तक्तारूढ होण्याबद्दल दिल्लीच्या बादशहास कळविले नव्हते. यामुळे बादशहास राग येऊन त्यानें आपला वजीर मीरजुमला याजबरोबर मोठे सैन्य
देऊन त्याला विजापूरावर पाठविलें. औरंगजेब श्वतः या स्वारीत होता, मोंगलांनीअल्ली आदिलशहा महंमद आदिलशहाचा पुत्र नव्हे, अर्से खोटेंच कारण पुढेंआणून हा युद्धप्रसंग आणिला,विजापूरचे दरबारीं मोंगलांच्या स्वारीचें वर्तमान येऊन पोहोंचलें, परंतु मैदानावर लढाई देण्यापुरतें सैन्य अल्पावकाशांत त्यांना जमवितां आलें नाहीं.तथापि आपलें सर्व सैन्य एकत्र करून, सर्जेराव घाडगे, बाजी घोरपडे, व हिरोजीराव पाटणकर वगैरे मराठे सरदार यांना आपआपलें सैन्य घेऊन बादशहानें मदतीस बोलाविलें व आपल्या राज्यांत ठिकठिकाणीं सैन्य ठेवून घोडेस्वारांचा सरदार खानमहंमद यानें फिरतें राहून ज्या ठिकाणीं युद्धप्रसंग येईल तेथें कुमक करावी, असा हुकूम करून एकंदर व्यवस्था केली.हिरोजीराव पाटणकर यांनीं त्यावेळीं पांचहजार सैन्य स्वतःचें जमविलें असून, बादशहाकडून आणखी कांहीं सैन्याचें त्यांना आधिपत्य मिळालें होते व त्यांची नेमणूक शहराच्या बंदोबस्ताकडे होती. औरंगजेब इ. स. १६५७ सालांत विजापूरकरांच्या मुलखांत शिरला व कालीपान बेदर, कलबुर्गे, वगैरे किल्ले त्यानें सर केले. परंतु खानमहंमद यानें त्याची फार नुकसानी केली. घोडेस्वारांपुढेत्याचा कांही इलाज चालेना. तेव्हां त्यानें खानमहंमद याला काही द्रव्य देण्याचें कबूल करून आपल्याकडेवळवून घेतलें, यामुळें तो मनापासून युद्ध करीना. पुढें औरंगजेबानें विजापूरवर हल्ला केला; त्याठिकाणी मोठ्या निकराचें युद्ध झालें. हिरोजीराव पाटणकर, सर्जेराव घाटगे व इतर मराठे सरदार यांनी फारपराक्रम केल्यामुळे, शहर हस्तगत झालें नाहीं तथापि तो दिल्लीचा बादशहा तहाचें बोलणें मान्य करीना. विजापूरचें राज्य बुडवावें असा त्याचा पक्का निश्चय होता. परंतु तो मराठे सरदारांनी सिद्धीस जाऊं दिला नाहीं. इतक्यांत त्याला शहाजहान आजारी असल्याबद्दल रोशन- बेग इचें पत्र आलें. त्यामुळे तो लढाई बंद करून सैन्यासह दिल्लीस निघून गेला.तथापि तें राज्य पुढें फार दिवस टिकलें नाहीं. शिवाजी राजाचा उत्कर्ष होऊन त्यानें विजापूरकरांच्या मुलखांतील बराच भाग काबीज केला व पुष्कळ किल्ले घेतले. इ. स. १६८६ सालांत औरंगजेबानें आपला पुत्र सुलतान शाहजादाअज्जम याजबरोबर मोठें सैन्य देऊन विजापूरचें राज्य घेण्याकरितां पाठविलें. त्यासालीं विजापूर प्रांतांत दुष्काळ पडला होता, त्यामुळे औरंगजेब बादशहानें अहमंदनगर येथील सरदार गाजीउद्दीन याला धान्याचा पुरवठा करण्याचा व सैन्यासह आपल्या पुत्रास मदत करण्याचा हुकूम दिला. त्याप्रमाणें गाजीउद्दीन २०००० गोण्या घेऊन मोठ्या सैन्यानिशीं विजापूराकडे निघून आला. ही बातमी विजापूरच्या दरबारांत कळतांच बादशहानें आपलें सैन्य त्याच्यावर हल्ला करण्याकरितां पाठविलें. ह्या लढाईत हिरोजीरावाचे पुत्र नागोजीराव पाटणकर यांनी चांगला पराक्रम केला.परंतु सरतेशेवटीं विजापूरकरांचा मोड झाला.नंतर औरंगजेब दक्षिणेंत येऊन त्यानें सैन्यासह विजापूर शहराला वेढा दिला. विजापूरकरांचें सैन्य ठिकठिकाणीं गुंतलें होतें. यामुळें औरंगजेबाबरोबर युद्ध करण्याची त्यांना कुवत राहिली नव्हती. खेरीज कांहीं सरदार फितूर झाले, यामुळें बादशहासह सर्व लोक औरंगजेबाच्या स्वाधीन झाले. औरंगजेब यानें मोठमोठ्या सरदारांस आपल्या आश्रयास ठेविलें व लहानसहान जहागिरी पूर्वीप्रमाणें चालविल्या.अशा रीतीनें सन १६८७/८८ सालीं विजापूरच्या राज्याचा शेवट झाल्यावर नागोजीरावपाटणकर ‘पाटण' येथें येऊन देशमुखीची व्यवस्था पाहू लागले व पुढें तेथेंच कैलासवासी झाले.श्रीमंत सरदार नागोजीराव पाटणकर यांच्या छत्रपतींच्यास्वामीनिष्ठेची, पराक्रमाची व अधिकार कार्याची अधिक माहिती करिता 1689 सालची तीन पत्र उपलब्ध आहेत

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...