विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 January 2024

महाराष्ट्रातील वीरगळ

 

वीरगळ: आज देशात लोकशाही सत्ता पद्धती आहे. पण पूर्वी राजसत्ता अस्तित्वात होत्या. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, शिलाहार, होयसाळ, काकतिय, चोळ, परमार इत्यादी राजवंशांच्या राजवटीत वीरगळ मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आढळतात. हे हिंदू धर्माला आश्रय देणारे राजे होते. जेंव्हा एकमेकांत किंवा इतर सत्तांसोबत या राज्यांचे युद्ध व्हायचे त्यात योद्धे मोठ्या प्रमाणात मृत्यू पडत. तसेच स्वतःच्या कुटुंबाच्या व पशुधनाच्या रक्षणार्थ वीर मरण पावे. वीर अश्या इतर प्रसंगी सुद्धा चिकाटीने, धैर्याने लढत प्रसंगी विरगतीस जात. अश्या विरगतीस गेलेल्या विराचा उचित सन्मान व्हावा, आठवण राहावी म्हणून सपाट पाषाण शिळेवर त्या विराचा युद्धप्रसंग व स्वर्गारोहणाचे शिल्पांकन करत. अशा शिल्पांना वीरगळ म्हणतात. पूर्वी वीर जेंव्हा विरगतीस जातो तेंव्हा तो स्वर्गात जातो असा समज होता म्हणून वीरगळ वर वीर स्वर्गात गेल्यावर शिवपूजा करत असलेलं दाखवतात व त्याला मोक्ष मिळालेला दाखवतात. असा समज असल्याने पूर्वी वीरांना लढाई साठी प्रोत्साहन मिळत असे, योद्धे लष्करात सामील होत असत. वीरगळ शिल्पे गावोगावी पाहायला मिळतात. जी जुनी गावे आहेत तिथे हमखास पाहायला मिळतात. गावातील मुख्यतः महादेव मंदिर, वेशी बाहेर, किल्ल्यावर, रणक्षेत्री अशे वीरगळ दिसतात. काही ठिकाणी व्यवस्थित ठेवलेली पाहायला मिळतात तर काही ठिकाणी अत्यंत दुरावस्थेत पाहायला मिळतात. ज्या गावात ही पाहायला मिळतात त्या गावचा विराने नक्कीच रणांगण गाजवलेलं असत. त्याच गावचे पूर्वजच ते, याचा नक्कीच गाव वाल्यांना अभिमान पाहिजे. गावात वीरगळ असणे म्हणजे त्या गावचा नक्कीच अबोल इतिहास असणारच. जेंव्हा वीर विरगतीस गेला व त्याचे वीरगळ रुपी स्मारके तय्यार झाले, नंतर त्या वीरांच्या 2-3 पिढ्यांनी त्या स्मारकाची पूजा केली असेल, आठवण मणी बाळगली असेन, त्या पूर्वजांचे आशिर्वाद घेतले असतील. मात्र नंतर च्या पिढ्यांना त्याचा विसर पडला.
महाराष्ट्र सोडता बाहेरील राज्यांत वीरगळ वर शिलालेख कोरलेले दिसतात, त्यामुळे युद्ध, विराचे नाव, तिथी, राजा इत्यादी गोष्टींची माहिती मिळते व इतिहास समजतो मात्र महाराष्ट्रात काही क्वचितच ठिकाणी वीरगळ वर लेख सापडतात.
संदर्भ:



महाराष्ट्रातील वीरगळ- सदाशिव टेटविलकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...